Chinese food bad effects of ajinomoto - मुंबई व पुण्याबरोबरच छोट्या शहरांमध्येही चायनीज खाद्यपदार्थ खवय्यांसाठी सहज उपलब्ध होतात. चायनीज भेळपासून तर मन्चुरियन, राइस सर्वच पदार्थ तरुणांच्या आवडीचे बनले आहेत. मात्र, या पदार्थामध्ये वापरण्यात येणारा अजिनोमोटो क्वचितप्रसंगी अगदी कमी प्रमाणात खाण्यात गेला, तर फारसा हानिकारक ठरत नाही; मात्र अधिक प्रमाणात याचे सेवन करणे शरीरासाठी त्रासदायक ठरू शकते. उच्च रक्तदाब, लठ्ठपणा तसेच मानसिक आरोग्य व झोपेवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.
अजिनोमोटोची चव मिठासारखी लागते. या कारणामुळेच रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांनी ते पदार्थ खाऊ नये. अजिनोमोटोचा अतिवापर डोळ्यांसाठी घातक ठरू शकतो. पॅकिंग फूड अधिक प्रमाणात खाल्ल्याने तुमची जाडी वाढू शकते. लहान मुलांच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे.
अजिनोमोटो आणि असे बाकीचे फ्लेवरचे पदार्थ टाळण्यासाठी सर्वांत उत्तम उपाय म्हणजे घरचे जेवण घेणे. रेस्टॉरंटमध्ये कधीतरी जाऊन खाणे ठिक. मात्र, त्याला मर्यादा असावी.
या पदार्थांमध्येही असते अजिनोमोटो
केवळ चायनीज पदार्थांमध्ये अजिनोमोटो असते, असे नाही. अनेक पॅक फूड उत्पादनांमध्येही अजिनोमोटोचा वापर करण्यात येतो. घरच्या घरी रेस्टॉरंटसारखे जेवण देणारे मसाले, दोन मिनिटांत बनणारी सूप, मॅजिक मसाले, चिप्स अशा अनेक गोष्टींमध्ये अजिनोमोटो असते. तसेच फ्लेव्हरसाठीही त्याचा वापर केलेला असतो.
No comments:
Post a Comment