विरघळणार्या बॅटर्या Soluble Battery
बॅटरीची उपयुक्तता आणि सुटसुटीतपणा यांमुळे कोट्यवधी बॅटरी रोज तयार होतात आणि वापरल्या जातात. मात्र, त्या धोकादायक, क्वचित प्रसंगी स्फोटक आणि घातकही असतात. बॅटरीची ही भीती आता यापुढे बाळगावी लागणार नाही. कारण, संपल्या की आपोआप विरघळून जाणार्या बॅटर्या भविष्यकाळात उपलब्ध होणार आहेत. प्रभाकर खोले जनिर्मिती करणार्या बॅटरी म्हणजेच सेलचा वापर आपण अनेक ठिकाणी करत असतो. अगदी मोबाईलपासून खेळण्यांपर्यंत आणि रिमोट कंट्रोलपासून ते थेट वैद्यकीय आरोग्यरक्षक उपकरणापर्यंत. या सेलमध्ये रासायनिक प्रक्रिया करण्यात येऊन वीजनिर्मिती होत असते. त्यासाठीच त्यात अँसिड व इतर घातक रासायनिक द्रव्ये असतात. वापरात नसलेल्या किंवा संपलेल्या बॅटरीचा प्रसंगी स्फोट होऊन इजा होण्याची भीती असते. म्हणूनच वापरून झालेले सेल वेळीच व काळजीपूर्वक नष्ट करावे लागतात आणि लहान मुलांच्या हातांत तर ते मुळीच लागणार नाहीत, याची दक्षता घ्यावी लागते.
त्यातच वैद्यकीय उपकरणांसाठी अशा बॅटरीचा वापर जर करायचा असेल किंवा शरीरामध्येच रोपण केल्या जाणार्या वैद्यकीय यंत्रासाठी असा सेलही त्यात बसवायचा असेल, तर किती तरी जास्त काळजी घ्यावी लागते. सुरक्षित वेष्टने, निचरा होण्याची निर्धोक व्यवस्था, वेळीच इशारा देणारी यंत्रणा या सर्वांचा वापर करूनही धोका व त्यामुळेच काळजीही शिल्लक राहतेच. विरघळून जाणारी निर्धोक बॅटरी
आता मात्र अशी काळजी घेण्याची गरज उरणार नाही. एका नव्या संशोधनामुळे बॅटरीचा शरीराला होऊ शकणार्या अपायाचा धोका जवळजवळ पूर्णपणे संपुष्टात येऊ शकेल, असा आशेचा किरण निर्माण झाला आहे. काम झाल्यावर सुरक्षितपणे विरघळून जाऊ शकणार्या बॅटरीचे युग येऊ घातले आहे. कानॅगी मेलन विद्यापीठामधील एका संशोधकांच्या गटाने बायोडिग्रेडेबल अशी विरघळून जाणारी बॅटरी तयार तयार केली आहे. विद्यापीठातील या संशोधन गटाचे प्रमुख प्रा. ख्रिस्तोफर बेटिंजर यांनी नुकतीच अशा प्रकारच्या बॅटरीची यशस्वी चाचणी केली.
आम्लाऐवजी माशाची शाई
सध्या वापरल्या जाणार्या बॅटरीमध्ये प्रामुख्याने लिथियन व इतर विषारी विद्युतवाहक घटक असतात. त्यामुळे वीजनिर्मिती चांगली होत असली, तरी हे घटक शरीराला अपायकारक असतात. शरीरामध्ये वापरावयाच्या वैद्यकीय उपकरणांतील संवेदक यंत्रे, पेसमेकर अशांमध्ये या बॅटरींचा वापर धोकादायक ठरू शकतो. आता बेटिंजर यांच्या शास्त्रज्ञगटाने बॅटरीत रासायनिक द्रवांऐवजी 'कटलफिश' नावाच्या माशाच्या शरीरातून सोडल्या जाणार्या शाईचा वापर केला आहे. ते पूर्णपणे जोखीममुक्त असते. एवढेच नव्हे, तर कालांतराने कार्यभाग संपल्यावर ते आपोआप विरघळूनही जाते. त्याचा शरीराला कसलाही धोका शिल्लक राहत नाही. साधे सेलही त्यांचा कार्यभाग संपल्यानंतर यामुळे निर्धोक होतात. त्यांच्यापासून काळजी घेण्याचे कारणच उरत नाही.
वारंवार शस्त्रक्रिया नको
पूर्वी शरीरामध्ये रोपण केलेले वैद्यकीय संयंत्र चालविणार्या बॅटरीला सुरक्षेसाठी संरक्षक कवच तर घालावे लागेच; परंतु बॅटरीची कालर्मयादा संपल्यानंतर ती पुन्हा बाहेर काढण्यासाठी व नव्याने बसविण्यासाठी परत शस्त्रक्रियाही करावी लागे.
आता ही भीती आणि धोका संपूर्णपणे समाप्त होईल. नव्याने येऊ घातलेली बॅटरी पूर्णपणे कार्यक्षम तर असेलच, पूर्वीच्या बॅटरीपेक्षा तिची कालर्मयादा फार मोठी असेल. शिवाय, शरीरातील यंत्राला वीजपुरवठा करण्याचे काम संपल्यावर ती निर्धोकपणे विरघळून जाईल.
No comments:
Post a Comment