Ita Karina Reena इटा करिना
रिना तेजोमेघ साध्या डोळ्यांनाही दिसतो. सध्या हा तेजोमेघ मध्यरात्रीच्या सुमारास बरोबर दक्षिणेला दिसत आहे. त्याची क्षितिजावर उंची फक्त सुमारे ८ अंश असल्यामुळे त्याला सहज ओळखणे थोडे अवघड आहे. ज्या तार्याच्या नावाने तो ओळखला जातो, तो तारा आहे इटा करिना.
इटा करिना हा तारा आपल्यापासून सुमारे साडेसात ते आठ प्रकाशवर्षे दूर असल्याचा अंदाज आहे. शास्त्रज्ञांचे मत आहे, की हा कदाचित एकापेक्षा जास्त तार्यांचा समूह असावा; पण हा समूह या लाल तेजोमेघात दडलेला असल्यामुळे हे तारे आपल्याला दिसत नाहीत. इटा करिनाचे हे चित्र एका विशिष्ट प्रकारच्या उपकरणाचा वापर करून घेण्यात आले आहे. यात तेजोमेघाच्या वर्णपटलाचे चित्रण करून अशी चित्रे तयार करण्यात येतात.
यातील मुख्य तारा निळ्या रंगाचा आहे. अशा तार्यांच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे १0,000 अंश सेल्सिअस असते. वस्तुमान सूर्याच्या १२0 पट आहे. निरीक्षणातून असा अंदाज करण्यात येतो, की एके काळी याचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या १५0 पट होते. दुसरा तारा हा एक तप्त महाराक्षसी तारा आहे, ज्याचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या सुमारे ३0 पट आहे.
गेल्या २00 वर्षांत इथे अनेक स्फोटक घटनांची नोंद झाली आहे. खगोलशास्त्रीय निरीक्षणे सांगतात, की १८४३ मध्ये हा आकाशातील सर्वांत प्रखर तारा होता. मग, याची तेजस्विता कमी होत गेली व १८६८मध्ये हा दिसेनासाच झाला. त्यानंतर गेल्या २५ वर्षांत हा परत प्रखर होत गेला. आता तो साध्या डोळ्यांनाही दिसतो. त्यातच १९९८-९९ मध्ये याची प्रखरता अचानक दुप्पट झाली होती. अशी दाट शक्यता आहे, की या तार्याचा अंत एक महास्फोटात होईल.
No comments:
Post a Comment