गुरूचा ग्रेट रेड स्पॉट | Red Spots of Jupiter Planet
सॅम्युअल हेनरी स्वॅब या र्जमन हौशी आकाश निरीक्षकाने १८३१ मध्ये रेखांकित केलेल्या चित्रात हे वादळ आपल्याला दिसते. पण याचे खर्या अर्थाने निरीक्षण १८७८ पासून सुरू झाले. पण याच्या निरीक्षणाचा उल्लेख इटालियन खगोलशास्त्रज्ञ कॅसिनी याने १६६५ मध्ये केला होता. हे वादळ नेमकं का आणि कशा प्रकारे सुरू झालं असेल याची आपल्याला अजून कल्पना नाही. पण ज्या प्रकारे हे वादळ अजूनही चालू आहे म्हणजे ते कदाचित खूप आधीपासून चालू असावे. पण एक नक्की, की ४00 वर्षांपूर्वी याचा आकार आजच्यापेक्षा दुप्पट होता. म्हणजेच या वादळाचे आकुंचन होत आहे आणि शास्त्रज्ञांचे मत आहे, की एकेकाळी बर्यापैकी लांबट असलेल्या वादळाचा लांबटपणा कमी होत आहे आणि सन २0४0 पयर्ंत हे गोलाकार दिसू लागेल. सध्याची लांबी २0 हजार कि.मी. तर रुंदी बारा हजार किलोमीटर आहे. म्हणजे लांबीत पृथ्वी आणि मंगळ यांना आपण शेजारी शेजारी ठेवू शकू. वादळाच्या कडेच्या भागात गती ४३0 किलोमीटर दर ताशी इतकी आहे पण मध्यभागी मात्र ती जवळजवळ शुन्य आहे. हे वादळ आपल्या जागेवरून उत्तर किंवा दक्षिणेस सरकत नाही पण पूर्व पश्चिम गती मात्र कमीजास्त होते. या वादळाचा रंग तांबूस का याचे पण आपल्याकडे खात्रीशीरउत्तर नाही. पृथ्वीवर प्रयोगशाळेत केलेल्या प्रयोगातून असा निष्कर्ष निघतो की याचा रंग काही जटील सेंद्रिय रेणू, लाल फॉस्फरस किंवा सल्फरच्या रंगामुळे आला असावा.
No comments:
Post a Comment