डिमोस उपग्रहा
मंगळाच्या दुसर्या उपग्रहाचे नाव डिमोस - त्याचा अर्थ दहशत असा आहे. याचा
शोध इसॉप हॉल यांनी फोबोसच्या शोधाच्या सहा दिवस आधी म्हणजे १२ ऑगस्ट १८७७
रोजी लावला. याचे एकूण गुणधर्म पाहता हा फोबोसचा जुळा भाऊच आहे.
शास्त्रज्ञांचे असेही मत आहे, की कदाचित फोबोस आणि डिमोस एकाच मोठय़ा
लघुग्रहाचे दोन तुकडे असावेत.
याचा आकार फोबोसच्या सुमारे निम्मा आहे.
ओबडधोबड आकाराच्या या मंगळाच्या उपग्रहाचा आकार १५X१२.२X११ किलोमीटर आहे.
याची घनता १.४६ ग्रॅम वर्ग सें.मी. निश्चित करण्यात आली आहे. याचा मुक्त
वेग दर सेकंदाला ५.६ मीटर किंवा सुमारे तासाला २0 कि.मी. आहे.
डिमोस
मंगळाच्या क्षितिजावर पूर्वेला उगवून पश्चिमेला मावळतो. मंगळ आपल्या
अक्षावर एक फेरी २४.७ तासांत पूर्ण करतो, तर डिमोसला त्याची एक फेरी पूर्ण
करण्याकरिता ३0.४ दिवस लागतात. यामुळे डिमोस मंगळाच्या क्षितिजावर जवळ जवळ
२.७ दिवस असतो. पण, याची कक्षादेखील मंगळाच्या विषुववृत्ताच्याच पातळीत
असल्यामुळे हा मंगळाच्या ८२.७ अंश रेखांशाच्या उत्तरेवरून किंवा उणे ८२.७
अंश रेखांशाच्या दक्षिणेतून दिसत नाही. हा सुमारे २३,४६३ किलोमीटर
अंतरावरून मंगळाची परिक्रमा करतो; तर याचा आपल्या कक्षेत वेग १.३५ किलोमीटर
दर सेकंद किंवा ४८00 किलोमीटर दर तासाला इतका आहे. फोबोससारखा याचादेखील
सूर्याच्या बिंबावरून प्रवास होताना दिसतो. हा ग्रहणाचाच एक प्रकार आहे.
याला अधिक्रमण असे म्हणतात. मंगळावरून बघताना डिमोसचा कोनीय व्यास
सूर्याच्या कोनीय व्यासाच्या एक दशांश आहे. तसेच, याचे अधिक्रमण फक्त दोन
मिनिटाचे असते. डिमोसवरती यान उतरवून तिथल्या मातीचे नमुने पृथ्वीवर
आणण्याच्या एका मोहिमेची कल्पना मांडण्यात आली आहे. या मोहिमेला गलिव्हर
असे नावही सुचवले आहे; पण सध्या ही फक्त कल्पनाच आहे.