Blogroll

सूर्य तेजोनिधी लोहगोल

सूर्य तेजोनिधी लोहगोल


समाजावर नेहमीच पौराणिक कथांचा प्रभाव राहिला आहे. आपणही रामायण, महाभारताच्या कथा ऐकूनच लहानाचे मोठे झालो आहोत. या विविध पौराणिक कथांमधूनच आपल्याला निसर्गातील अनेक घटकांची, ग्रह-तार्‍यांची ओळख देवीदेवतांच्या रूपाने होत असते. असाच एक तारा ज्याबद्दल पौराणिक कथांपासून ते आधुनिक विज्ञानयुगापर्यंत प्रत्येक मनुष्याला नेहमीच कुतूहल वाटत आलेलं आहे.
हा तारा म्हणजे सूर्य. ज्याला पुराणांमध्ये देवाची जागा मिळाली आहे. रामायणातील बाल हनुमानाची गोष्ट तुम्हाला आठवतच असेल. पृथ्वीवरून दिसणारा हा लाल गोळा बाल हनुमानाला आकर्षित करून गेला, तसाच तो प्रत्येकाला आकर्षित करत असतो. प्रत्येकाच्या मनाच्या कोपर्‍यात कुठेतरी सूर्याविषयी अनेक प्रश्न घर करून असतात. ज्याच्या उगविण्याने व मावळण्याने सृष्टीत अनेक बदल घडतात, त्या सूर्याविषयी आपल्याला फारशी माहिती नसते.
सजीवांच्या जगण्याचा अविभाज्य घटक
पृथ्वीवरच्या प्रत्येक सजीवाच्या जीवनाचा अविभाज्य घटक असलेला सूर्य, आपल्या ग्रहमालेचा मध्यबिंदू आहे. सूर्यमालेचा जीव असणार्‍या या तार्‍याचा प्रभाव पृथ्वीसोबतच अन्य ग्रहांवरही असतो. सूर्याच्या उष्णतेच्या व शक्तीच्या प्रभावाशिवाय पृथ्वीवर जीवन असणे अशक्य आहे. या ब्रह्मंडात अनेक सूर्य व त्यांचा ग्रहमालिका अस्तित्वात आहेत.
सूर्य- एक तारा
सूर्य हा एक तारा आहे. ज्याला कुठलाही भरीव किंवा ठोस असा पृष्ठभाग नाही. हा एक वायूचा भला मोठा गोळा आहे, ज्यात ९३ टक्के हायड्रोजन आणि साधारण ७.८ टक्के हेलिअम वायू आहे.
सूर्य हा आपल्या सौर यंत्रणेचा मध्यबिंदू आहे. सूर्य हा एखादा दरवाजा समजले, तर पृथ्वी त्याची कडी भासेल इतकी ती सूर्याच्या तुलनेत लहान आहे. सूर्याला ठोस असा पृष्ठभाग नसल्याने सूर्यावर अनेक ठिकाणी वेगवेगळी फिरण्याची गती सापडते. सूर्यावरील वातावरणाचा विचार केला, तर सूर्यावर अनेक ठिकाणी काळे डाग आढळतात. वातावरण तप्त असते.
स्ाूर्याच्या बाहेरचे वातावरण
कोरोना हा सगळ्यात छोटा ग्रह प्लुटोपर्यंत पसरलेला आहे. सूर्याच्या भोवताली ८ ग्रह फिरतात. यापैकी ५ ग्रह आकाराने अतिशय छोटे आहेत. याशिवाय हजारो लघुग्रह, लाखो धुमकेतू व अनेक उल्कापिंडे ही सूर्याभोवती फिरत असतात. सूर्याला कुठलेही कडे नाही. सूर्यावरून येणार्‍या वादळांचा अभ्यास करून अंतरिक्षातील याने व शास्त्रज्ञ सूर्याबद्द्ल अधिकाधिक माहिती जमा करीत असतात. जेनिसीस हे यान 'नासा'ने विशेष करून सूर्याचा अभ्यास करण्याकरिताच बनविलेले आहे.
सूर्याच्या मध्यभागात तापमान १५ दशलक्ष डिग्री सेल्सिअस (२७ दशलक्ष डिग्री फरेनाईट) आहे. सूर्यावरील भाग ५00 किलोमीटर जाड थराने तयार झाला आहे, ज्यावरून सूर्याची उष्णता उत्सर्जित होऊन बाहेरच्या वायुमंडळामध्ये दाखल होते. सूर्यप्रकाशाच्या एका किरणाला पृथ्वीवर पोहोचण्याकरिता ८ मिनिटे लागतात.

No comments:

Post a Comment