वनस्पतींनाही असतात चाके
वाहनांना चाके असतात, पण वनस्पतींना ती कशी असतील? ही निसर्गाची किमया आहे.
वाळलेल्या वनस्पतींचा बिया असलेला भाग वार्याने तुटून पडतो व
वार्याबरोबरच जमिनीवरून गोलगोल फिरत एखाद्या ठिकाणी जाऊन थांबतो व तिथेच
रुजतो. के असलेल्या गाड्या वापरणे हे तंत्र इतके सोपे आणि सर्वमान्य आहे,
की एखाद्या शास्त्रज्ञाने केलेल्या संशोधनाची हेटाळणी करावयाची असेल, तर
त्याने 'चाकाचा नव्याने शोध लावलाय,' अशा शब्दांत त्याची चेष्टा केली जाते.
हवेतून संचार, परावर्तित लहरींचा वापर करून अंधारातून किंवा धुक्यातून मार्ग शोधणे, विजेचा वापर, कॅमेरा, रॉकेट इ. अनेक तंत्रे मानवाने शोधण्यापूर्वीपासून ती प्राणिजगतात वापरली जात होती; पण चाकासारखी अत्यंत सोपी आणि सोयिस्कर प्रणाली निसर्गाने भूचर प्राण्यांच्या बाबतीत का वापरली नसावी, असा प्रश्न स्वाभाविकपणे आपल्या मनात उद्भवतो. या प्रश्नाचे उत्तर असे आहे, की चाके वापरण्यासाठी रस्ते किंवा रूळ अशा टणक आणि गुळगुळीत पृष्ठभागाची गरज असते.
निसर्गात असे रस्ते कोठेच नसतात आणि दुसरे म्हणजे झाडावर चढणे, दगड-धोंड्यांमधून, कडेकपार्यांतून आणि चिखलातून वाट काढणे अशा क्रियांमध्ये निसर्गात वावरणार्या भूचर प्राण्यांना चाकांची मदत न होता उलट अडचणच होईल. आपण मानवही घराबाहेर चाके वापरतो; पण पायर्या आणि उंबरठे असलेल्या घरात चाके असलेल्या गाड्या किंवा चाके लावलेले बूट वापरत नाही. बंदिस्त अशा वास्तूत चाकांचा वापर हा अगदी अलीकडल्या काळात होऊ लागला आहे आणि तोही रुग्णालये, विमानतळ आणि शॉपिंग मॉल अशा अगदी मोजक्या ठिकाणीच.
या तिन्ही ठिकाणी चाके असलेल्या गाड्या वापरता येतील असे सपाट किंवा कमी उतार असलेले प्रतल मुद्दाम निर्माण केलेले असतात व त्यामुळेच तेथे चाके वापरणे शक्य होते; परंतु चाकासारखे गोल गोल फिरत जमिनीवरून प्रवास करावयाचा हा प्रकार प्राणिजगतात नसला, तरी वनस्पतिजगतात मात्र दिसून येतो. अनेक हंगामी द्विदल वनस्पती बीजोत्पत्तीनंतर वाळून जातात. एका कमकुवत वाळक्या खोडाच्या आधारे उभा राहिलेला त्यांचा डोलारा वार्याच्या जोराने खोडापासून तुटतो आणि अशा वनस्पती मग एखाद्या चेंडूप्रमाणे गोल-गोल फिरत आणि वाटेत आपले बी टाकीत वार्याने दूर दूर नेल्या जातात

No comments:
Post a Comment