Blogroll

किरणोत्सर्गी उपचार

 किरणोत्सर्गी उपचार

 किरणोत्सर्गी उपचार

आय.एम.आय.टी.- यामध्ये रुग्णाच्या कर्करोगग्रस्त अवयवावर सोडलेल्या प्रकाशझोताचे पुन्हा उपविभाग करून छोटे छोटे झोत बनवले जातात. या प्रत्येक उपविभागातून जाणारा किरणोत्सर्ग संगणकाद्वारे नियंत्रित केला जातो. यामुळे कर्करोगाच्या पेशीवर थोडा जास्त किरणोत्सर्गाचा मारा करता येतो आणि बाजूच्या निरोगी पेशींवर होणारा मारा सौम्य करता येऊ शकतो. यामध्ये बाह्य प्रकाशझोत किरणोत्सर्गी उपचार यंत्र किंवा टेलिथेरपी आजही अनेकदा वापरला जातो. यंत्नाची रचना

टेलिथेरपी यंत्र एकात एक गुंफलेल्या वर्तुळाकार भागांनी बनलेले असते.
१ शिशापासून बनलेले आंतरराष्ट्रीय मानकानुसार बनलेला किरणोत्सर्गी पदार्थांना पकडून ठेवणारा बाह्य भाग.
२ त्याच्या आतील एक लोखंडी वर्तुळाकृती पट्टी
३ किरणोत्सर्गाचा उगमस्रोत- एखाद्या डबीसारख्या दिसणार्‍या ३0 मि.मी. आकाराच्या या भागाच्या आत कोबाल्ट-६0 किंवा तत्सम किरणोत्सर्गी पदार्थ ठेवलेला असतो. त्यांच्या भोवती युरेनियम किंवा टंगस्टनने बनलेले एक संरक्षक कवच असते. या सर्व गोष्टींना सामावणारे स्टेनलेस स्टीलने बनलेले दुपदरी आवरण आणि तसेच दुपदरी झाकण असते.
४ एक विशेष मोजमाप वापरून बनवलेल्या क्ष-किरण यंत्राद्वारे उगमस्रोताच्या डबीतील किरणोत्सर्गी पदार्थामधून किरणोत्सर्गाचा झोत निर्माण केला जातो. शास्त्रीय तत्त्व
कर्करोगाच्या पेशीतील डी.एन.ए. किरणोत्सर्गी पदार्थांचा झोत त्यावर पाडून नष्ट करणे हे उपचाराचे मुख्य तत्त्व. डी.एन.ए. नष्ट करण्याचे कार्य या किरणोत्सर्गी प्रकाशझोतातील फोटॉन, बोरॉन, कार्बन, निऑन किंवा तत्सम किरणोत्सर्गाने प्रेरित कण करतात. हे कण कर्करोगाच्या डी.एन.ए.ला थेट नष्ट करतात किंवा कर्करोगाच्या पेशीतील पाण्याच्या कणांचे रूपांतर हायड्रोक्सील मुक्तरेणूमध्ये करतात. हे मुक्तरेणू त्या कर्करोगपेशीचे विघटन करून तिला नष्ट करतात. संशोधनाचा इतिहास
१८९५ मध्ये विल्हेम रॉन्टजेनने क्ष-किरणांचा शोध लावला. त्यानंतर वर्षभरातच अमेरिकेतल्या शिकागोमधील डॉ. एमिल ग्रब यांनी क्ष-किरणांचा वापर करून कर्करोगाचा इलाज करता येऊ शकेल असे प्रतिपादन केले. इ.स. १९00 मध्ये मादाम मेरी क्युरीने पोलोनियम आणि रेडियम या किरणोत्सर्गी संयुगांचा शोध लावला आणि या उपचारांसाठी एक नवे दालनच उघडले गेले. १९४0मध्ये कर्करोगाच्या इलाजासाठी कोबाल्ट आणि केझीयम या किरणोत्सर्गी पद्धती विकसित झाल्या. १९७0मध्ये सी.टी. स्कॅनचा शोध लावल्यावर त्या उपचारांची जागा लिनियर अँक्सिलरेटरने घेतली. तर १९८0 पर्यंत एम.आर.आय. आणि पेटस्कॅनचा वापर सुरू झाल्यावर आय.एम.आय.र्टी. आणि आय.जी.आय.टी. या अशा उपचारांच्या अत्याधुनिक पद्धती अस्तित्वात आल्या. प्रकार- किरणोत्सर्गी उपचारांचे तीन प्रकार आहेत
१. बाह्य प्रकाशझोत किरणोत्सर्गी उपचार- (एक्स्टर्नल बीम रेडिएशन थेरपी) किंवा टेलिथेरपी
२.बंदिस्त स्रोत किरणोत्सर्गी उपचार- (सील्ड सोर्स रेडिएशन थेरपी) किंवा ब्रेकिथेरपी
३. रक्ताद्वारे किरणोत्सर्गी संयुगे देऊन उपचार- (रेडिओ आयसोटोप थेरपी) र्करोगाच्या सुरुवातीच्या अवस्थेत त्याचे निदान झाले तर शस्त्रक्रियेद्वारे रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो. आधुनिक वैद्यकशास्त्रामुळे हे शक्य झाले आहे; पण दुर्दैवाने आपल्या देशात बहुसंख्य रुग्ण हे आजार खूप वाढल्यानंतरच उपचारासाठी येतात. अशा वेळी डॉक्टर त्यांना 'लाईट घेण्याचा' उपाय सांगतात, यालाच क्ष-किरणांद्वारे केले जाणारे किरणोत्सर्गी उपचार म्हणतात. अशा अंतिम अवस्थेतील कर्करोगाचा इलाज करणार्‍या डॉक्टरांसाठी ते हार निश्‍चित असलेले एक प्रकारचे युद्ध असते; पण तरीही त्या रुग्णाचे आयुष्य काही वर्षांनी वाढविणे यामुळे शक्य होते. मानवी बुद्धिमत्तेनेही हात टेकलेला आजार म्हणजे कर्करोग. आजच्या आधुनिक काळातही मानवासाठी तो असाध्यच आहे, मात्र विविध प्रकारचे संशोधन, औषधे, उपकरणे यातून त्याची तीव्रता कमी करणे शक्य झाले आहे. रेडिओथेरपी ही अशीच उपचारपद्धती आहे. रुग्णाचे आयुष्य यामुळे वाढू शकते.

No comments:

Post a Comment