Blogroll

देखणे नारंगी पोवळे

 देखणे नारंगी पोवळे

समुद्र म्हणजे नैसर्गिक गोष्टींचा फार मोठा खजिनाच आहे. काही समुद्री प्राण्यांच्या स्रावापासून पोवळ्यासारखे रत्न तयार होते. अशी काही प्राणिज रत्ने सापडत असल्यामुळेच समुद्राला 'रत्नाकर'ही म्हणत असावेत. वरत्नातील प्रवाळ हे रत्न मोत्याप्रमाणेच सागरी प्राण्यांच्या जीवनप्रक्रियेतून तयार होणारे प्राणिज वर्गातील रत्न आहे. प्रवाळ, पोवळे, पवलम, मंगळ, मुंगा किंवा इंग्रजीत या नावाने ओळखल्या जाणार्‍या या रत्नाचा काठिण्य क्रमांक ३ ते ३.५ आहे. विशिष्ट गुरुत्व २.६ असून, वक्रीभवनांक १.५५ असतो. रासायनिकदृष्ट्या पोवळ्यात मुख्यत: कॅल्शियम काबरेनेट, तसेच अल्प प्रमाणात लोह किंवा मॅग्नेशियम असते. या अल्प प्रमाणातील लोह किंवा मॅग्नेशियममुळेच प्रवाळांना तांबडा, नारिंगी, काळा असे वेगवेगळे रंग येतात. तसे बघायला गेले तर प्रवाळ हे एक नाजूक, नरम व रासायनिक परिणाम सहज होणारे प्राणिजरत्न आहे. पण मोहक लाल, नारिंगी रंग व त्याला असलेली झिलई  घेण्याची क्षमता या त्याच्या अंगच्या गुणांमुळेच त्याचा अंतर्भाव रत्नात केलेला आहे.
उबदार हवामानात, उथळ सागरी पाण्यात वाढणार्‍या सीलेंटेरेटा या प्राणिसंघातील, मुख्यत: अँथोझोआ या वर्गातील प्राण्यांनी स्वत:भोवती स्रवलेल्या सांगाड्यांचे तयार झालेले साठे म्हणजे प्रवाळ. काही वेळा समुद्रात प्रवाळांच्या प्रचंड आकारमानाच्या भित्ती किंवा खडक तयार होतात. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे ग्रेट बॅरिअर रीफ. प्रवाळ भित्तीच्या परिसरातील समुद्रात विपुल जैवविविधता आढळते व त्यामुळेच आर्थिक उत्पन्नाच्या दृष्टीने हा भाग महत्त्वाचा असतो. इटली, ऑस्ट्रेलिया, जपान, फिलिपाइन्स येथे उच्चप्रतीचे पोवळे मिळते. भारतात मुख्यत: अंदमान निकोबार बेटांच्या परिसरात पोवळी आढळतात.
रंग, चमक, घट्टपणा, भरीवपणा इत्यादी गुणांवर पोवळ्याची किंमत अवलंबून असते. तांबड्या रंगाचे पोवळे सगळ्यात महाग असते. पोवळ्यावर कोणताही रंग चढवला जाऊ शकतो, पण अँसिटोनमध्ये बुडवलेला कापूस त्यावर घासल्यास रंग कापसावर लागतो. निकृष्ट पोवळ्याची भुकटी करून त्यापासून मूर्ती बनवतात. प्रवाळाचे मणी बनवून माळा तयार करतात. प्लॅस्टिक, काच, पोर्सेलिन इत्यादी पदार्थापासून प्रवाळाच्या अनुकृतीही बनवल्या जातात.
काष्ठसदृश रचना व पृष्ठभागावर बारीक सुतासारख्या रेषा ही प्रवाळ ओळखण्याची महत्त्वाची खूण आहे. प्रवाळापासून केलेल्या प्रवाळभस्माचे आयुर्वेदात अनेक उपयोग सांगितले आहेत.
जगात प्रवाळांच्या ८00पेक्षा जास्त जाती आहेत. त्यापैकी २५0 पेक्षा जास्त जाती भारतात आढळतात. या मुख्यत: अंदमान निकोबार बेटांच्या परिसरात तर थोड्या प्रमाणात लक्षद्वीप, मन्नारचे आखात व कच्छचे आखात या भागात सापडतात. मानवाच्या हस्तक्षेपामुळे गेल्या काही वर्षांत या प्रवाळांच्या अस्तित्वालाच मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या धोक्याबद्दल तसेच प्रवाळांचे आर्थिक व परिसरीय महत्त्व याबद्दल समाजात जागृती निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे.

जगातील पहिले छायाचित्र

 जगातील पहिले छायाचित्र


छायाचित्र कलेचा इतिहास तसा फार प्राचीन नाही. औद्योगिक क्रांतीबरोबरच ही कला विकसित होत गेली. सर्वच क्षेत्रांना त्याचा फार चांगला उपयोग झाला. विज्ञानक्षेत्रही याला अपवाद नव्हते. विज्ञानाशी संबंधित अशा काही छायाचित्रांची ओळख करून देणारे नवे सदर. ळाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत इटलीतील पीसा शहरातील फ्रायर लोक काच बनवण्याच्या कलेत निपुण झाले होते. फ्रायर हे ख्रिश्‍चन भिक्षुक. त्यांनी काचेची पारदर्शक गोलाकार अशी एक वस्तू तयार केली की जिचा मध्यभाग जरा जास्त फुगीर होता. अगदी मसूरच्या दाण्यासारखा. यातून बघितल्यावर आपल्याला जवळची वस्तू मोठी दिसते. मसूरला लेंटिल म्हणतात आणि त्यावरून या वस्तूला लेन्स म्हणण्यात येऊ लागलं.
या एका भिंगाने आपले जीवनच पलटून टाकले. ठराविक वयानंतर ज्यांना लहान अक्षरं वाचणं जमत नव्हतं ते आता या भिंगाच्या मदतीने वाचू शकत होते. मुख्य म्हणजे जे नुसत्या डोळ्यांना दिसणं शक्य नाही तेही आपण बघू लागलो. दुर्बिणीच्या माध्यमातून खूप दूरच्या गोष्टी, तर सूक्ष्मदश्रीच्या माध्यमातून खूप लहान गोष्टी बघणं शक्य झालं. त्यानंतरचा मोठा शोध म्हणजे छायाचित्रणाचा - जे फक्त आपल्यालाच दिसू शकतं, ते आता इतरांनाही दाखवणं शक्य झालं होतं. छायाचित्रणकलेच्या या शोधाने क्रांतीच केली. त्यातील अगदी सुरुवातीची छायाचित्र आजही पाहण्यासारखी आहेत. म्हणूनच यापुढे आपण विज्ञानाशी निगडित अशा काही नैसर्गिक सौंदर्यांच्या आविष्कारांची माहिती घेऊया. आजचं हे छायाचित्र आहे रासायनिक प्रक्रियेतून निसर्गाचं सौंदर्य कैद करणारं. फ्रेंच शास्त्रज्ञ जोसेफ निसेफोअर निप्स यांनी सन १८२६-१८२७ या दरम्यान ते घेतलं होतं. या चित्राला शीर्षक होते 'व्ह्यू फ्रॉम द विंडो एट ले ग्रास.' आपल्या घराच्या एका खिडकीतून त्यांनी हे छायाचित्र घेतलं. हे चित्र घेण्यास त्याला काही तास लागले होते.
त्या वेळी या प्रक्रियेला लाईट पेंटिंग म्हणत असत. त्याला फोटोग्राफी नाव दिलं जॉन हश्रेल यांनी. (युरेनसचा शोध लावणारे विल्यम हश्रेलचे सुपुत्र). फोटोग्राफी हा शब्द ग्रीक भाषेतून आला आहे - फोटो म्हणजे प्रकाश आणि ग्राफी म्हणजे आलेख. आपल्याकडे या प्रक्रियेला छायाचित्रण असे नाव रुजू झाले. पण, काहींचे म्हणणे होते, की याला प्रकाशचित्रण म्हणायला पाहिजे.

शुभ्रधवल देवमासा

 शुभ्रधवल देवमासा | White Whale

देवमाशांच्या जाती, उपजातींचे सातत्याने निरीक्षण आणि नोंदणी करण्यात येते. अमेरिकेतील न्यू इंग्लंड भागातील नॅशनल अक्वेरिअमचे संचालक डॉ. स्कॉट क्रॉस यांनी देवमाशांवर (व्हेल्स) प्रचंड संशोधन केले आहे. त्यांना सन २000 मध्ये जॉजिर्या आणि फ्लोरिडा प्रांताच्या किनारपट्ट्यांजवळील सागरी प्रदेशात संपूर्णपणे शुभ्रधवल रंगांच्या जन्म घेतलेल्या पिल्लांची माहिती मिळाली. देवमाशाचे मांस रुचकर आणि त्यांच्या शरीरातील तेल (चरबी) उपयुक्त असल्याने त्यांची मोठय़ा प्रमाणावर शिकार केली जाते. ल ऊर्फ देवमासा म्हणजे जलचर प्राण्यांमधील महाकाय भव्य प्राणी. देवमाशांच्या अनेक जाती, उपजाती आहेत. सरासरीने प्रत्येक प्रौढ देवमाशाचे वजन एक ते दीड टन, लांबी पंधरा ते वीस फूट असते. पसरट, शक्तिवान शेपटीमध्ये जबरदस्त ताकद असते. शेपटीच्या तडाख्याने लहान, मध्यम बोटी उलट्यापालट्या होतात. ही उपजात अगदी नाश होण्याच्या टप्प्यात आहे. १९९0 नंतर प्रथमच 'नॉदर्न राईट व्हेल' आढळून आले. सर्व व्हेल जातींच्या माशांचा रंग काळसर, राखाडी असतो.
व्हे या माशांना शास्त्रीय भाषेत 'नॉदर्न राईट व्हेल्स' नावाने संबोधण्यात येते. या माशांना शास्त्रीय भाशेत 'नॉदर्न राईट व्हेल्स' नावाने संबोधण्यात येते. या माशाच्या अस्थींपासून विविध प्रकारच्या वस्तू तयार करतात. या माशाच्या अस्थींपासून विविध प्रकारच्या वस्तू तयार करतात.

सुनामी

सुनामी


मानवासाठी समुद्र फायदेशीर आहे, तितका धोकादायकही. सुनामीसारखे संकट त्यातून कधी येईल सांगता येत नाही. सन २00४ च्या सुनामीने हाहाकार उडवला असला, तरी त्यातून या संकटाचा अभ्यास करता येणे शक्य झाले. रताचा सुनामीशी फारसा परिचय नव्हता. क्राकाटोआच्या सन १८८३ मधल्या स्फोटक उद्रेकाच्या वेळी निर्माण झालेली सुनामी नक्कीच भारतीय किनार्‍यावर थडकली असणार. कारण तिने पृथ्वी प्रदक्षिणा केली होती. पण त्या वेळी भारताची लोकसंख्या बरीच कमी होती. त्यामुळे त्या सुनामीने किनार्‍याला मारलेल्या धडकेने फारसं नुकसान झालं नसावं. त्या काळात अशा गोष्टी या 'देवाची करणी' या सदरात मोडत असत. शिवाय अशा घटनांची नोंद करणं हे ब्रिटिशांना ठाऊक होतं; भारतीयांना मात्र ते नीटपणे अंगवळणी पडलेलं नव्हतं. ज्याअर्थी वृत्तपत्रांनी क्राकाटोआच्या स्फोटक उद्रेकाची दखल घेताना सुनामीचा उल्लेख केलेला नाही, त्याअर्थी त्या सुनामीमुळे फारशी मनुष्यहानी झालेली नसावी, असं आपण म्हणू शकतो.
याउलट २६ डिसेंबर २00४ च्या सुनामीने भारताचा आग्नेय किनारा, श्रीलंका, मलेशिया, थायलंड आणि इंडोनेशियात जे थैमान घातलं त्यामुळे ती गाजली. सध्याच्या युगात बातम्या झपाट्याने पसरतात. त्याची लगेच दखल घेतली जाते. सागर किनार्‍याजवळची वस्ती वाढलेली आहे. याशिवाय बरेच पर्यटक हौसेने सागरकिनारी पुळणीवर, चौपाटीवर जाऊन सुट्टी घालवतात. यामुळे या सुनामीने नैसर्गिक तांडवाचा एक जबरदस्त फटका या भागाला दिला, असं म्हटलं तर वावगं होणार नाही. २६ डिसेंबर २00४ च्या सुनामीत किती व्यक्ती वाहून गेल्या, याची खातरजमा व्हायला एक वर्ष जावं लागलं. वर्षअखेरीस सुमारे सव्वादोन लाख व्यक्तींचे बळी या सुनामीने घेतले, तर दहा लाख लोकांना या सुनामीने बेघर केलं, अशी आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्या सुनामीमुळे एक गोष्ट प्रकर्षाने पुढे आली, ती म्हणजे वेगवेगळ्या कारणांमुळे किनार्‍यांजवळची मानवी वस्ती वाढत आहे. त्यामुळे इथून पुढे सुनामींमुळे होणारं नुकसान वाढतच जाणार आहे, यात शंकाच नाही.
ही सुनामी मानवी इतिहासातील सर्वाधिक अभ्यास झालेली आणि बारकाव्यांसह जिची छायाचित्रांसह लेखी नोंद झाली अशी सुनामी ठरली. यामुळे 'सुनामी'चं संकट येतं कसं, त्यात काय घडू शकतं, नक्की काय घडलं आणि हे संकट कसं टाळता येईल, त्याने होणारं नुकसान कमी करता येईल याबाबत या सुनामीच्या अभ्यासकांना बरेच दुवे मिळाले. बर्‍याच पर्यटकांनी त्यांचा जीव धोक्यात असतानादेखील प्रसंगावधान दाखवून या लाटांचं व्हिडिओ कॅमेर्‍याच्या साह्याने चित्रीकरण केलं. काहींनी त्यांचे अनुभव लिहून काढले. याची शास्त्रज्ञांना खूपच मदत झाली. सर्व सुनामीचं मूळ विशिष्ट प्रकारच्या भूकंपांशी निगडित असतं. ते कसं हे माहीत करून घेण्यासाठी आधी भूकवचाच्या रचनेची एका प्रयोगातून थोडी माहिती घेणे गरजेचे आहे. घरात थोडे दूध तापवायला ठेवा. मध्यम आचेच्या गॅसवर दुधाचं पातेलं ठेवलं तर दूध भराभरा ऊतू जात नाही व मोठय़ा ज्वालेवर ते ठेवलं तर लगेचच उतू जातं, हे यातून लक्षात येईल. पृथ्वीच्या जन्मकाळी खूप मोठय़ा पेटत्या गॅसवर दूध ठेवावं तशी परिस्थिती होती. आता ती तशी राहिलेली नाही.
ही दुधाच्या तापण्याची प्रतिमा थोडी अपूर्ण आहे. कारण पृथ्वीमध्ये आधी संपूर्ण पृष्ठभागावर दाट साय जमा होते. सायीचा थर दाट झाला, की जिथं पातेल्याच्या बुडाला पेटलेला गॅस तापवत असतो, त्या भागाच्या वर उकळी फुटते आणि सायीचे या उकळीच्या भोवती जर विस्तव बरोबर मधोमध असेल तर सारखे चार भाग होतात. दूध तसंच तापू दिलं तर ही साय कडेने खाली जाते, परत वर येते, सांधते, फुटते. काही वेळाने दूध वर येतं, पातेलं लहान असेल तर उतू जातं. यातल्या सायीचे भाग होऊन ती खाली जाऊन परत उकळीबरोबर वर येते. या क्रियेप्रमाणे क्रिया भूकवचाच्या बाबतीतही घडत असते. जिथे पृथ्वीच्या कठीण कवचावर कवचाचा दुसरा तुकडा खाली भूगर्भाच्या दिशेने दाबला जातो. या ठिकाणी भूकंपाचे धक्के बसतात. काही वेळा भूकवच एखाद्या सागरतळाच्या खोल दरीत जाते. त्या वेळी जे भूकंप घडतात त्यांच्यामुळे सुनामी उद्भवते. याचं कारण इथे पाणी जोरात हलवलं जातं. अशा सुनामींनी अनेकवार मानवी इतिहासात हाहाकार घडवून आणल्याच्या नोंदी आहेत. अशा सुनामींची माहिती आणि सुनामींच्या वेळचं आपत्ती व्यवस्थापन याची माहिती जाणून घेतल्यामुळे अशा वेळी काय करणं आवश्यक ठरतं, याचं ज्ञान आपल्याला होतं.