Blogroll

धूमकेतू आकाशातला पाहुणा Comet in the Sky

धूमकेतू  आकाशातला पाहुणा Comet in the Sky 

धूमकेतू  आकाशातला पाहुणा Comet in the Sky


पृथ्वी ज्याप्रमाणे सूर्याभोवती फिरते, त्याचप्रमाणे इतर ग्रहसुद्धा वेगवेगळ्या लंबगोलाकार कक्षांमधून सूर्याभोवती फिरत असतात, हे तुम्हाला माहीत आहे. सूर्यमालेतल्या ग्रह आणि उपग्रहांप्रमाणेच धूमकेतूसुद्धा सूर्याभोवती फिरत असतात. फरक इतकाच की धूमकेतू हे खूप मोठय़ा कक्षांमधून सूर्याभोवती फिरत असल्याने ते क्वचितच सूर्याजवळ येतात. धूमकेतू सूर्याजवळ येतात, तेव्हा ते आपल्याला दिसण्याची शक्यता असते.
धूमकेतू म्हणजे गोठलेला कार्बन डायऑक्साईड वायू, बर्फ आणि धूलिकण यांचा गोळा असतो. जसजसा धूमकेतू सूर्याजवळ यायला लागतो, तसंतसं सूर्याच्या उष्णतेमुळे त्याचं तापमान वाढायला लागतं. तापमान वाढल्यामुळे धूमकेतूमधले वायू प्रसरण पावतात आणि धूमकेतूला लांबच लांब शेपूट फुटते.
असाच एक धूमकेतू सध्या आपल्या भेटीला आला आहे. या धूमकेतूचं नाव आहे 'आयसॉन.' सध्या आयसॉन धूमकेतू दुर्बिणीच्या किंवा बायनॅक्युलरच्या मदतीने पाहता येतो. साधारणपणे १८ नोव्हेंबरपासून हा धूमकेतू सूर्योदयापूर्वी पहाटे पूर्व दिशेला कन्या तारकासमूहातल्या चित्रा तार्‍याजवळ पाहता येईल. २८ नोव्हेंबरच्या सुमारास तो नुसत्या डोळ्यांनीही दिसू शकेल असा अंदाज आहे. काही वेळा सूर्याच्या उष्णतेने धूमकेतूचे तुकडे होतात. आयसॉन धूमकेतू जर सूर्याच्या उष्णतेने फुटला नाही, तर डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अत्यंत तेजस्वी अशा आयसॉन धूमकेतूचं दर्शन आपल्याला होईल.
आयसॉन धूमकेतूचा शोध विताली नेवेस्की आणि आर्टिअम नोविचोनोक या दोन रशियन खगोलशास्त्रज्ञांनी २४ सप्टेंबर २0१२ या दिवशी दुर्बिणीतून आकाश निरीक्षण करताना लावला. या धूमकेतूचं शास्त्रीय नाव आहे - ू/2012 २1. या नावातल्या ह्यू चा अर्थ असा आहे, की हा धूमकेतू ठरावीक कालावधीनंतर सूर्याच्या जवळ येणार्‍या धूमकेतूंसारखा नाही. आयसॉन धूमकेतू एकदाच सूर्याच्या जवळ येणार असल्याने हा धूमकेतू परत आपल्याला दिसणार नाही. म्हणूनच आपल्या भेटीला एकदाच येऊ शकणार्‍या या आकाशातल्या पाहुण्याचं आपण जोरदार स्वागत करायला हवं! पण या धूमकेतूच्या दर्शनासाठी तुम्हाला पहाटे लवकर उठायला मात्र लागेल. मग काय, आहे ना तयारी तुमची?

No comments:

Post a Comment