Blogroll

कीटका द्वारे कीटकांचा नाश पॅरासायटॉइड परउपजीवी

कीटका द्वारे कीटकांचा नाश  पॅरासायटॉइड परउपजीवी

कीटकांचा नाश करायचा असेल तर त्यांना मारणार्‍या दुसर्‍या कीटकांचा त्यासाठी उपयोग केला जातो. ही पद्धती अभ्यासाने विकसित केली आहे व त्याचा उपयोग पिकांचे संरक्षण करण्यासाठी होतो. कीटक परजीवी कीटकांच्या अंडी अथवा अळी किंवा कोश या अवस्थांवर अथवा त्या अवस्थांच्या आत स्वत:ची अंडी घालतात किंवा अळ्या सोडतात त्यांना 'परउपजीवी' (पॅरासायटॉइड) म्हटले जाते. हे परउपजीवी कीटक आपल्या अळ्यांद्वारा त्या त्या परजीवी कीटकांचा पूर्णपणे नाश करतात. अळ्यांची खाबूगिरी हे त्याचे कारण होय. या कीटकांमध्ये मुख्यत: विविध प्रकारच्या गांधीलमाशा आणिमांसभक्षी द्विपंखी माशा यांचा भरणा आहे. त्यांची देण्यासारखी असंख्य उदाहरणे आहेत. परंतु नमुन्यादाखल काही प्रमुख कीटकांचा उल्लेख करता येणे शक्य आहे.
भाताच्या रोपांवर फडका नाकतोडा उपजीविका करतो आणि पिकाचे नुकसान करतो. त्याच्या अंड्यांमध्ये स्केलिओ नावाची गांधीलमाशी अंडी घालते. त्या अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या नाकतोड्याच्या अंड्यांचा, अंड्यातील अन्नांश खाऊन नाश करतात. नाकतोड्याची पिल्ले जन्मासच येत नाहीत. भाताचे पीक वाचू शकते. भाताच्या पानांवर मेलॅन्टिस लिडा या फुलपाखरांच्या अळ्या भूक भागवण्यासाठी हल्ला करतात. या अळ्यांच्या शरीरांत टेलोनोमस, अपानटेलस या गांधीलमाशा अंडी घालतात. या अंड्यातून गांधीलमाशांच्या अळ्या बाहेर आल्यावर फुलपाखराच्या अळ्या फस्त करतात. फुलपाखराच्या पुढील अवस्था तयार होत नाहीत.
गव्हाच्या पानांवर लष्करी अळ्या चरत असतात. या अळ्यांचे जीवन, अपानटेलस गांधीलमाशा आणिसारकोफॅगा माशा त्याच प्रकारे संपवतात. उसाच्या शेंड्याचा भाग स्किरपोफॅगा पतंगाच्या अळ्या पोखरतात. या अळ्यांवर ट्रायकोग्रामा ही मांसभक्षी माशी स्वत:ची अंडी घालते. पतंग अळीचा नाश होतो. शेतकी प्रशालांच्या अथवा कृषी विद्यापीठाच्या प्रयोगशाळेमध्ये ट्रायकोग्रामाच्या लाखो अळ्यांची पैदास केली जाते. नंतर लाखो कोशावस्था व प्रौढ माशा उसाच्या वावरात सोडतात. पोखर किडीचे नियंत्रणहोते. झुरळाची मादी आपली अंडी अंडी धारिकेमध्ये संरक्षित करते. परंतु, निशाणमाशी त्या अंडीधारकेचे संरक्षक कवच भेदून आपली अंडी घालते. त्यातून बाहेर पडलेल्या अळ्या या अंड्यांचा नाश करतात. आपल्या घरातील झुरळांचे अशा प्रकारे नियंत्रणहोत असते, ही बाब अनेकांना ठाऊक नसल्याचे दिसते. ही उदाहरणे अभ्यासली की, पीडक कीटकांचे नियंत्रणनिसर्ग कशा प्रकारे करतो हे लक्षात येते आणिनिसर्गाचे कौतुक करावे तितकडे थोडे असल्याचे जाणवते. कीड नियंत्रणासाठी साधने शोधणारे संशोधक अशा परजीवींच्या आणि परउपजीवींचा सतत मागोवा घेत असतात. त्यातील काहींची ट्रायकोग्रामाशीसारखी मोठय़ा प्रमाणात पैदास करून त्यांच्याद्वारे कीडनियंत्रणकरण्याची शक्यता अजमावून पाहत असतात. प्रत्येक वेळेस यश येतेच असे नाही; पण प्रयत्न थांबत नाहीत.

No comments:

Post a Comment