Blogroll

द ग्रेट बॅरिअरी रीफ Great Barrier Reef

द ग्रेट बॅरिअरी रीफ Great Barrier Reef

द ग्रेट बॅरिअरी रीफ Great Barrier Reef

ऑस्ट्रेलियास लाभलेली नैसर्गिक देणगी म्हणजे सभोवताचा अथांग समुद्र. या महासागराची रमणीय सीमा म्हणजे उत्तरेकडून पूर्व दिशेला जोडणारा २0१0 किलोमीटर्स लांबीचा समुद्रकिनारा. या समुद्रकिनार्‍यालगतचे उथळ पाणी आणि दूरवर पसरलेल्या खोल महासागरास अलग करणारा, पाण्याखाली जेमतेम बुडालेला, लांबलचक खडक 'द ग्रेट बॅरिअरी रीफ' म्हणून जगप्रसिद्ध आहे. हा खडक कॉरल किंवा प्रवाळ कीटकांमुळे तयार झालेला आहे.  

ऑस्ट्रेलियास लाभलेली नैसर्गिक देणगी म्हणजे सभोवताचा अथांग समुद्र. या महासागराची रमणीय सीमा म्हणजे उत्तरेकडून पूर्व दिशेला जोडणारा २0१0 किलोमीटर्स लांबीचा समुद्रकिनारा. या समुद्रकिनार्‍यालगतचे उथळ पाणी आणि दूरवर पसरलेल्या खोल महासागरास अलग करणारा, पाण्याखाली जेमतेम बुडालेला, लांबलचक खडक 'द ग्रेट बॅरिअरी रीफ' म्हणून जगप्रसिद्ध आहे. हा खडक कॉरल किंवा प्रवाळ कीटकांमुळे तयार झालेला आहे. प्रवाळांबरोबरच कोमट पाण्यात आढळणारे रंगीत मासे, विविध वनस्पती, सहसा पाहण्यास न मिळणारे समुद्रजीवी प्राणी यांचीही इथे रेलचेल आहे. हा समुद्र अतिशय उथळ आणि नितळ असल्याने सूर्याचे किरण पडल्यानंतर सागरी सौंदर्याचा खजिनाच तुमच्या समोर खुला होतो. साध्या डोळ्यांनीही खोल पाण्यातील खजिन्याचे दृश्य स्वच्छ पाहता येते.
हा खडक निर्माण होण्यामागचे शास्त्रीय स्पष्टीकरण असे आहे. भूशास्त्रानुसार नैसर्गिक जैविक पध्दतीने तयार झालेला कॉरल हा लाइमस्टोन किंवा चुनखडीचा दगड होय. तो समुद्रातील प्रवाळासारखे लाखो जलचर कीटक किंवा छोट्या प्राण्यामुळे तयार होतो. हे समुद्रप्राणी जेलिफिश, हाइड्रा, सी अँनीमोन इत्यादी. या जलचर प्राण्यांचा आकार पोकळ गोल नळीसारखा असून ती जणू काय त्याची अन्ननलीकाच असते. त्यांच्या शरीराचे एक टोक समुद्राच्या तळातील खडकाला चिकटलेले असते तर दुसरे टोक म्हणजे त्याचे तोंड होय. या तोंडाभोवती ६ ते १0 सें.मी. लांब-वळवळणारा, बारीक अस्थिविरहीत, सोंडेसारखाअवयव असतो. त्याचा उपयोग सूक्ष्म जीव, वनस्पती पकडून अन्न म्हणून तोंडात टाकण्यासाठी होतो. हे सर्व जलचर प्राणी एकमेकावर रचले जाऊन पुढे ते एकमेकांना चिकटून राहतात. नंतर त्यांची एक मोठी वसाहत तयार होते. जोडलेल्या स्थितीत ते समुद्रातील कॅल्शियम काबरेनेट घेतात. त्याचे थर हळूहळू शरीराच्या खालच्या बाजूला जमा होतात. मग त्याची विशिष्ट रचना तयार होते. प्रजोत्पादन सतत चालू असल्याने त्यांची संख्या वाढत जाते.

त्यातले काहीं प्रवाळ (कॉरल) वेगळे होऊन आपली वेगळी वसाहत तयार करतात. तर मोठे जलचर प्राणी कॉरलची अंडी किंवा कॉरल चक्क खातात. मात्र त्यांची तितकीच झपाट्याने वाढ होऊन समातोलपणा किंवा बॅलन्स राखला जातो.
प्रवाळांच्या विविध रंगात, निरनिराळ्या आकाराच्या वसाहती तयार होतात. जेंव्हा पहिला जलचर प्राणीसमूह मरतो तेंव्हा त्याच्यावर दुसरा त्याच जातीचा प्राणी समूह तयार होऊन वसाहतीची वाढ सतत चालू ठेवतो. तो समुद्रात ५0 मीटरपेक्षा कमी खोलीवर चुनखडी किंवा लाइमस्टोन स्वरुपात आढळतो. हाच ऑस्ट्रेलियाच्या पूर्व समुद्रकिनार्‍यावरील उथळ पाण्यातील, जेमतेम बुडालेला, लांबलचक कॉरलरुपी 'द ग्रेट बॅरिअर रीफ' (Great Barrier Reef)  खडक होय.
असा खडक समुद्रात निर्माण होण्यास अनेक वर्षे लागतात. कॉरल जिवंत असतो तेव्हा ही निसर्ग किमया चालू असते. अनेक वर्षानंतर जेंव्हा तो मृत होतो तेंव्हा किनार्‍याच्या दिशेने वाहून येतो. तोड-मोड करुन त्याचा नाश केला तर मात्र तयार होण्यास कित्येक वर्षे लागतात. युनेस्कोच्या वर्ल्ड हेरीटेज यादीत 'द ग्रेट बॅरिअर रीफ' चा समावेश आहे. आज तो 'द ग्रेट बॅरिअर रीफ मरीन पार्क' म्हणून ओळखला जातो.
भारतात अंदमान-निकोबार द्वीप समूहाच्या जॉजलीबॉय बेटाच्या समुद्रकिनार्‍यावर अशा प्रकारचा सागरी सौंदर्याचा खजिना आहे. तो पाहण्यासाठी ग्लासबॉटम बोटीतून समुद्रावर चक्कर मारावी लागते. बोटीच्या काचेतून खाली पाहताना पांढरा, निळा, गुलाबी रंगाच्या कॉरल्स विविध आकारांत (उदा. निवडूंग, मश्रूम, पक्ष्याचा पंख) पाहण्याचा अनुभव प्रत्यक्ष घेतला पाहिजे. त्या शिवाय तर्‍हेतर्‍हेने रंगीबेरंगी मासे, समुद्री वनस्पती, जलचर प्राणी स्वच्छ पाण्यात सहज पाहू शकता. किनार्‍यावर सापडणारी पांढरी रेती ही कॉरल्सची नैसर्गिकरीत्या झीज होताना तयार होते.
कॉरल किंवा प्रवाळपासून, पोवळी, खडे, मणी व इतर वस्तू बनवितात. आज सगळीकडे पोवळ्याला चांगली मागणी आहे कारण ते नवरत्नापैकी एक रत्न आहे.
(लेखक विज्ञानविषयक घडामोडींचे अभ्यासक आहेत.) ग्रेट बॅरिअर रीफ या नैसर्गिक खडकांत अनेक लहान बेटांचासुध्दा समावेश होतो. हा खडक म्हणजे सुमारे २५00 छोट्यामोठय़ा प्रवाळ कीटकांमुळे पाण्याखाली निर्माण झालेली विशिष्ट प्रकारची वस्तुस्थिती आहे. प्रवाळांच्या रंगीबेरंगी आणि विविध आकाराच्या सुमारे ४00 जाती त्यात पाहण्यास मिळतात. ते पाहणे हा एक अवर्णनीय अनुभव आहे. त्यावर लाल-पिवळा-नारंगी-जांभळा-पांढरा-निळा-गुलाबी-हिरवा अशा मनोहर रंगांचे दर्शन होते.
प्रवाळांचे विविध आकार म्हणजे, निवडूंगाचे झाड, मश्रुम किेंवा लोटस वनस्पती, झाडाच्या पसरलेल्या फांद्या, पक्ष्याचे पसरलेले पंख, सांबराचे शिंग, गोलघुमट किंवा डोम, चर्चमधील ऑरगनच्या पाइप्सचा एक गट पाहायला मिळतात.


No comments:

Post a Comment