Blogroll

पाण्याखाली छायाचित्रण Water Photography

पाण्याखाली छायाचित्रण Water Photography



पाण्याखाली छायाचित्रण करण्यासाठी ध्वनिलहरींचा उपयोग ही कल्पना नवी होती. डॉल्फिन पाण्यातील त्यांचे भक्ष्य शोधताना जी पद्धत वापरतात, तीच अधिक विकसित करून पाण्याखाली चित्रणकरणारा कॅमेरा तयार झाला निलहरींचा उपयोग व त्यावरील संशोधन सातत्याने होत असल्याचं आपण पहात आहोत. परदेशातही बहुसंख्य संशोधन गट यावर कार्यरत आहेत. त्यातील ध्वनीलहरींच्या साहाय्याने होणार्‍या समुद्रविषयक अथवा पाण्याखालील अभ्यासातूनच जलमय आकाश ही कल्पना निर्माण झाली. ही कल्पना म्हणजेध्वनींच्या सहाय्याने समुद्राचं आतील जग हे मंदप्रकाशित होते. या लहरी पृष्ठभागावर ध्वनीक्षेपित होऊन स्थिर आणि मोठा आवाज निर्माण होतो. त्यामुळे समुद्राच्या तळातील शांतता भंग होते. 
हीच गोष्ट ध्वनी विज्ञानातील तंत्रज्ञ व शास्त्रज्ञांनाही व्याकुळ करून गेली. यासाठी शास्त्रज्ञांनी व तंत्रज्ञांनी आपलं कौशल्य पणाला लावून त्यातून काही संकेत मिळवण्याचा प्रयत्न केला. त्याला समुद्रतळातील गोष्टींचा वेध घेण्याचे साधन असे म्हणावे लागेल.
मायकेल बकिंगहॅम या शास्त्रज्ञाने १0 वर्षांपूर्वी निरूपयोगी ध्वनीविषयाची विचार केला आणि त्याला असे आढळून आले, की यात काहीतरी महत्वाचं वाया जात आहे. 'ही एक क्षुद्र कल्पना आहे, असे माझ्या डोक्यात येऊन गेले' हे उद्गार, इंग्लिश भौतिक शास्त्रज्ञ आणि आताचे समुद्रविषयक ध्वनीविज्ञानाचे प्राध्यापक व स्क्रिप्स इन्स्टिटयुट ऑफ ओसिएनोग्राफी (Scripps institute of oceanography) कॅलिफोर्निया बकींगहॅम यांचे होते. रूपयातून एक आणा सापडल्याचा आनंद त्यांना झाला. त्यांनी स्वत:लाच प्रश्न केला.
आपण जसा प्रकाशाचा फोटोग्राफीत उपयोग करतो तसाच समुद्रात का करू नये? ध्वनीविज्ञानाच्या दृष्टिकोनातून बकींगहॅम यांना असे जाणवले की, समुद्राचा पृष्ठभाग हा लागोपाठ सूर्यप्रकाशित दृष्टिकोनातून बकींगहॅम यांना असे जाणवले, की समुद्राचा पृष्ठभाग हा सूर्यप्रकाशित आकाशाचं अनुकरण करतो. हेच ध्वनीचं अविच्छन विशाल उगमस्थान आहे. यालाच बकींगहॅम 'ध्वनिविज्ञान सूर्यप्रकाश' (Acoustic day light) असे म्हणतात. आपल्या परंपरागत तंत्रज्ञानानुसार पाण्यातील एखाद्या वस्तूच्या शोधासाठी अंधारातील शूटिंग फोटोग्राफीचा वापर करतात. एखादी कोलाहल करणारी वस्तू सहज ऐकू येते म्हणून आपण शोधू शकतो. त्यासारखेच एखाद्या कॅमेर्‍याचे शटर उघडे ठेवले तर तो कॅमेरा सहजपणे कुठलाही प्रकाश कॅच करतो. दुसरे म्हणजे शांत, स्थिर किंवा अचल वस्तू (Traget) सुद्धा एखाद्या चंचल भागामध्ये ध्वनी उत्पन्न करते. पण आजपर्यंत कुणीही ध्वनीसूर्यप्रकाशात छायाचित्र घेईल, असा कॅमेरा बनविण्याचा विचार केलेला नाही.
१९९२ मध्ये बकींगहॅम व त्यांच्या सहकार्‍यांनी मिळून ध्वनीविज्ञान अथवा ध्वनीशास्त्र कॅमेरा (Acoustic camera) बनविण्याचं श्रेय मिळविले. अडीच वर्षानंतर त्यांनी अँडॉनीस, अँकॉस्टीक डेलाइट ओसिएन नॉइज इमेजिंग सिस्टीम (ADONIS) बनविली. अँडॉनीस पाण्याच्या आतील छायाचित्रण करण्याचं काम करू लागला.  
बॅकींगहॅमच्या सहकार्‍यांनी अँडॉनीस ही पद्धत ऑरकाटँक (Orca Tank) या समुद्राजवळील ठिकाणी फिरत्या यंत्रणेवर (Moving Tragets) बसवली आणि त्याच पद्धतीने अँडॉनीस स्कॅन केला. यात बरेच महत्वाचे परिणाम त्यांना मिळाले. यामुळे काही जीवनशास्त्रज्ञांना शंका आली की, काही सस्तन प्राणी हे ध्वनीशास्त्र, सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने माग काढीत आपली शिकार अथवा भक्ष्य शोधतात. उदा. ब्लाइंड फोल्डेड डॉल्फिन (Blind folded Dolphin)
पाण्याखालील कॅमेर्‍यांचा वापर मुख्यत्वे समुद्रातील बेटांची प्रवेशद्वारे, पाणी शोधण्यासाठी किंवा किनार्‍यापासून दूर अंतरावरील तेल विहिरींची तपासणी इत्यादीसाठी होईल. ध्वनीशास्त्र सूर्यप्रकाश पद्धत ही खरोखरच खूप महत्वाची असून पाण्याखालील अथवा समुद्रातील जग व त्यातील रहस्ये उलगडायला निश्‍चितच उपयोगात येईल, अशी आशा शास्त्रज्ञांना आहे. 

1 comment:

  1. Thank you for this article. It's really helpful for us. Virtual Voyage College, Indore is one of the best colleges in India. Dancing / Choreography Courses in India

    ReplyDelete