Blogroll

Monoceros constellation मोनोसोरस तारकासमूह

Monoceros constellation मोनोसोरस तारकासमूह 


मोनोसोरस तारकासमूह हा मृगतारका समूहाच्या पूर्वेला आहे. सहसा आकाशदर्शनाच्या कार्यक्रमात याची चर्चा होत नाही, कारण एकतर हा चटकन लक्षात न येणारा तारकासमूह आहे आणि याच्या आजूबाजूला अनेक इतर प्रखर तारकासमूह आहेत. तसेच हा तेजोमेघ लहान दुर्बिणीतून फारसा सुंदर दिसत नाही.
पण रोसेट तेजोमेघ खगोलभौतिक शास्त्राच्या दृष्टीतून महत्त्वाचा आहे. हा तेजोमेघ आपल्यापासून सुमारे ५000 प्रकाशवर्षं अंतरावर आहे, आणि एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंतचा याचा विस्तार १३0 प्रकाशवर्षांचा आहे.
एकेकाळी हा एक प्रचंड मोठा वायूचा मेघ होता. या तेजोमेघात पोकळी निर्माण होण्याचे कारण असे की, कालांतराने याच्या मध्यभागात अनेक तार्‍यांची निर्मिती झाली. खगोलीयसंदर्भात हे तारे तसे तरुण आहेत. त्यांच्या पृष्ठभागावर तापमान ३0,000 केल्विन इतके आहे. या तार्‍यातून निघालेल्या प्रकाशाच्या किरणाच्या दाबामुळे आणि या तार्‍यातून निघालेल्या वायूमुळे या मेघातील कण (प्रामुख्याने हायड्रोजनचे अणू आणि काही इतर अणू आणि रेणू) मध्यभागापासून दूर ढकलले गेले आहेत. तसेच याच्या मध्य भागातील तार्‍यांच्या प्रचंड प्रारणांमुळे हायड्रोजन वायू विद्युतभारीत होतो आणि आणि तो आपल्याला प्रकाशही देतो (अशा प्रकाशाची तुलना घरातील ट्यूब लाईटच्या प्रकाशाबरोबर करता येईल.) या तेजोमेघाचे वस्तुमान इतके आहे की, या पासून अजून दहा हजार सूर्यासारखे तारे बनविता येतील.

No comments:

Post a Comment