ताल नावाचा महाप्रचंड वृक्ष
वृक्ष नित्यनेमाने वाढतात, फुलतात असा आपला नेहमीचा अनुभव आहे. मात्र, सृष्टीत काही वृक्ष असे आहेत, की ते त्यांच्या आयुष्यात एकदाच फुलतात. ताल नावाचा महाप्रचंड वृक्ष त्यापैकीच एक.
युष्याचा हेतू काय?
असा खुळचट प्रश्न माणूस सोडून कुठल्याही सजीवाला भेडसावत नसतो. उगीचच मोक्षप्राप्ती, जन्ममरणाच्या फेर्यातून सुटका इत्यादी तात्त्विक चर्चा नाही. जगण्याचे उद्देश दोन, एक म्हणजे स्वत: जगणं आणि आपला वंश जगवणं.
छायया सुखवन्त्यन्यां,
सहन्ते परमातपम्।
फलान्यपि परार्थाय
वृक्षा सत्पुरुषाइव।।
असे गोडवे माणूस गात असला तरी उद्या समजा वनस्पती बोलू लागल्या, तर त्या म्हणतील, ''आम्ही स्वत:साठी जगतो, आमचं वंशसातत्य टिकवण्यासाठी फुलतो आणि फळतो. तुम्ही केवळ तुमच्या फायद्यासाठी आम्हाला असे 'सद्गुण' चिकटवले आहेत.''
वनस्पतीमंडळीचं हे प्रतिपादन शंभर टक्के खरं आहे. त्या फुलतात, फळतात आणि फळांमधील बियांपासून वनस्पतीची पुढची पिढी अस्तित्वात येते. अनेक वनस्पती दरवर्षी नियमितपणे फुलतात, त्यांच्याजवळ त्यांचं स्वत:चं कॅलेंडर असतं. आंब्यासारखे वृक्ष आयुष्याची पहिली चार-पाच वर्षे नुसते वाढतात. नंतर त्यांना फुलं येतात आणि फळं धरतात. एकदा हे चक्र सुरू झालं, की हयातभर चालतं.
दोन-तीन महाभाग मात्र या आयुष्यपद्धतीला अपवाद. ते आयुष्यात एकदाच फुलतात. फुलणं ही क्रिया अतिशय महाग आहे. त्याला भरपूर अन्नसाठा हाताशी असावा लागतो. 'गदिमां'नी उगीच नाही म्हटलं, 'सोसता सोसेना संसाराचा ताप। त्याने मायबाप, होऊ नये।।' तेव्हा पुरेसा बँक बॅलन्स तयार झाला, की मगच फुलायचं.
'कॉरिफा अंब्राक्युलिफेरा' हा एक असाच महावृक्ष- आपल्या शब्दात तालवृक्ष. दक्षिण भारतात विशेषत: केरळमध्ये, तसेच कर्नाटकात काही भागांत हा वृक्ष आढळतो. श्रीलंकेत याला राष्ट्रीय वृक्षाचा मान आहे. कॉरिफा हे लॅटिन नाव, ं१्रं'>ङ१४स्रँी /ं१्रं'>या ग्रीक सं™ोपासून तयार झालं आहे. ं१्रं'>ङ१४स्रँी /ं१्रं'>याचा अर्थ डोकं, माथा. हा संदर्भ या वृक्षाच्या अजस्र फुलोर्याचा. तर अंब्राक्युलिफेराचा अर्थ विशाल छत्र. पूर्ण वाढलेला तालवृक्ष म्हणजे एक अवाढव्य छत्रीच. पण सांभाळून. कारण छत्रीचा दांडा काटेरी. हे काटे जवळ-जवळ एक सें.मी. लांब. गळून पडलेल्या पानांचे तळ खोडावर टिकून राहतात आणि बुंध्यावर चिलखत तयार करतात.
पानं पंख्यासारखी मोठय़ा आकारमानाची. जवळ-जवळ दोन ते चार मीटर रुंद. मात्र, हे पर्णपातं अखंड नसून त्यांच्या पर्णिका अग्रभागी स्वतंत्र तर नंतर जुळलेल्या असतात. या पानांपासून लांबलचक पट्ट्या काढून त्यांच्या मध्यशिरा बाजूला करतात. या पट्ट्या नंतर पाण्यात उकळून वाळवतात व त्यांना घासून पुसून झिलईयुक्त केलं जातं. दक्षिण भारतात प्रचलित असलेला ज्योतिष-भविष्य कथन करणारा 'नाडी'ग्रंथ याच पट्ट्यांवर लिहिलेला आहे, असं म्हटलं जातं. प्राचीन काळी म्हणजे कागदाचा शोध लागण्यापूर्वी याच तालपत्रावर पोथ्या लिहिल्या गेल्या. वयाची चाळिशी गाठली, की तालवृक्ष फुलतो. आयुष्यात एकदाच! अंदाजे पंचवीस ते तीस मीटर उंचीच्या खोडाच्या अग्रभागी सातआठ मीटर उंचीचा फुलोरा म्हणजे एक प्रचंड कारंजंच. फुलं अतिशय लहान आकारमानाची. ती मत्स्यगंधा असतात तशीच योजनगंधाही. या मत्स्यगंधांवर भाळणारे 'पराशर' कीटकही आहेतच. तालवृक्ष कधी फुलणार याचा सुगावा लागला, की स्थानिक लोक त्याचा शिरच्छेद करतात. कारण त्याच्या बुंध्यात स्टार्चचा प्रचंड साठा असतो. हाच साठा वापरून ताल आपली संतती-फळं वाढवणार असतो. त्याच्या शिरकाणामुळे सगळंच संपतं, तालवृक्ष पुन्हा उभा राहत नाही.
बुंध्यातील स्टार्चपासून साबुदाणा करतात. चुकून-माकून ताल फुलू दिला, तर त्याच्या फळांनाही व्यावहारिक मूल्य आहे. तालवर्गीय आणखी एक सदस्य म्हणजे ं१्रं'>ढँ८३ी'ीस्रँं२/ं१्रं'>; अर्थात वनस्पतींमधील हत्ती. याच्या बिया हस्तिदंतासारख्याच वापरता येतात. तसाच वापर तालवृक्षाच्या बियांचा होतो. यावर कोरीव काम करता येतं, त्याच्या गुंड्या करतात. रंगवून त्याला पोवळ्याचं रूप दिलं जातं. मुंबईच्या जिजामाता उद्यानात दोन तालवृक्ष होते. पैकी एकानं फुलून आणि फळूनही आपली जीवनगाथा नुकतीच संपवली.
No comments:
Post a Comment