डीएनए तंत्र
डॉ. रिसी यांनी २00३ मध्ये 'मायक्रोअँरे' या डीएनए तंत्राने सार्स विषाणूची निदान चाचणी प्रचारात आणली. त्या तुलनेत आताच्या आधुनिक चाचणीत अधिक सर्वसमावेशकता आहे. यात संसर्गाच्या डीएनएच्या उपप्रकारांची छाननीपण आहे. या तंत्रामुळे संसर्गाची नवी साथ आल्यास तिचा उगम शोधणे सोपे होणार आहे. डीएनए निदान तंत्राची पार्श्वभूमी तशी दहा वर्षांची आहे. डॉ. द रिसी या कॅलिफोर्निया विद्यापीठातीलच जैवशास्त्रज्ञाने हे तंत्र विकसित करायचे ठरवले. त्याला डॉक्टर विल्सन या चेताशास्त्रज्ञाने (न्यूरॉलॉजिस्ट) आणि डॉ. चिऊ या संगणकतज्ज्ञाने सहकार्य दिले. सूक्ष्मजंतूंबाबत जगभरात सतत संशोधन सुरू असते. बर्याच आजारांचे मूळ सूक्ष्मजंतूकडून होणार्या प्रादुर्भावात आहे; मात्र ते लवकर समजत नाही. आजार कोणत्या जंतूमुळे झाला, ते शोधून काढणारी एक नवी प्रणाली आता शास्त्रज्ञांनी शोधली आहे. द्यकीय क्षेत्रात निदानाला मोठे महत्त्व आहे. ते व्यवस्थित झाले, की उपचाराची निश्चिती करता येते; पण तेच अनिश्चित असेल, तर लक्षणानुसार उपचार सुरू करून सुधारणेची वाट पाहावी लागते. मेंदूज्वरासारख्या व्याधीत तापाबरोबर मेंदूलाही सूज आलेली असल्याने निदानात गफलत झाल्यास रुग्णाला ते प्राणघातक ठरू शकते. या व्याधीचे लवकर व अचूक निदान व्हावे, म्हणून कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी डीएनए क्रमावर आधारित एक चाचणी नुकतीच विकसित केली आहे. तिच्या मदतीने मेंदूज्वराच्या संसर्गाचा उगम कशात आहे, उदाहरणार्थ, तो विषाणूत आहे का बॅक्टेरियात, का कुठल्या परजीवी जंतूत (पॅरासाइट) आहे, याची शहानिशा प्रथम होते. त्यानंतर विशिष्ट संसर्गाच्या उपप्रकाराची निश्चिती होते.
आपल्या शरीरातील रक्तात किंवा मज्जाद्रवात चयापचयाने तयार झालेल्या डीएनए तुकड्यांचे मिश्रण असते. अगदी लाखोंच्या संख्येत ते असतात. काही तुकडे शरीराच्या डीएनएचे, तर काही सूक्ष्मजंतूच्या डीएनएचे! वरच्या चाचणीत शरीरातील डीएनए तुकड्यांना संसर्गाच्या डीएनए तुकड्यांपासून वेगळे करून मग खास संसर्गाच्या डीएनए तुकड्यांची छाननी करण्याचे काम होते. आपण म्हणतो त्याप्रमाणे गवताच्या गंजीतून एखादी सुई शोधण्याइतके ते जटिल आहे. साधारणपणे तीस लाखांपर्यंत डीएनए तुकड्यांचे याप्रमाणे वर्गीकरण होते! सूक्ष्मजंतूंच्या डीएनए तुकड्यांची विविध संसर्ग डीएनए तुकड्यांच्या संग्रहातून जुळणी करून मग संसर्ग करणारा सूक्ष्मजंतू नक्की कोणता, हेही स्पष्ट होते.
No comments:
Post a Comment