कासवासारख्या प्राण्यातही बुद्धिमत्ता आहे
कासवासारख्या प्राण्यातही बुद्धिमत्ता आहे. प्रयोगाअंती ते सिद्धही झालं आहे. पाळण्याकरिता व खाण्याकरिताही होत असलेल्या त्यांच्या वापरावर निर्बंध घालण्याची गरज आहे.
सव आपल्याला लहानपणीच्या ससा-कासव शर्यतीत भेटलेलं असतं. त्यात कासवच जिंकतं ते चिकाटीने, सातत्याने आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर. कासवाची ही बुद्धिमत्ता शोधून काढण्याकरिता एक शास्त्रीय प्रयोग इंग्लंडच्या 'ं१्रं'>वल्ल्र५ी१२्र३८ ा छ्रल्लू'ल्ल/ं१्रं'>' येथील प्राध्यापक संशोधक अन्ना विल्किन्सन यांनी केला. कासवाच्या प्रशिक्षणक्षम बुद्धि-चाचणीसाठी प्रलोभन पद्धतीचा उपयोग करण्यात आला. या प्रयोगात आधुनिक इलेक्ट्रॉनिक 'टच स्क्रीन' तंत्रज्ञानाची योजना होती. प्रायोगिक प्राणी होता 'रेड फुटेड टॉरटॉईज, चेलोनिडी कुळातलं चेलोनॉइडीस काबरेनारिया, हे कासव. त्यांना पाण्याच्या काचेच्या टाकीत सोडलं होतं. एका बाजूला 'टच स्क्रीन' होता. त्या पडद्याच्या मधोमध एक लाल त्रिकोण प्रकाशित करण्यात आला होता. दोन्ही बाजूला योजनापूर्वक प्रकाशित करता येणारी निळी वतरुळं होती. प्रयोगकर्त्याच्या आदेशानुसार ती प्रकाशित झाल्याचं पाहून लगेच प्रतिसाद देण्यासाठी मधल्या लाल त्रिकोणाला नाक टेकवायचं व नोंद व्हायची. प्रत्येक यशस्वी प्रयत्नाला कासवांना बक्षीस मिळायचं स्ट्रॉबेरीचं. ती शिक्षित झाली का हे पाहण्यासाठीच्या काही कसोट्या होत्या. तरंगताना योग्य दिशा शोधणे, टच स्क्रिनपर्यंतचं अंतर कापणे, त्याला लागणारा वेळ, यशस्वीपणे टच स्क्रीनला केलेला स्पर्श व त्याची मोजदाद. कासवं शिकली. त्यासाठी कासवांच्या मेंदूतील ं१्रं'>टी्िरं' उ१३ी७/ं१्रं'> हा भाग उद्दिपीत झाल्याचा निष्कर्ष निघाला. पक्षी, कुत्रा वगैरे प्राण्यांच्या मेंदूचा ं१्रं'>्रस्रस्रूेंस्र४२ /ं१्रं'>भाग उद्दिपीत होतो; पण तो कासवात नसतोच.
ही रेड फुटेड प्रायोगिक कासवं होती मध्य आणि दक्षिण अमेरिकेतल्या नदी खोर्यातली. मध्यम आकाराची ही कासवं वजनाने २८ किलो आणि शरीराच्या लांबीत ३0 ते ४0 सें.मी. भरतात. पाठीवर कवचांची काळपट गडद संरक्षक ढाल बनलेली असते. कवचावरच्या खवल्यांच्या मध्यभागी मोठाले फिकट पिवळे किंवा गडद लाल ठिपके असतात. भौगोलिक क्षेत्रांनुसार त्यात फरक दिसतो. या कासवांमध्ये दोन जाती आहेत. एकाच्या पायावर लाल ठिपके असतात, तर दुसर्याच्या पायावर पिवळे. अँमेझॉन नदीचं खोरं हा त्यांचा नैसर्गिक अधिवास. गवताळ प्रदेश हे त्यांचं वास्तव्याचं मुख्य ठिकाण.
ही कासवं सर्वभक्षी असतात. वनस्पती, गवत, पानं, फळं, फुलं, बुरशी आणि लहान-लहान प्राणी त्यांच्या आहारात असतात. ऋतुबदलांनुसार कडक कोरड्या उन्हाळ्यात ही कासवं पूर्णत: निष्क्रिय व सुप्त निद्रावस्थेत जातात. पाठीवरचं आणि पोटावरचं संरक्षक, कठीण कवच हे कासवाचं वैशिष्ट्य. कवचांच्या कडा जाड आणि कठीण असतात. या कवचात त्यांचं मऊ शरीर आणि आक्रसून घेतलेले पाय व डोकं हे भाग लपतात. डोकं चौरस असतं. वरचा भाग चपटा असतो. डोळे मोठे असतात. मध्यभागी काळं बुबूळ असतं. वरचा जबडा वरून खाली वळलेला असतो, तो खालच्या जबड्यावर चपखल बसतो. मध्यभागी त्याला खाच असते. डोक्यावर थोडे मोठे खवले असतात. ते मानेकडे बारीक होत जातात.
नराचं शरीर अधिक आकर्षक रंगाचं असतं. मान आक्रसल्यावर डोकं संरक्षक कवचाआड दडतं. पाय दंडगोलासारखे असतात. पुढच्या पायाला चार तर मागच्या पायाला पाच नख्या असतात. पुढच्या पायाची टोकं जास्त चपटी असतात. पोहायला व बिळं करायला ती उपयोगी पडतात. शरीराला मागे छोटसं मांसल शेपूट असतं. मादीचं शेपूट थोडं त्रिकोणी असतं. शेपटीची हालचाल दोन्ही बाजूला होते.
ही कासवं साधारणत: दुपारी तीननंतर जास्त प्रमाणात वावरू लागतात. उष्ण हवामानात फक्त सकाळी आणि संध्याकाळीच त्यांचा वावर दिसतो. अन्न कमी मिळायला लागलं, की ती सुप्तावस्थेत जातात. भरपेट खाणं झालं, की ती डॉ. क. कृ. क्षीरसागर
सव आपल्याला लहानपणीच्या ससा-कासव शर्यतीत भेटलेलं असतं. त्यात कासवच जिंकतं ते चिकाटीने, सातत्याने आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर. कासवाची ही बुद्धिमत्ता शोधून काढण्याकरिता एक शास्त्रीय प्रयोग इंग्लंडच्या 'ं१्रं'>वल्ल्र५ी१२्र३८ ा छ्रल्लू'ल्ल/ं१्रं'>' येथील प्राध्यापक संशोधक अन्ना विल्किन्सन यांनी केला. कासवाच्या प्रशिक्षणक्षम बुद्धि-चाचणीसाठी प्रलोभन पद्धतीचा उपयोग करण्यात आला. या प्रयोगात आधुनिक इलेक्ट्रॉनिक 'टच स्क्रीन' तंत्रज्ञानाची योजना होती. प्रायोगिक प्राणी होता 'रेड फुटेड टॉरटॉईज, चेलोनिडी कुळातलं चेलोनॉइडीस काबरेनारिया, हे कासव. त्यांना पाण्याच्या काचेच्या टाकीत सोडलं होतं. एका बाजूला 'टच स्क्रीन' होता. त्या पडद्याच्या मधोमध एक लाल त्रिकोण प्रकाशित करण्यात आला होता. दोन्ही बाजूला योजनापूर्वक प्रकाशित करता येणारी निळी वतरुळं होती. प्रयोगकर्त्याच्या आदेशानुसार ती प्रकाशित झाल्याचं पाहून लगेच प्रतिसाद देण्यासाठी मधल्या लाल त्रिकोणाला नाक टेकवायचं व नोंद व्हायची. प्रत्येक यशस्वी प्रयत्नाला कासवांना बक्षीस मिळायचं स्ट्रॉब
No comments:
Post a Comment