Blogroll

रंग बदलणारे रत्न अँलेक्झांड्राइट

 रंग बदलणारे रत्न अँलेक्झांड्राइट

Alexandrite Color Changing

दिवसाच्या नैसर्गिक प्रकाशात एक रंग व रात्रीच्या कृत्रिम प्रकाशात दुसराच रंग दाखवणारे खनिज हा निसर्गात सापडणारा एक दुर्मिळ प्रकार आहे. मात्र यात मोठय़ा आकाराचे खडे क्वचितच सापडतात. र्ण वैडूर्य (क्रायसोबेरिल) या खनिजाचे विशेष प्रकाशीय आविष्कार दाखवणारे दोन अत्यंत दुर्मिळ व मौल्यवान प्रकार आहेत. त्यातील एक म्हणजे नवरत्नात अंतर्भाव असलेला लसण्या (Cat"s eye) जो "Chatoyancy" हा प्रकाश आविष्कार दाखवितो (त्याची माहिती दिलेलीच आहे). दुसरा आहे अँलेक्झांड्राइट, ज्यात नैसर्गिक प्रकाशातील खनिजांचा रंग व कृत्रिम प्रकाशातील खनिजाचा रंग यात फरक असतो.
अलीकडच्या काळातील शोध
या रत्नाबद्दल प्राचीन इतिहास तसेच कोणत्याही दंतकथा उपलब्ध नाहीत. कारण याचा शोधच मुळी १९व्या शतकात लागला. या शोधाची कथा मात्र फारच मनोरंजक आहे. सन १८३0मध्ये रशियातील उरल पर्वतराजीतील एमएल खाणीत नेहमीप्रमाणे कामगार पाचू गोळा करीत होते. एका कामगाराने एके दिवशी गोळा केलेले पाचू आपल्या वस्तीवर नेले. रात्री वस्तीत पेटवलेल्या शेकोटीच्या प्रकाशात कामगारांच्या लक्षात आले, की हे खडे लाल रंगाचे दिसत होते. त्यामुळे सर्वच कामगार अचंबित झाले. परत सकाळी उजाडल्यावर कामगारांच्या लक्षात आले की रात्री शेकोटीच्या प्रकाशात लाल दिसणारे खडे सकाळच्या सूर्यप्रकाशात परत हिरवे दिसत होते. कामगारांना समजले, की आपल्याला एक नवीन, दुबरेध असा खनिजाचा प्रकार सापडला आहे.
रशियाचे राष्ट्रीय खनिज
सन १८४२मध्ये खनिजशास्त्रज्ञ नार्डेनस्काओल याने अँलेक्झांडर दुसरा, जो पुढे रशियाचा झार बनला, त्याच्या गौरवार्थ या नवीन खनिजाला अँलेक्झांड्राइट (Alexandrite) असे नाव दिले. या खनिजाचा दिवसा दिसणारा हिरवा रंग व कृत्रिम प्रकाशात दिसणारा लाल रंग यांचे रशियन राजघराण्याच्या ध्वजावरील रंगाशी साम्य असल्याने अँलेक्झांड्राइट हे राष्ट्रीय खनिज बनले. रासायनिकदृष्ट्या यात बेरिलिअम अँल्युमिनिअम ऑक्साइड व अल्पप्रमाणात क्रोमिअम असते. हे अल्पप्रमाणातील क्रोमिअमच त्याच्या रंगास कारणीभूत असते. याचे स्फटिक समचतुभरूज प्रणालीचे असतात व याचा काठिण्य क्रमांक ८.५ आहे. अँलेक्झांड्राइटचे विशिष्ट गुरुत्व ३.८ व वक्रीभवनांक १.७५ आहे.
रंग बदलाच्या तीव्रतेवर किंमत
याची प्रत किंवा किंमत ठरवताना याच्यातील रंग बदलाच्या तीव्रतेचा (Intensity) विचार केला जातो. या रंग बदलाला 'अँलेक्झांड्राइट परिणाम' असे म्हणतात. हा परिणाम जास्त प्रभावी दिसण्यासाठी या खनिजाचा तुकडा योग्य जाडीचा कापणे आवश्यक असते. अँलेक्झांड्राइटचे पाच कॅरटपेक्षा जास्त वजनाचे फारच थोडे खडे निसर्गात आढळतात. त्यामुळेच दागिन्यात या रत्नाचा वापर फार क्वचितच आढळतो. सुरुवातीला फक्त रशियातच आढळणारे हे रत्न नंतर ब्राझील, टांझानिया, श्रीलंका, भारत या देशांतही आढळले. आपल्या देशात केरळ, तमिळनाडू, ओरिसा, छत्तीसगड या राज्यांत हे रत्न आढळते. जगात अतिपूर्वेकडील देशांत या रत्नाला फार मागणी आहे.

देखणे नारंगी पोवळे

 देखणे नारंगी पोवळे

समुद्र म्हणजे नैसर्गिक गोष्टींचा फार मोठा खजिनाच आहे. काही समुद्री प्राण्यांच्या स्रावापासून पोवळ्यासारखे रत्न तयार होते. अशी काही प्राणिज रत्ने सापडत असल्यामुळेच समुद्राला 'रत्नाकर'ही म्हणत असावेत. वरत्नातील प्रवाळ हे रत्न मोत्याप्रमाणेच सागरी प्राण्यांच्या जीवनप्रक्रियेतून तयार होणारे प्राणिज वर्गातील रत्न आहे. प्रवाळ, पोवळे, पवलम, मंगळ, मुंगा किंवा इंग्रजीत या नावाने ओळखल्या जाणार्‍या या रत्नाचा काठिण्य क्रमांक ३ ते ३.५ आहे. विशिष्ट गुरुत्व २.६ असून, वक्रीभवनांक १.५५ असतो. रासायनिकदृष्ट्या पोवळ्यात मुख्यत: कॅल्शियम काबरेनेट, तसेच अल्प प्रमाणात लोह किंवा मॅग्नेशियम असते. या अल्प प्रमाणातील लोह किंवा मॅग्नेशियममुळेच प्रवाळांना तांबडा, नारिंगी, काळा असे वेगवेगळे रंग येतात. तसे बघायला गेले तर प्रवाळ हे एक नाजूक, नरम व रासायनिक परिणाम सहज होणारे प्राणिजरत्न आहे. पण मोहक लाल, नारिंगी रंग व त्याला असलेली झिलई  घेण्याची क्षमता या त्याच्या अंगच्या गुणांमुळेच त्याचा अंतर्भाव रत्नात केलेला आहे.
उबदार हवामानात, उथळ सागरी पाण्यात वाढणार्‍या सीलेंटेरेटा या प्राणिसंघातील, मुख्यत: अँथोझोआ या वर्गातील प्राण्यांनी स्वत:भोवती स्रवलेल्या सांगाड्यांचे तयार झालेले साठे म्हणजे प्रवाळ. काही वेळा समुद्रात प्रवाळांच्या प्रचंड आकारमानाच्या भित्ती किंवा खडक तयार होतात. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे ग्रेट बॅरिअर रीफ. प्रवाळ भित्तीच्या परिसरातील समुद्रात विपुल जैवविविधता आढळते व त्यामुळेच आर्थिक उत्पन्नाच्या दृष्टीने हा भाग महत्त्वाचा असतो. इटली, ऑस्ट्रेलिया, जपान, फिलिपाइन्स येथे उच्चप्रतीचे पोवळे मिळते. भारतात मुख्यत: अंदमान निकोबार बेटांच्या परिसरात पोवळी आढळतात.
रंग, चमक, घट्टपणा, भरीवपणा इत्यादी गुणांवर पोवळ्याची किंमत अवलंबून असते. तांबड्या रंगाचे पोवळे सगळ्यात महाग असते. पोवळ्यावर कोणताही रंग चढवला जाऊ शकतो, पण अँसिटोनमध्ये बुडवलेला कापूस त्यावर घासल्यास रंग कापसावर लागतो. निकृष्ट पोवळ्याची भुकटी करून त्यापासून मूर्ती बनवतात. प्रवाळाचे मणी बनवून माळा तयार करतात. प्लॅस्टिक, काच, पोर्सेलिन इत्यादी पदार्थापासून प्रवाळाच्या अनुकृतीही बनवल्या जातात.
काष्ठसदृश रचना व पृष्ठभागावर बारीक सुतासारख्या रेषा ही प्रवाळ ओळखण्याची महत्त्वाची खूण आहे. प्रवाळापासून केलेल्या प्रवाळभस्माचे आयुर्वेदात अनेक उपयोग सांगितले आहेत.
जगात प्रवाळांच्या ८00पेक्षा जास्त जाती आहेत. त्यापैकी २५0 पेक्षा जास्त जाती भारतात आढळतात. या मुख्यत: अंदमान निकोबार बेटांच्या परिसरात तर थोड्या प्रमाणात लक्षद्वीप, मन्नारचे आखात व कच्छचे आखात या भागात सापडतात. मानवाच्या हस्तक्षेपामुळे गेल्या काही वर्षांत या प्रवाळांच्या अस्तित्वालाच मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या धोक्याबद्दल तसेच प्रवाळांचे आर्थिक व परिसरीय महत्त्व याबद्दल समाजात जागृती निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे.

जगातील पहिले छायाचित्र

 जगातील पहिले छायाचित्र


छायाचित्र कलेचा इतिहास तसा फार प्राचीन नाही. औद्योगिक क्रांतीबरोबरच ही कला विकसित होत गेली. सर्वच क्षेत्रांना त्याचा फार चांगला उपयोग झाला. विज्ञानक्षेत्रही याला अपवाद नव्हते. विज्ञानाशी संबंधित अशा काही छायाचित्रांची ओळख करून देणारे नवे सदर. ळाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत इटलीतील पीसा शहरातील फ्रायर लोक काच बनवण्याच्या कलेत निपुण झाले होते. फ्रायर हे ख्रिश्‍चन भिक्षुक. त्यांनी काचेची पारदर्शक गोलाकार अशी एक वस्तू तयार केली की जिचा मध्यभाग जरा जास्त फुगीर होता. अगदी मसूरच्या दाण्यासारखा. यातून बघितल्यावर आपल्याला जवळची वस्तू मोठी दिसते. मसूरला लेंटिल म्हणतात आणि त्यावरून या वस्तूला लेन्स म्हणण्यात येऊ लागलं.
या एका भिंगाने आपले जीवनच पलटून टाकले. ठराविक वयानंतर ज्यांना लहान अक्षरं वाचणं जमत नव्हतं ते आता या भिंगाच्या मदतीने वाचू शकत होते. मुख्य म्हणजे जे नुसत्या डोळ्यांना दिसणं शक्य नाही तेही आपण बघू लागलो. दुर्बिणीच्या माध्यमातून खूप दूरच्या गोष्टी, तर सूक्ष्मदश्रीच्या माध्यमातून खूप लहान गोष्टी बघणं शक्य झालं. त्यानंतरचा मोठा शोध म्हणजे छायाचित्रणाचा - जे फक्त आपल्यालाच दिसू शकतं, ते आता इतरांनाही दाखवणं शक्य झालं होतं. छायाचित्रणकलेच्या या शोधाने क्रांतीच केली. त्यातील अगदी सुरुवातीची छायाचित्र आजही पाहण्यासारखी आहेत. म्हणूनच यापुढे आपण विज्ञानाशी निगडित अशा काही नैसर्गिक सौंदर्यांच्या आविष्कारांची माहिती घेऊया. आजचं हे छायाचित्र आहे रासायनिक प्रक्रियेतून निसर्गाचं सौंदर्य कैद करणारं. फ्रेंच शास्त्रज्ञ जोसेफ निसेफोअर निप्स यांनी सन १८२६-१८२७ या दरम्यान ते घेतलं होतं. या चित्राला शीर्षक होते 'व्ह्यू फ्रॉम द विंडो एट ले ग्रास.' आपल्या घराच्या एका खिडकीतून त्यांनी हे छायाचित्र घेतलं. हे चित्र घेण्यास त्याला काही तास लागले होते.
त्या वेळी या प्रक्रियेला लाईट पेंटिंग म्हणत असत. त्याला फोटोग्राफी नाव दिलं जॉन हश्रेल यांनी. (युरेनसचा शोध लावणारे विल्यम हश्रेलचे सुपुत्र). फोटोग्राफी हा शब्द ग्रीक भाषेतून आला आहे - फोटो म्हणजे प्रकाश आणि ग्राफी म्हणजे आलेख. आपल्याकडे या प्रक्रियेला छायाचित्रण असे नाव रुजू झाले. पण, काहींचे म्हणणे होते, की याला प्रकाशचित्रण म्हणायला पाहिजे.

शुभ्रधवल देवमासा

 शुभ्रधवल देवमासा | White Whale

देवमाशांच्या जाती, उपजातींचे सातत्याने निरीक्षण आणि नोंदणी करण्यात येते. अमेरिकेतील न्यू इंग्लंड भागातील नॅशनल अक्वेरिअमचे संचालक डॉ. स्कॉट क्रॉस यांनी देवमाशांवर (व्हेल्स) प्रचंड संशोधन केले आहे. त्यांना सन २000 मध्ये जॉजिर्या आणि फ्लोरिडा प्रांताच्या किनारपट्ट्यांजवळील सागरी प्रदेशात संपूर्णपणे शुभ्रधवल रंगांच्या जन्म घेतलेल्या पिल्लांची माहिती मिळाली. देवमाशाचे मांस रुचकर आणि त्यांच्या शरीरातील तेल (चरबी) उपयुक्त असल्याने त्यांची मोठय़ा प्रमाणावर शिकार केली जाते. ल ऊर्फ देवमासा म्हणजे जलचर प्राण्यांमधील महाकाय भव्य प्राणी. देवमाशांच्या अनेक जाती, उपजाती आहेत. सरासरीने प्रत्येक प्रौढ देवमाशाचे वजन एक ते दीड टन, लांबी पंधरा ते वीस फूट असते. पसरट, शक्तिवान शेपटीमध्ये जबरदस्त ताकद असते. शेपटीच्या तडाख्याने लहान, मध्यम बोटी उलट्यापालट्या होतात. ही उपजात अगदी नाश होण्याच्या टप्प्यात आहे. १९९0 नंतर प्रथमच 'नॉदर्न राईट व्हेल' आढळून आले. सर्व व्हेल जातींच्या माशांचा रंग काळसर, राखाडी असतो.
व्हे या माशांना शास्त्रीय भाषेत 'नॉदर्न राईट व्हेल्स' नावाने संबोधण्यात येते. या माशांना शास्त्रीय भाशेत 'नॉदर्न राईट व्हेल्स' नावाने संबोधण्यात येते. या माशाच्या अस्थींपासून विविध प्रकारच्या वस्तू तयार करतात. या माशाच्या अस्थींपासून विविध प्रकारच्या वस्तू तयार करतात.

सुनामी

सुनामी


मानवासाठी समुद्र फायदेशीर आहे, तितका धोकादायकही. सुनामीसारखे संकट त्यातून कधी येईल सांगता येत नाही. सन २00४ च्या सुनामीने हाहाकार उडवला असला, तरी त्यातून या संकटाचा अभ्यास करता येणे शक्य झाले. रताचा सुनामीशी फारसा परिचय नव्हता. क्राकाटोआच्या सन १८८३ मधल्या स्फोटक उद्रेकाच्या वेळी निर्माण झालेली सुनामी नक्कीच भारतीय किनार्‍यावर थडकली असणार. कारण तिने पृथ्वी प्रदक्षिणा केली होती. पण त्या वेळी भारताची लोकसंख्या बरीच कमी होती. त्यामुळे त्या सुनामीने किनार्‍याला मारलेल्या धडकेने फारसं नुकसान झालं नसावं. त्या काळात अशा गोष्टी या 'देवाची करणी' या सदरात मोडत असत. शिवाय अशा घटनांची नोंद करणं हे ब्रिटिशांना ठाऊक होतं; भारतीयांना मात्र ते नीटपणे अंगवळणी पडलेलं नव्हतं. ज्याअर्थी वृत्तपत्रांनी क्राकाटोआच्या स्फोटक उद्रेकाची दखल घेताना सुनामीचा उल्लेख केलेला नाही, त्याअर्थी त्या सुनामीमुळे फारशी मनुष्यहानी झालेली नसावी, असं आपण म्हणू शकतो.
याउलट २६ डिसेंबर २00४ च्या सुनामीने भारताचा आग्नेय किनारा, श्रीलंका, मलेशिया, थायलंड आणि इंडोनेशियात जे थैमान घातलं त्यामुळे ती गाजली. सध्याच्या युगात बातम्या झपाट्याने पसरतात. त्याची लगेच दखल घेतली जाते. सागर किनार्‍याजवळची वस्ती वाढलेली आहे. याशिवाय बरेच पर्यटक हौसेने सागरकिनारी पुळणीवर, चौपाटीवर जाऊन सुट्टी घालवतात. यामुळे या सुनामीने नैसर्गिक तांडवाचा एक जबरदस्त फटका या भागाला दिला, असं म्हटलं तर वावगं होणार नाही. २६ डिसेंबर २00४ च्या सुनामीत किती व्यक्ती वाहून गेल्या, याची खातरजमा व्हायला एक वर्ष जावं लागलं. वर्षअखेरीस सुमारे सव्वादोन लाख व्यक्तींचे बळी या सुनामीने घेतले, तर दहा लाख लोकांना या सुनामीने बेघर केलं, अशी आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्या सुनामीमुळे एक गोष्ट प्रकर्षाने पुढे आली, ती म्हणजे वेगवेगळ्या कारणांमुळे किनार्‍यांजवळची मानवी वस्ती वाढत आहे. त्यामुळे इथून पुढे सुनामींमुळे होणारं नुकसान वाढतच जाणार आहे, यात शंकाच नाही.
ही सुनामी मानवी इतिहासातील सर्वाधिक अभ्यास झालेली आणि बारकाव्यांसह जिची छायाचित्रांसह लेखी नोंद झाली अशी सुनामी ठरली. यामुळे 'सुनामी'चं संकट येतं कसं, त्यात काय घडू शकतं, नक्की काय घडलं आणि हे संकट कसं टाळता येईल, त्याने होणारं नुकसान कमी करता येईल याबाबत या सुनामीच्या अभ्यासकांना बरेच दुवे मिळाले. बर्‍याच पर्यटकांनी त्यांचा जीव धोक्यात असतानादेखील प्रसंगावधान दाखवून या लाटांचं व्हिडिओ कॅमेर्‍याच्या साह्याने चित्रीकरण केलं. काहींनी त्यांचे अनुभव लिहून काढले. याची शास्त्रज्ञांना खूपच मदत झाली. सर्व सुनामीचं मूळ विशिष्ट प्रकारच्या भूकंपांशी निगडित असतं. ते कसं हे माहीत करून घेण्यासाठी आधी भूकवचाच्या रचनेची एका प्रयोगातून थोडी माहिती घेणे गरजेचे आहे. घरात थोडे दूध तापवायला ठेवा. मध्यम आचेच्या गॅसवर दुधाचं पातेलं ठेवलं तर दूध भराभरा ऊतू जात नाही व मोठय़ा ज्वालेवर ते ठेवलं तर लगेचच उतू जातं, हे यातून लक्षात येईल. पृथ्वीच्या जन्मकाळी खूप मोठय़ा पेटत्या गॅसवर दूध ठेवावं तशी परिस्थिती होती. आता ती तशी राहिलेली नाही.
ही दुधाच्या तापण्याची प्रतिमा थोडी अपूर्ण आहे. कारण पृथ्वीमध्ये आधी संपूर्ण पृष्ठभागावर दाट साय जमा होते. सायीचा थर दाट झाला, की जिथं पातेल्याच्या बुडाला पेटलेला गॅस तापवत असतो, त्या भागाच्या वर उकळी फुटते आणि सायीचे या उकळीच्या भोवती जर विस्तव बरोबर मधोमध असेल तर सारखे चार भाग होतात. दूध तसंच तापू दिलं तर ही साय कडेने खाली जाते, परत वर येते, सांधते, फुटते. काही वेळाने दूध वर येतं, पातेलं लहान असेल तर उतू जातं. यातल्या सायीचे भाग होऊन ती खाली जाऊन परत उकळीबरोबर वर येते. या क्रियेप्रमाणे क्रिया भूकवचाच्या बाबतीतही घडत असते. जिथे पृथ्वीच्या कठीण कवचावर कवचाचा दुसरा तुकडा खाली भूगर्भाच्या दिशेने दाबला जातो. या ठिकाणी भूकंपाचे धक्के बसतात. काही वेळा भूकवच एखाद्या सागरतळाच्या खोल दरीत जाते. त्या वेळी जे भूकंप घडतात त्यांच्यामुळे सुनामी उद्भवते. याचं कारण इथे पाणी जोरात हलवलं जातं. अशा सुनामींनी अनेकवार मानवी इतिहासात हाहाकार घडवून आणल्याच्या नोंदी आहेत. अशा सुनामींची माहिती आणि सुनामींच्या वेळचं आपत्ती व्यवस्थापन याची माहिती जाणून घेतल्यामुळे अशा वेळी काय करणं आवश्यक ठरतं, याचं ज्ञान आपल्याला होतं. 

किरणोत्सर्गी उपचार

 किरणोत्सर्गी उपचार

 किरणोत्सर्गी उपचार

आय.एम.आय.टी.- यामध्ये रुग्णाच्या कर्करोगग्रस्त अवयवावर सोडलेल्या प्रकाशझोताचे पुन्हा उपविभाग करून छोटे छोटे झोत बनवले जातात. या प्रत्येक उपविभागातून जाणारा किरणोत्सर्ग संगणकाद्वारे नियंत्रित केला जातो. यामुळे कर्करोगाच्या पेशीवर थोडा जास्त किरणोत्सर्गाचा मारा करता येतो आणि बाजूच्या निरोगी पेशींवर होणारा मारा सौम्य करता येऊ शकतो. यामध्ये बाह्य प्रकाशझोत किरणोत्सर्गी उपचार यंत्र किंवा टेलिथेरपी आजही अनेकदा वापरला जातो. यंत्नाची रचना

टेलिथेरपी यंत्र एकात एक गुंफलेल्या वर्तुळाकार भागांनी बनलेले असते.
१ शिशापासून बनलेले आंतरराष्ट्रीय मानकानुसार बनलेला किरणोत्सर्गी पदार्थांना पकडून ठेवणारा बाह्य भाग.
२ त्याच्या आतील एक लोखंडी वर्तुळाकृती पट्टी
३ किरणोत्सर्गाचा उगमस्रोत- एखाद्या डबीसारख्या दिसणार्‍या ३0 मि.मी. आकाराच्या या भागाच्या आत कोबाल्ट-६0 किंवा तत्सम किरणोत्सर्गी पदार्थ ठेवलेला असतो. त्यांच्या भोवती युरेनियम किंवा टंगस्टनने बनलेले एक संरक्षक कवच असते. या सर्व गोष्टींना सामावणारे स्टेनलेस स्टीलने बनलेले दुपदरी आवरण आणि तसेच दुपदरी झाकण असते.
४ एक विशेष मोजमाप वापरून बनवलेल्या क्ष-किरण यंत्राद्वारे उगमस्रोताच्या डबीतील किरणोत्सर्गी पदार्थामधून किरणोत्सर्गाचा झोत निर्माण केला जातो. शास्त्रीय तत्त्व
कर्करोगाच्या पेशीतील डी.एन.ए. किरणोत्सर्गी पदार्थांचा झोत त्यावर पाडून नष्ट करणे हे उपचाराचे मुख्य तत्त्व. डी.एन.ए. नष्ट करण्याचे कार्य या किरणोत्सर्गी प्रकाशझोतातील फोटॉन, बोरॉन, कार्बन, निऑन किंवा तत्सम किरणोत्सर्गाने प्रेरित कण करतात. हे कण कर्करोगाच्या डी.एन.ए.ला थेट नष्ट करतात किंवा कर्करोगाच्या पेशीतील पाण्याच्या कणांचे रूपांतर हायड्रोक्सील मुक्तरेणूमध्ये करतात. हे मुक्तरेणू त्या कर्करोगपेशीचे विघटन करून तिला नष्ट करतात. संशोधनाचा इतिहास
१८९५ मध्ये विल्हेम रॉन्टजेनने क्ष-किरणांचा शोध लावला. त्यानंतर वर्षभरातच अमेरिकेतल्या शिकागोमधील डॉ. एमिल ग्रब यांनी क्ष-किरणांचा वापर करून कर्करोगाचा इलाज करता येऊ शकेल असे प्रतिपादन केले. इ.स. १९00 मध्ये मादाम मेरी क्युरीने पोलोनियम आणि रेडियम या किरणोत्सर्गी संयुगांचा शोध लावला आणि या उपचारांसाठी एक नवे दालनच उघडले गेले. १९४0मध्ये कर्करोगाच्या इलाजासाठी कोबाल्ट आणि केझीयम या किरणोत्सर्गी पद्धती विकसित झाल्या. १९७0मध्ये सी.टी. स्कॅनचा शोध लावल्यावर त्या उपचारांची जागा लिनियर अँक्सिलरेटरने घेतली. तर १९८0 पर्यंत एम.आर.आय. आणि पेटस्कॅनचा वापर सुरू झाल्यावर आय.एम.आय.र्टी. आणि आय.जी.आय.टी. या अशा उपचारांच्या अत्याधुनिक पद्धती अस्तित्वात आल्या. प्रकार- किरणोत्सर्गी उपचारांचे तीन प्रकार आहेत
१. बाह्य प्रकाशझोत किरणोत्सर्गी उपचार- (एक्स्टर्नल बीम रेडिएशन थेरपी) किंवा टेलिथेरपी
२.बंदिस्त स्रोत किरणोत्सर्गी उपचार- (सील्ड सोर्स रेडिएशन थेरपी) किंवा ब्रेकिथेरपी
३. रक्ताद्वारे किरणोत्सर्गी संयुगे देऊन उपचार- (रेडिओ आयसोटोप थेरपी) र्करोगाच्या सुरुवातीच्या अवस्थेत त्याचे निदान झाले तर शस्त्रक्रियेद्वारे रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो. आधुनिक वैद्यकशास्त्रामुळे हे शक्य झाले आहे; पण दुर्दैवाने आपल्या देशात बहुसंख्य रुग्ण हे आजार खूप वाढल्यानंतरच उपचारासाठी येतात. अशा वेळी डॉक्टर त्यांना 'लाईट घेण्याचा' उपाय सांगतात, यालाच क्ष-किरणांद्वारे केले जाणारे किरणोत्सर्गी उपचार म्हणतात. अशा अंतिम अवस्थेतील कर्करोगाचा इलाज करणार्‍या डॉक्टरांसाठी ते हार निश्‍चित असलेले एक प्रकारचे युद्ध असते; पण तरीही त्या रुग्णाचे आयुष्य काही वर्षांनी वाढविणे यामुळे शक्य होते. मानवी बुद्धिमत्तेनेही हात टेकलेला आजार म्हणजे कर्करोग. आजच्या आधुनिक काळातही मानवासाठी तो असाध्यच आहे, मात्र विविध प्रकारचे संशोधन, औषधे, उपकरणे यातून त्याची तीव्रता कमी करणे शक्य झाले आहे. रेडिओथेरपी ही अशीच उपचारपद्धती आहे. रुग्णाचे आयुष्य यामुळे वाढू शकते.

ख्रिसमस ट्री

ख्रिसमस ट्री


ख्रिसमस ट्री
डिसेंबर हा इंग्रजी कॅलेंडरचा बारावा महिना. अखेरचा महिना असला, तरी वाच्यार्थाने तो ं१्रं'>ऊीूं /ं१्रं'>म्हणजे दहावा महिनाच आहे. २५ डिसेंबर हा ख्रिस्ताचा जन्मदिवस. त्यापूर्वीची रात्र ख्रिसमस म्हणून साजरी करतात. सगळे ख्रिश्‍चन बांधव उत्साहात असतात. घराघरांवर आकाशदिवे लावले जातात. चर्चमध्ये जमून प्रार्थना करतात. केक कापतात. त्याचे परस्परांना वाटप करतात. आनंद व्यक्त करतात. ख्रिसमस ट्रीच्या साक्षीने हे सगळे सुरू असते. ख्रिसमस ट्री हा नाताळ सणाचा अविभाज्य भाग आहे. त्याच्याशिवाय हा सणसाजराच होऊ शकत नाही. या सणाचे हे प्रतीक होण्यामागे भलामोठा इतिहास आहे. नाताळबाबाच्या आगमनाबरोबरच ख्रिसमस ट्री दिसू लागतो. हिरव्यागार फांद्या व त्यावर लावलेले आकर्षक दिवे. टेबलवर ठेवता येईल इतक्या लहान आकारापासून ते घराच्या अंगणात मावणार नाही एवढा मोठा आकार असलेला हा ख्रिसमस ट्री म्हणजे नक्की काय? खरेच असा वृक्ष आहे का? असला तर तो कुठे असतो? कसा दिसतो? ख्रिसमसनिमित्त उलगडलेल्या या अनोख्या वृक्षाचा मनोरंजक इतिहास.

या वृक्षाच्या प्रजनन अवयवांना वानसशास्त्रज्ञ 'फुलं' म्हणत असले, तरी सामान्यजन त्यांना फुलं म्हणण्याचं धाडस करणार नाहीत. 'मा फलेषु कदाचन' हे वचन आरॉकॅरिया आणि त्याच्या जातकुळीची सर्वच मंडळी तंतोतंत पाळतात. त्यांना बिया येतात; पण फळं नाहीत. बिया अनावृत्त म्हणजे उघड्या. या बियांच्या गुच्छामुळे शंकू तयार होतो. त्यालाच फूल समजले जाते. सजवल्यावर देखणेपणात भर आरॉकॅरिया अत्यंत देखणा वृक्ष आहेच. पण, २५ डिसेंबरला तर त्याची शान अधिकच वाढते. कारण, त्या दिवशी तो ख्रिस्तजन्माचं प्रतीक आहे. त्याला सजवण्यासाठी त्यावर मेणबत्त्या लावण्याची प्रथाही आहे. आता मेणबत्त्यांची जागा रंगीबेरंगी विजेच्या दिव्यांनी घेतली आहे. तसेच त्यावर रंगीत कागदात गुंडाळलेली चॉकलेट व लहान मुलांना नाताळबाबाकडून भेट मिळणार्‍या वस्तूही लावतात. त्यामुळेच या वृक्षाच्या देखणेपणात भरच पडते. देव आणि भक्तांमधील दुवा
आरॉकॅरिया 'ख्रिसमस ट्री' कसा झाला? हा तर दक्षिण गोलार्धात अस्तित्वात आला. ख्रिस्तायन घडलं उत्तर गोलार्धात. जेरुसलेमच्या आसपासच्या प्रदेशात. मग त्यासाठी आरॉकॅरिया दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धात कसा पोहोचला? अर्थात, माणसामुळेच. आरंभीच्या काळात 'ओक' वृक्षाला 'ख्रिसमस ट्री'चा मान होता. ओक म्हणजे 'कॉर्क ट्री'. ज्याच्या सालीपासून बाटलीची बुचे तयार करतात, तो वृक्ष. १६0५पर्यंत ख्रिस्ती धर्म र्जमनीतही झाला होता. तिथे बॉनीफेस नावाचे धर्मोपदेशक होते. त्यांनी लोकांना असं पटवून दिलं, की ओकपेक्षाही आरॉकॅरिया हा अधिक योग्य. कारण, ओकचा फापटपसारा अधिक. आरॉकॅरिया एखाद्या अँटेनासारखा आकाशाकडे झेपावतो. दयाघन प्रभूकडे तुमच्या प्रार्थना, मागण्या पोहोचवतोच; पण त्याच्याकडून तुमच्यासाठी आशीर्वादही आणतो. खरं तर देवबाप्पा तुमच्या घरात आणि मनातच आहे. एका वृक्षाला घरी आणून देवाला त्यावर स्थानापन्न करा. म्हणून - ख्रिसमस वृक्षाला सजवतात. त्यावर दीप लावतात.पाह पानांचा आकार त्रिकोणी
मुख्य फांद्यांची रचना निश्‍चित घेरांमध्ये त्यावर छोट्या फांद्यांच्या दोन रांगा दोन्ही अंगावर. छोट्या फांद्यांची अग्रं वरती वळलेली, अथवा खाली झुकलेली. या फांद्यांवर काट्यांसारखी टोकदार त्रिकोणी पानं. या अशा वृक्षाच्या फांद्यांवर बागडणं र्मकट मंडळींनाही एकूण अवघडच. म्हणूनच की काय 'आरॉकारिया'ला मंकी पझल ट्री (माकडांनाही गोंधळात टाकणारे झाड) असं नाव आहे. उंची आणि फांद्यांची अशी रचना यांमुळे खरोखरच माकडांना या झाडांवर अवघडल्यासारखे होते. त्यामुळे सहसा ती याच्या वाटेला जात नाहीत, असे निरीक्षण आहे. दीपमाळेसारखे रूप
आरॉकारिया चिलीचा तर आरॉकारिया कुकी न्यू कॅलेडोनियाचा. आपल्या जन्मभूमीत हा जवळजवळ दोनशे फूट उंची गाठतो. रूप एखाद्या दीपमाळेसारखं. शेंडा गगनाला गवसणी घालण्यासाठी सज्ज. थेट आकाशाला भिडल्यासारखाच दिसत असल्यामुळेच प्रत्यक्ष देवाशी संवाद साधतोय की काय, असं वाटतं. पुढे एका धर्मगुरूने हेच प्रतीक वापरलं व या वृक्षाला ख्रिसमस ट्री बनवलं. त्याला लगेचच मान्यताही मिळाली.