कीटकांचे गंध Smelling Capacity of Insects
कीटक त्यातही मुंग्या इतक्या शिस्तीत वागतात कशा, असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याचे उत्तर कीटक त्यांच्या शरीरातून वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या वासांचे स्राव सोडत असतात यात आहे. ण्यांच्या शरीरामध्ये असलेल्या स्रावकग्रंथींमधून ते विविध स्राव शरीराबाहेर सोडत असतात. त्यातील काही स्रावांना विशिष्ट गंध असतो आणि त्या गंधातही विशिष्ट प्रकारचा संदेश दडलेला असतो. हा गंध आणि त्यातील संदेश, ज्या प्राण्याने तो स्राव शरीराबाहेर सोडला, त्याचे जातभाई वा जातभगिनीच ओळखू शकतात आणि संदेशानुसार कृतीही करतात. या स्रावामध्ये संप्रेरकाचा समावेश असतो. अशा स्रावासाठी इंग्रजी भाषेत फेरोमोन/फेरोमोन्स असा ग्रीक भाषेतील जोडशब्द वापरला जातो. मराठी भाषेत त्याला प्रतिशब्द म्हणून 'लिंग गंध' हा शब्द वापरला जातो. खरे तर लिंग गंध हा गंध फेरोमोन्स या सं™ोने ओळखल्या जाणार्या नऊ गंधांपैकी केवळ एक गंध आहे. मराठीत फेरोमोन्सला 'वातवाही संप्रेरक गंध गट' असे म्हणावयास हवे.
कामकरी मधमाशी तिला बिचकावणार्या किंवा हल्ला करणार्या माणसाला जेव्हा डंख करते, तेव्हा ती तिच्या पोळय़ातील इतर कामकरी मैत्रिणींना धोक्याचा इशारा आणि मदतीला येण्याची हाक स्राव गंधानेच देते. त्याला 'इशारा गंध' म्हटले जाते.
मुंग्या, वारुळाबाहेरील अन्नसाठा शोधल्यावर, अन्नांश वारुळात आणताना वाटेमध्ये जागोजागी आपल्या पोटाचे शेवटचे टोक टेकवत असतात. त्या वेळी त्या त्या जागी गंधस्रावाचा थेंब सोडीत असतात. त्याचा उद्देश, वारुळातून अन्नासाठी बाहेर पडणार्या अन्य मुंग्यांनी त्या गंधाच्या अनुरोधाने विनासायास अन्नसाठय़ापर्यंत जावे हा असतो. अन्नमार्गाचा गंध वातवाही संप्रेरक गंध गटातील एक गंध असतो.
असे सांगितले जाते, की वाळवीच्या वारुळातील सारे व्यवहार वातवाही संप्रेरक गंध गटातील निरनिराळय़ा गंधांवरच अवलंबून असतात. राणी वाळवीच्या त्वचेतून गंधस्राव जणू पाझरत असतात. त्यातील गंध कामकरी घटकांना राणीजवळ येऊन तो चाटण्याचा संदेश देतो. कामकरी घटकांनी तो चाटला आणि त्यातील काही अंशरक्षक घटकांना पाजला, तर कामकरी आणि रक्षक घटक प्रजननास अपात्र ठरतात. शिशू कामकरी घटक, भूक लागल्यानंतर अन्न पुरविणार्या मोठय़ा कामकरी घटकांना त्यांच्या शरीरातील गंधस्राव बाहेर सोडून त्या करवी घास भरविण्याची विनंती करतात. त्यास 'लाचार गंध' वा 'विनंती गंध' म्हणतात. वातवाही संप्रेरक गंध गटाचे उपगट (उदा. लिंग गंध, इशारा गंध इत्यादी) पडण्याचे कारण त्या-त्या स्रावामध्ये वेगवेगळी रासायनिक संयुगे असतात हे होय. (उदा. मधमाशीने मैत्रिणींना एकत्र येण्यासाठी वापरलेल्या गंधस्रावामध्ये नेरॅलिक किंवा जेरॅनिक आम्ल असते, वाळवीच्या शिशू कामकर्यांनी पोटभरीसाठी वापरलेल्या लाचार गंधामध्ये इ-हेवझेन एल.ओ.एल. हे रासायनिक संयुग असते.)
No comments:
Post a Comment