एडवर्ड जेन्नर देवी ची लस, Edward Jenner's Smallpox vaccine
काही शास्त्रज्ञ त्यांचे संशोधन व निष्कर्ष याबद्दल इतके ठाम असतात, की
त्याचे प्रयोग स्वत:वरही करण्याची त्यांची तयारी असते. डॉ. जेन्नर यांनी
त्या पुढची पायरी गाठत देवीसारख्या त्या काळी असाध्य मानल्या जाणार्या
आजाराची लस आपल्या ११ महिन्यांच्या मुलाला टोचली. ज्ञानाच्या इतिहासामध्ये
अनेक संशोधकांनी आपले संशोधन पूर्णत्वास नेण्यासाठी धाडसी प्रयोग केलेले
आहेत. हे प्रयोग मुख्यत: उपकरणाच्या उपयोगाच्या बाबतीत होते. जेन्नर यांनी
केलेले प्रयोग मात्र तरुण आणि लहान मुलांच्या संबंधातील होते. विशेष
म्हणजे, त्यांना आपल्या संशोधनाविषयी आणि आपण केलेल्या अनुमानाविषयी एवढी
खात्री होती, की त्यांनी त्यांच्या संशोधनाचा प्रयोग स्वत:च्या ११
महिन्यांच्या मुलावर केला. अठराव्या शतकात जगातील अनेक देशांमध्ये 'देवी'
हा रोग अतिशय दुर्धर असा मानला जाई. देवीची लागण झाल्यामुळे शरीरावर अनेक
विपरित परिणाम होत आणि काही लोकांना अंधत्व येत असे. त्याचप्रमाणे अनेक
मुले या रोगाला बळी पडत.
एखाद्या समस्येने अनेक जण ग्रस्त असतात.
मात्र, ती समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार्या व्यक्तींची संख्या अगदीच
कमी असते. जेन्नर हे तरुणपणी जॉन हंटर या शल्यविशारदाबरोबर त्यांचे
साहाय्यक म्हणून काम करीत होते. जॉन हंटर यांनी त्यांना एक कानमंत्र दिला
होता. तो म्हणजे 'विचार करू नका, प्रयत्न करा.' जेन्नर यांनी छातीमध्ये
होणार्या वेदनांचे मूळ शोधण्याचा प्रयत्न केला. अठराव्या शतकात युरोपमध्ये
आपल्याकडील झोपडपट्टींशी साम्य दाखवणारी वसाहत होती. त्यामुळे तेथेही डास,
पिसवा यांसारख्या कीटकांचा प्रादुर्भाव होता. त्यामुळे पिसवांपासून
होणार्या रोगावरही त्यांनी संशोधन केले.
हे संशोधन करीत असताना 'देवी'
या रोगामुळे होणार्या 'अपरिमित नुकसानी'कडे त्यांचे लक्ष गेले. त्या काळी
देवी हा रोग असाध्य मानला जाई. त्यांचा होणारा प्रादुर्भाव इतका प्रचंड
होता, की जवळ जवळ ६0 टक्के लोकांना त्याची लागण होत असे. या लागण झालेल्या
लोकांपैकी २0 टक्के लोक, तर मृत्युमुखी पडत. त्याचप्रमाणे चेहरा विद्रूप
होणे, दृष्टीवर परिणाम होणे यांसारख्या गोष्टी घडून येत.
देवी या रोगावर
उपाय शोधण्याचा विचार करत असताना, त्यांच्या नजरेस एक गोष्ट पडली. गाईची
धार काढणार्या स्त्रियांना या रोगाची लागण झाली, तरी त्यांच्यावर या
रोगाचा होणारा परिणाम अतिशय कमी असे. या निरीक्षणावर विचार करताना
त्यांच्या डोक्यामध्ये अशी कल्पना आली, की गाईंना होणारा देवीचा
प्रादुर्भाव आणि त्यांच्या संपर्कातील स्त्रियांना होत नसलेला प्रादुर्भाव
यामध्ये काहीतरी रहस्य दडलेले असावे. गाईच्या संपर्कात आल्यामुळे
स्त्रियांना या रोगापासून बचाव करण्याची क्षमता प्राप्त होत असावी हे
अनुमान तपासण्यासाठी त्यांनी एक धाडसी प्रयोग केला. गाईला झालेल्या
देवीच्या व्रणातील स्राव त्यांनी एका १८ वर्षांच्या तरुणाच्या शरीरात
टोचला. त्याचाच परिणाम असा झाला, की, त्या तरुणाला देवीची लागण झाली नाही.
असाच प्रयोग त्यांनी इतर २३ व्यक्तींवर केला. त्यामध्येही त्यांना
समाधानकारक यश मिळाले. असे होऊनही संशोधकांनी मात्र त्यांचा शोध मान्य केला
नाही. शेवटच्या प्रयोगात त्यांनी या चाचणीमध्ये आपल्या ११ महिन्यांच्या
मुलाचा समावेश केला. त्यांनी सातत्याने केलेल्या या प्रयोगामुळे संशोधकांना
त्यांची दखल घ्यावी लागली. अखेर त्यांचे अनुमान मान्य होऊन देवीच्या
रोगावर प्रतिबंधक लस तयार झाली. इंग्रजीमधील Vaccination हा शब्द Vacca
म्हणजे गाय या शब्दापासून तयार झालेला आहे. देवीच्या व्रणातील स्राव
शरीरामध्ये टोचल्यामुळे मानवाची प्रतिष्ठा कमी होते, असा आक्षेप घेण्यात
आला. मात्र, या रोगामुळे हजारो लोक मृत्युमुखी पडतात, याबाबत मात्र त्यांनी
आस्था दाखविली नाही. जेन्नर यांची कल्पकता आणि त्यांची धाडसी वृत्ती
यामुळे हे वरदान प्राप्त झाले.
No comments:
Post a Comment