इंटेरनेट कैमरा
सीसीटीव्ही तंत्रज्ञानातच आता आय.पी. कॅमेरा या नावाची नवी यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. आय.पी. म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल कॅमेरा. यात इंटरनेटवर आय.पी. अँड्रेस टाकून हे कॅमेरे इंटरनेटवरूनच कुठूनही ऑपरेट करता येतात. या नव्या प्रणालीमुळे प्रत्येक वेळी मॉनिटरिंग रूममध्ये जाऊन बसण्याचा त्रास वाचला आहे. पोलीस किंवा प्रशासन पाहिजे त्या वेळी, पाहिजे त्या ठिकाणाचे निरीक्षण करू शकतात, यासाठी आर. जे.४५ या केबलचा वापर करतात.सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या आकारातही लक्षणीय बदल झाले आहेत. अत्यंत छोटे, सहसा नजरेसही पडणार नाहीत असे कॅमेरे उपलब्ध आहेत. संशोधन करून त्यांच्या क्षमतेतही बदल केले जात आहेत. सध्याच्या काळात असंख्य प्रकारचे धोके आहेत. त्यातून वाचायचे असेल तर हे तंत्रज्ञान आवश्यक असेच आहे. पूर्वी फक्त श्रीमंत व्यक्ती किंवा कारखानदार वगैरेंकडूनच याचा वापर होत होता. आता मात्र सर्वसामान्य व्यापारी, दुकानदार हेही अशी यंत्रणा बसवून घेतात, त्याचा खर्चही आता सामान्यांच्या आवाक्यात येणारा आहे.
No comments:
Post a Comment