Blogroll

Photosynthesis प्रकाश संश्लेषण

Photosynthesis  प्रकाश संश्लेषण



वनस्पती प्रकाशात ऑक्सिजन बाहेर टाकत असतात, तर अंधारात कार्बन डायऑक्साईड. सजीवांसाठी महत्त्वाच्या असलेला ऑक्सिजन बाहेर टाकण्याचे प्रमाण यात अधिक आहे. 
Photosynthesis  प्रकाश संश्लेषण

व्हा एखादा सेकंद आपला श्‍वास कोंडल्यामुळे जीव गुदमरतो, त्यावेळी आपल्याला निसर्गातून मोफत उपलब्ध होणार्‍या प्राणवायूचे म्हणजेच ऑक्सिजनचे अस्तित्व न दर्शविणार्‍या या वायूचे महत्त्व पटते. सर्व सजीवांना आवश्यक असलेला हा प्राणवायू कसा निर्माण होतो, आणि वनस्पतींच्या वाढीसाठी प्रकाश संश्लेषण किती आवश्यक असते, या संदर्भात अनेक संशोधक कार्यरत होते, तरी त्यापैकी फक्तपाच संशोधकांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. परंतु, या संदर्भातील संशोधनाचे श्रेय डच शास्त्रज्ञ ज्ॉन इन्जेन हाऊझ यांना जाते.
१६४३ मध्ये जॉन बॉप्टीस्टा व्हॅन हेलमोट या शास्त्रज्ञाने वनस्पतीची वाढ ही केवळ मातीतून मिळणार्‍या घटकांमुळे न होता त्यांच्या वाढीसाठी पाण्यातील घटकांचीही तेवढीच आवश्यकता असते, असा निष्कर्ष जैविक प्रयोगाच्या आधारे काढला. त्यानंतर तब्बल १२५ वर्षांनंतर १७७0 मध्ये जोसेफ प्रिस्टली हे वनस्पतीवर काही प्रयोग करीत असताना, त्यांनी एका वनस्पतीवर काचेचा चंबू उपडा ठेवला, त्यावेळी चुकून त्या चंबूमध्ये मेणबत्ती राहिली. त्यावेळी चंबूमधली मेणबत्ती नेहमीपेक्षा जास्त प्रकाशमान झाल्याचे आढळले. यावरून वनस्पती प्रकाशात असताना ऑक्सिजन बाहेर टाकतात, असा निष्कर्ष काढला.
त्यानंतर शरीरशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्राचे अभ्यासक आणि राजवैद्य असलेले इन्जेन हाऊझ यांनी जोसेफ प्रिस्टली यांचे 'वनस्पतीतील वायुशोषण' या विषयावरील संशोधन अभ्यासले. त्यातून त्यांची वनस्पतीतील वायूंचे शोषण कसे होते, हे जाणून घेण्याची उत्सुकता वाढली. त्यानंतर त्या उत्सुकतेतून अनेक प्रयोग केले. प्रकाशामध्ये वनस्पती हिरव्या पानांच्याद्वारे बुडबुड्यांच्या रूपात विशिष्ट प्रकारचे वायू बाहेर सोडतात, तर अंधारात क्रिया थांबते, असे त्यांच्या लक्षात आले. या शोधानंतर अनेक प्रयोगानंतर प्रकाशात वनस्पतीतून बाहेर पडणारा वायू हा ऑक्सिजन तर अंधारात बाहेर पडणारा वायू कार्बन डायऑक्साईड असतो व वनस्पतींतून बाहेर पडणार्‍या ऑक्सिजनचे प्रमाण कार्बन डायऑक्साइडपेक्षा अधिक असतो, असा त्यांनी निष्कर्ष काढला. वनस्पतीची वाढ ही फक्त जमिनीतील विविध घटकांमुळेच होत नसून हवेतील किंवा प्रकाशातील घटकही त्याला कारणीभूत असतात, असेही त्यांनी सिद्ध केले. वनस्पतींच्या हिरव्या पानांतील हरितद्रव्यामुळे प्रकाशऊज्रेचे रूपांतर रासायनिक ऊज्रेमधे (सुक्रोज व फ्रुक्टोज) होते. व ती ऊर्जा वनस्पतीमध्ये साठविली जाते, या प्रक्रियेला 'प्रकाश संश्लेषण 'असे म्हणतात. इन्जेन हाऊझ १७८५ मध्ये त्यांनी अल्कोहलच्या पृष्ठभागावर असलेल्या कोळशाच्या कणांची अनियमित हालचाल कशामुळे होते, यावर संशोधन केले. इन्जेन हाऊझ रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून १७७९ मध्ये निवडून आले. त्याचवर्षी त्यांचे निधन झाले.

No comments:

Post a Comment