Blogroll

किरणोत्सर्गापासून Radioactivity

किरणोत्सर्गापासून Radioactivity 



किरणोत्सर्गापासून होणारी हानी महाभयंकर असली, तरी काही विधायक कामांसाठीही किरणांचा उपयोग होत असल्याने अनेकांना त्या क्षेत्रात काम करावे लागते. त्यांच्यासाठी शास्त्रज्ञांनी संशोधन करून किती प्रमाणातील किरणांचा मारा मानवी शरीराची हानी करू शकतो हे ठरवले. नवी शरीर किती प्रमाणात किरणांचा मारा सहन करू शकते या विषयावर शास्त्रज्ञांनी बरेच संशोधन केले आहे. या उपलब्ध माहितीच्या आधारे १९३४ मध्ये इंटरनॅशनल रेडिओलॉजिकल प्रोटेक्शन क्ष किरणे किंवा गॅमा किरण यांसारख्या स्रोतांच्या सान्निध्यात काम करणारे लोक जास्तीत जास्त 0.२ रॉटगेन (प्रारणांची पातळी दर्शविणारे एकक) एवढा किरणांचा मारा सहन करू शकतात असे ठरविले. प्रतिदिवस एवढा मारा सहन केला, तर कुठलीही इजा मानवी शरीरास होत नाही, असा निष्कर्ष काढला गेला. पण १९३६ मध्ये मानवी शरीरास सहन करण्याजोग्या किरणांचा मारा जास्तीत जास्त 0.१ रॉटगेन प्रतिदिवस एवढा कमी करण्यात आला. १९४९ पर्यंत हेच प्रमाण गृहीत धरण्यात आले होते. या दरम्यानच्या काळात अणुशक्ती केंद्राने पुढाकार घेऊन दुसर्‍या महायुद्धात या घातक अणुकिरणांना बळी पडलेल्यांना प्राधान्य देऊन, शास्त्रज्ञांना नव्याने संशोधन करण्यास भाग पाडले. या संशोधनाची परिणती म्हणजे मानवी शरीरास चालण्याजोगा किरणांचा मारा 0.३ रेम (शोषित प्रारणांचे एकक) प्रतिआठवड्यावर येऊन स्थिर झाला. शास्त्रज्ञांनी ही शिफारस १९५६ मध्ये पुन्हा बदलली व किरणांचा मारा हा प्रतिवर्षाला ५ रेमपेक्षा जास्त वाढता कामा नये असे ठरवले. या संदर्भात १९६0 मध्ये संपूर्ण रेडिएशन प्रोटेक्शनबद्दल परीक्षण करून यू.एस. फेडरल रेडिएशन काऊन्सीलने त्यांचा अहवाल रेडिएशन प्रोटेक्शन गाईड म्हणून प्रकाशित केला व जेथे किरणांचा स्रोत, क्षेत्र आहेत, अशा प्रयोगशाळांमध्ये तो ठेवला. या मागचा हेतू असा, की कोणीही मानवी शरीरास किरणांचा मारा किती चालण्याजोगा आहे, यासंदर्भात चुकीची माहिती देऊ नये असा होता. याच मार्गदर्शिकेच्या आधारावर जे लोक किरणांच्या सान्निध्यात अथवा स्रोतामध्ये काम करीत नाही, त्यांच्यासाठी किरणांची सुरक्षित र्मयादा 0.५ रेम एवढी ठरवली आहे.
यानंतर अधिक संशोधन करून शास्त्रज्ञांनी मानवी शरीराच्या विविध अवयव व इंद्रियांसाठी किरणांची सुरक्षित र्मयादा काढली आहे. शरीराच्या वेगवेगळ्या इंद्रियांसाठी असलेली किरणांची सुरक्षित र्मयादा आंतरराष्ट्रीय समितीने नमूद केलेली आहे. यात अस्थीमज्जा, डोळ्यांची बुबुळे, रक्तपेशी, जनन प्रपिंड यांना ३ रेम, शरीराच्या सर्व त्वचेला ३0 रेम, हात, पाय, बाहू, पायाच्या घोट्याला १५ रेम, इतर इंद्रियांना १५ रेम, मानवाच्या पूर्ण शरीरास 0.५ रेम आणि प्रजनन संस्थेस सरासरी ५ रेम याप्रमाणे र्मयादा ठरवण्यात आली आहे.
तीव्र प्रमाणात असणारा किरणांचा मारा मानवी शरीराला अपाय करतो, हेही शास्त्रज्ञांनी संशोधनातून सिद्ध केले आहे. या प्रकाराचा तीव्र मारा अणुबॉम्ब उत्पातात किंवा अणुकेंद्राच्या अपघातात होणे शक्य आहे.

No comments:

Post a Comment