Blogroll

किरणोत्सर्ग - रेडिओअँक्टिव्हिटी चा इतिहास | रेडिओअँक्टिव्हिटी म्हणजे का्य? | What is Radioactivity In Marathi

किरणोत्सर्ग - रेडिओअँक्टिव्हिटी चा इतिहास | रेडिओअँक्टिव्हिटी म्हणजे का्य? | What is Radioactivity In Marathi 


आपल्या सभोवती निसर्गात अनेक चमत्कार घडत असतात. सर्वसामान्यांच्या नजरेतून जरी हे चमत्कार सुटत असले तरी शास्त्रज्ञ या चमत्कारांना आव्हान मानतात आणि त्या चमत्कारांचा मुळातून शोध घेतात. निसर्गातील असाच एक चमत्कार म्हणजे रेडिओअँक्टिव्हिटी. न्टजेन यांच्या क्ष-किरणाच्या शोधाने जगभरात आश्‍चर्याचे, आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. त्याच सुमारास अँन्टोने हेन्री बेक्वेरेल आणि त्यांचे वडील अलेक्झांडर एडमन्ड बेक्वेरेल हे दोघेही चकाकणारे पदार्थांसंबंधी (फ्लोरोसेन्स) संशोधन करीत होते. रॉन्टजेनच्या संशोधनामुळे प्रभावीत झालेल्या बेक्वेरेल यांनी संग्रहालयातील युरेनियमचा एक चकाकणारा दगड (फॉस्फोरन्ट) एका फोटोग्राफिक प्लेटवर ठेवला, त्यामुळे ती प्लेट काळी होते का, याचे निरीक्षण केले. या निरीक्षणातून बेक्वेरेल यांनी रॉन्टजेन यांनी शोधलेल्या किरणोत्सारी पदार्थामधून प्रकाशकण बाहेर पडत असल्यामुळेच चित्र स्पष्ट दिसू शकते असे गृहीतक मांडले. हे गृहीतक अधिक स्पष्ट करण्यासाठी बेक्वेरेल यांनी फोटोग्राफिक प्लेट काळ्या कागदात गुंडाळून त्यावर चकाकणारा खनिज पदार्थ ठेवला. त्या खनिज पदार्थाला उत्तेजित करण्यासाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असल्याने त्यांनी तो प्रयोग खिडकीजवळ करण्याचे ठरवले. २४ फेब्रुवारी १८९६ या दिवशी त्यांनी अँकॅडमी ऑफ सायन्सेसच्या सभेमध्ये या प्रयोगाचा निष्कर्ष सादर केला. पोटॅशियम युरानिल सल्फेटच्या स्फटिकातून बाहेर पडणारे किरण काळ्या रंगाच्या कागदाला भेदून फोटाग्राफिक प्लेटवर परिणाम करतात. हा निष्कर्ष अधिक स्पष्ट करण्यासाठी बेक्वेरेल यांनी काही नाणी आणि विविध धातूंचे पत्रे स्फटिकाच्या खाली ठेवले तरीही त्यांना तोच परिणाम दिसला. अर्थात एक्स-रे ची आणि किरणोत्सारांची तुलना करणे संयुक्तिक नव्हते कारण क्ष-किरणांचा परिणाम अल्पावधीत अत्यंत स्पष्ट दिसतो. ती स्पष्टता बेक्वेरेल यांच्या प्रयोगात दिसून येत नव्हती. बेक्वेरेल यांनी पुन्हा प्रयोग करायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी विविध प्रकारचे स्फटिक व फोटोप्लेट एका रांगेत खिडकीजवळ ठेवले. परंतु त्यादिवशी पॅरिस वेधशाळेने ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाश मिळणार नाही असे भाकीत केल्याने हा प्रयोग नंतर करण्याचे बेक्वेरेल यांनी ठरवले आणि त्या सर्व प्लेट्स आणि स्फटिके कपाटाच्या एका खणात ठेवल्या. परंतु नंतर त्या प्लेट्स पाहण्याचे ते विसरले. १ मार्च १८९६ यादिवशी ऑफिसमध्ये आल्यावर बेक्वेरेल यांनी कपाटातून स्फटिक व फोटोप्लेट बाहेर काढल्या तेव्हा त्या प्लेटवर स्फटिक किरणांचा काही प्रमाणात परिणाम झाला असावा असे त्यांना वाटले परंतु भरपूर सूर्यप्रकाशात जसा परिणाम साधला जात असे तोच परिणाम अंधारातही साधला गेला. त्यामुळे योगायोगाने लागलेल्या या शोधाचा बेक्वेरेल यांना अतिशय आनंद झाला. यातून सिद्ध झाले, की युरेनियमसारख्या खनिजामधून स्वयंस्फूर्तीने बाहेर पडणार्‍या किरणांना सूर्यप्रकाशाची आवश्यकता नसते. त्यानंतर युरोपमध्येच नव्हे तर जगभर हे प्रयोग केले गेले. त्या प्रयोगांचा परिणाम जगभर तोच दिसला. 
शास्त्रज्ञांना सुरुवातीला खनिजातून बाहेर पडणारे किरण क्ष-किरण असल्याचा भास झाला. नंतर मात्र क्ष-किरण आणि किरणोत्सारी किरण यांतील फरक लक्षात येऊ लागला. प्रयोग करताना किरणोत्सारामध्ये प्रचंड ऊर्जा असून, त्याचे तीन भागांत विभाजन होऊ शकते असे लक्षात आले. किरणोत्सारातून बाहेर पडणार्‍या तीनही किरणांना नंतर अनुक्रमे अल्फा, गॅमा आणि बिटा अशी नावे देण्यात आली. अधिक संशोधनांती असे लक्षात आले, की अल्फा किरण धन प्रभारीत असतात, बिटा किरण हे ऋण प्रभारीत असतात तर गॅमा किरण हे प्रभाररहीत असतात. 
अँन्टोन हेन्री बेक्वेरेल याच्या या किरणोत्सारी (रेडिओअँक्टिव्हिटी)च्या क्रांतिकारी शोधामुळे अणू भौतिकशास्त्राचा उदय झाला. आज अनेक देशांत रेडिओअँक्टिव्हिटीचा उपयोग विविध क्षेत्रांत होत आहे.

No comments:

Post a Comment