Blogroll

हस्त व शशक नक्षत्र

हस्त व शशक नक्षत्र


आकाशात दिसणाऱ्या हस्त व शशक या नक्षत्रांचा अभ्यास आपण करणार आहोत. हस्त नक्षत्र पूर्वेकडच्या गोलार्धाचा नकाशा घेऊन उजवीकडच्या आग्नेय दिशेस पाहिल्यास क्षितिजापासून २० अंशांवर सहज दिसू शकते. या नक्षत्रात चार ठळक तारे आहेत. त्यांचा चौकोन सहजपणे लक्षात येतो. या नक्षत्राची दुसरे नाव आहे Corvus व कावळा. भारतीय खगोलशास्त्रात यातील दोन महत्त्वाच्या ताऱ्यांची नावे अंगुष्ठ (बी) व मध्यमा (४) अशी आहेत.
हस्त नक्षत्राप्रमाणेच फारसे महत्त्वाचे नसलेले, पण दक्षिणेकडील आकाशात दिसणारे नक्षत्र म्हणजे शशक. दक्षिण गोलार्धात उजवीकडून दुसऱ्या भागात क्षितिजापासून ६० अंश हे नक्षत्र मार्चमध्ये रात्री ८च्या सुमारास सहज पाहता येते. मृग नक्षत्राच्या खालच्या बाजूस हे नक्षत्र आहे. शशक म्हणजे ससा. हे नक्षत्र उलटी खुर्ची ठेवण्याप्रमाणे आकाशात दिसते. या नक्षत्राला Orions Chair ½F Chair of Giants असेही संबोधले जाते.
शशक नक्षत्रामध्ये जो तारा तांबडय़ा रंगाच्या हिऱ्याप्रमाणे चमकताना दिसतो तो आर लेपोटीस. त्याच्या दीप्तीमध्ये दर ४३२ दिवसांनी फरक पडत असतो. या ताऱ्यास ‘हिंदस् क्रिमसन स्टार’ या नावानेही संबोधले जाते. हा तारा सूर्यापेक्षा ५०० पट तेजस्वी आहे. मात्र, याचा पृष्ठभाग सूर्यापेक्षा कमी तापमानाचा असल्याने नारंगी-तांबडा रंगाचा दिसतो. आपल्यापासून हा १००० प्रकाशवर्षे इतका दूर आहे.
मित्रांनो, या लेखासोबत सूर्यमालेतील सर्वात मोठय़ा ग्रहाचा व दक्षिणेकडील दोन नक्षत्रांचा अभ्यास केला आहे. आकाशाच्या नकाशाचा स्थूलमानाने अभ्यास करून या महिन्यात द्दगोच्चर होणारे तारे, नक्षत्र यांचा अभ्यास आपण करणार आहोत. मित्रांनो, आकाश निरभ्र आहे. आपल्याजवळ नभांगणाचा नकाशा आहे. मग सुरू करा आकाश निरीक्षण!

No comments:

Post a Comment