कोळी - Gnaphosid
कोळ्यांना न्याफोसिड (Gnaphosid) म्हणतात. उन्हाळ्यात जंगलांमध्ये,
शेतांमध्ये पालापाचोळा पडलेला असतो. जून महिन्यात पहिला पाऊस पडल्यानंतर
ह्या पालापाचोळ्यावर बरेच कीटक आक्रमण करतात. पालापाचोळा कुरतडतात व नंतर
तो पाण्यामुळे कुजतो. या प्रक्रियेत कीटकांची संख्या खूप वाढलेली असते.
त्यांना नियंत्नणात ठेवण्यासाठी हे न्याफोसिड कोळी त्यांना खातात. ह्या
कोळ्यांची विष्ठा मग जमिनीत मिसळते. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो. जमीन
सुपीक होते. गवत आणि लहान झुडपे जोमाने वाढायला लागतात. असे हे जमिनीवर
राहणारे कोळी आजारी पडलेली जमीन सुपीक करतात, हे एक महत्त्वाचे योगदान आहे.
हे
कोळी साधारणत: काळ्या रंगाचे, खूप लहान असतात. त्याच्या आठ डोळ्यांपैकी
मागचे मधले दोन डोळे पांढरे आणि तिरपे असतात. त्यांचे रेशीम काढणारे अवयव
सिलेण्ड्रिकल असतात.
ह्या महत्त्वाच्या कोळ्यांना वाचवायचे असेल तर
जमिनीवर पडलेला पालापाचोळा न जाळता त्याला तसाच कुजू द्यावा, जेणेकरून हे
कोळी त्यांच्यावर प्रक्रि या करून आपली आजारी असलेली जमीन पुन्हा सुपीक
करतील.
No comments:
Post a Comment