विजया दशमी आणि आपटाची पानं
भारतीय संस्कतीचे वैशिष्ट्य आहे, की त्यात पक्षी प्राणी यांच्याबरोबरच
नदीनाले, डोंगरदर्या व वृक्षवनस्पती यांनाही महत्त्वाचे स्थान आहे.
त्यांच्याशी संबधित कथांमधून बोधामृतच दिले गेले आहे. आपट्याचा वृक्षही
याला अपवाद नाही. पट्याच्या शेंगा जशा खाण्याजोग्या, तशाच रक्तकांचनाच्या
शेंगाही. उत्तर भारतात याच्या ओल्या बिया आमटीत आणि दह्यातही घालतात.
त्यामुळे दोन्ही पदार्थांची लज्जत वाढते, असं खुशवंत सिंगांनी आपल्या एका
लेखात म्हटलं आहे.
विजया दशमीला सोनं लुटण्याच्या परंपरेला पार्श्वभूमी
आहे ती अशी, वरतंतू नावाच्या मुनींचा कौत्स नावाचा शिष्य होता. गुरूगृही
राहून त्यानं विद्याभ्यास पूर्ण केला आणि गुरूजींना दक्षिणे विषयी विचारलं.
शिष्यावर गुरूजी खूष होते. त्यांनी 'दक्षिणा नको' असं कौत्साला सांगितलं.
कौत्साने वारंवार विनंती केल्यावर वरतंतू मुनींनी चौदा कोटी सुवर्णमुद्रा
दक्षिणा सांगितली. कौत्स सुवर्णमुद्रा मागण्यासाठी रघुराजाकडे गेला. रघुनं
नुकताच एक मोठा यज्ञ करून आपली सर्व संपत्ती दान केली होती. कौत्साला
भेटण्यासाठी तो आला तो मृत्तिकापात्रे घेऊन कौत्साची पूजा करण्यासाठी.
कौत्साला
आता प्रश्न पडला की रघुराजा चौदा कोटी सुवर्णमुद्रा कशा देणार? पण राजाने
पुन: पुन्हा विनंती केल्यावर कौत्साने त्याच्याकडे सुवर्णमुद्रा मागण्याचं
धाडसं केलं. राजानं त्याला दुसर्या दिवशी येण्याचं सांगितलं. कौत्स
गेल्यावर रघुराजानं सेनापतीला बोलावून कुबेर म्हणजे संपत्तीचा स्वामी
त्यावर चढाई करण्याची आज्ञा केली. ही चढाई दुसर्या दिवशी करायची होती. हे
वृत्त ऐकताच कुबेर घाबरला. त्यानं रघुराजाच्या कोषावर रात्रीच सोन्याच्या
मोहरांचा पाऊस पडला,
दुसर्या दिवशी कौत्स आला. राजानं त्याला
कुबेराकडून आलेल्या सर्व मुद्रा दान केल्या. त्या चौदाकोटी पेक्षा जास्त
होत्या. कौत्स म्हणाला, मला चौदा कोटीपेक्षा अधिक मुद्रा नकोत. तुम्ही
जास्तीच्या मुद्रा परत घ्या. रघुराजा म्हणाला, एकदा दिलेलं दान मी परत घेत
नाही.
अखेर जास्तीच्या मुद्रा एका वृक्षाखाली ठेवल्या आणि प्रजाजनांनी
त्या लुटल्या. ज्या दिवशी हे घडलं तो दिवस होता विजया दशमी आणि वृक्ष होता
आपटा.
आताच्या काळात आपट्याखाली सुवर्णमुद्रा कोण ठेवणार? मग लोकं
आपट्याचं पानंच घेतात आणि एकमेकांना देतात प्राचीन भारतात सोन्याच्या धूर
निघत असे, अशी वदंता होती. साहित्यसम्राट न. चिं. केळकरांचे यांचे या
सोन्याच्या धुरांवर सुरेख विनोदी भाष्य आहे.
आपट्याची पानं विड्या
वळण्यासाठी वापरतात. आदल्या दिवशी म्हणजे दुसर्याला वाटलेली सोन्याची पानं
दुसर्या दिवशी विड्या वळण्यासाठी वापरायची, म्हणजे झाला सोन्याचा धूर !
No comments:
Post a Comment