ब्रिटनमध्ये धावणार ‘ड्रायव्हरलेस’ कार | Driver-less Cars In Britain
ब्रिटनमध्ये 'ड्रायव्हरलेस' कारच्या प्रकल्पावर काम सुरू असून २०१५च्या सुरुवातीला विजेवर चालणाऱ्या अशा शंभर गाड्या रस्त्यांवर धावणार आहेत. पहिल्या टप्प्यात बकिंगहॅमशायरमधील मिल्टन किनेस भागातील पदपथांवर हा प्रयोग होणार आहे.'ड्रायव्हरलेस' कारमध्ये दोन प्रवासी, तसेच त्यांच्याकडील लगेजसह बसता येईल. स्वतंत्र मार्गिकेवरून १९ किलोमीटर प्रतितास या वेगाने या गाड्या धावणार आहेत. या प्रकल्पाचा खर्च ६ कोटी ५० लाख पौंड असून त्यासाठी पाच वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. कारमधील 'सेन्सर'मुळे मार्गात आलेले अडथळे समजणार आहेत. 'जीपीएस', तसेच ३६० डिग्री सेन्सर्स या गाड्यांना दिशादर्शन करतील.
'स्मार्टफोन अॅप'च्या माध्यामातून प्रवाशांना या कारच्या तिकिटांची नोंदणी करता येईल. २०१७मध्ये या कारच्या चाचण्या पूर्ण होतील. मिल्टन किनेसचे रेल्वे स्टेशन, शॉपिंग सेंटरपर्यंत जाण्यासाठी या कार उपलब्ध असतील. ब्रिटन सरकार आणि वाहन उद्योगातील प्रतिनिधींचा समावेश असलेली 'ऑटोमोटिव्ह कौन्सिल', 'अरूप' ही इंजिनीअरिंग फर्म या प्रकल्पावर केंब्रिज विद्यापीठासोबत काम करत आहे.
No comments:
Post a Comment