Blogroll

सुई न टोचता इंजेक्शन Injection

सुई न टोचता इंजेक्शन Injection 

खाद्या सिरींजसारखीच याची रचना असते, मात्र नेहमीच्या दट्ट्याऐवजी धातूच्या तारेने गुंडाळलेले एक शक्तिमान लोहचुंबक असते. याला लॉरेंट्झ फोर्स अँुएटर म्हणतात. या दट्ट्याच्या पुढे द्रव स्वरूपातल्या औषधाने भरलेली एक कॅप्सूल असते आणि दर्शनी भागात एखाद्या डासाच्या सोंडेइतकी सूक्ष्म आकाराची एक नलिका असते. या नव्या तंत्रज्ञानामुळे अनेक फायदे होतील

रुग्णांच्या मनातील इंजेक्शनची भीती दूर होईल.
हे इंजेक्शन टोचायचे नसल्याने इंजेक्शनद्वारे पसरणारे एड्स, हेपॅटायटिस बी अशांसारखे आजार उद्भवणार नाहीत.
इंजेक्शन देताना परिचारिका किंवा डॉक्टरांना सुई लागून होणारे आजार टळतील.
इंजेक्शनची सिरींज जंतुविरहित करण्याची गरज उरणार नाही.
द्रव स्वरूपातील पोलिओ, बीसीजी, कावीळ अशांसारख्या प्रतिबंधक लसींसाठी त्यांना रेफ्रिजरेटरमध्ये सतत ठेवून 'शीतसाखळी' सांभाळावी लागते. अन्यथा त्या लसी कुचकामी ठरतात. पावडर स्वरूपात असलेली लस रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्याची गरज नसल्याने हा धोका तर टळेलच. पण, शीतसाखळीसाठी येणारा मोठय़ा स्वरूपातला खर्चही वाचेल. जेक्शन घ्यायला सर्व जण का घाबरतात? कारण, इंजेक्शनची ती धारदार सुई त्वचेत टोचताना आणि मांसात घुसताना खूप दुखते. नंतर खूप दिवस त्या वेदना होत राहतात. पण, या भीतीवर आता तोडगा निघालाय...कसलीही सुई न वापरता दिले जाणारे इंजेक्शन!
अमेरिकेतल्या मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एम.आय.टी.) या विख्यात तंत्र विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी 'मॅग्नेटिक जेट इंजेक्शन डिव्हाईस' नावाचे एक छोटे सिरींजवजा उपकरण तयार केले आहे. यामध्ये लोखंडी सुई तुमच्या शरीरात टोचण्याऐवजी जे औषध टोचायचे आहे, त्याचा एक गतिमान फवारा ध्वनीच्या वेगाने तुम्हाला वेदना न करता तुमच्या त्वचेत घुसतो. 
विजेवर चालणार्‍या या उपकरणातून जेव्हा विजेचा प्रवाह सोडला जातो, तेव्हा या विजेच्या प्रवाहामुळे चुंबकीय क्षेत्र एक प्रचंड ऊर्जा निर्माण करते. या ऊर्जेद्वारे उपकरणातील दट्टय़ा वेगाने पुढे सरकतो आणि कॅप्सूलवर आदळतो. त्यानंतर त्या कॅप्सूलमधील औषध ध्वनीच्या वेगाने म्हणजे सेकंदाला ३४0.२९ मीटरने, या उपकरणाच्या दर्शनी भागी असलेल्या नलिकेतून बाहेर पडते. औषधाचा हा वेग विद्युतप्रवाहाद्वारे कमी-जास्त करता येतो. 
एम.आय.टी.चे शास्त्रज्ञ इयान हंटर आणि कॅथेराईन होगन यांनी हे उपकरण विकसित केले आहे. या उपकरणात खूप वेगाने आणि थोड्या कमी वेगाने औषधाचा फवारा बाहेर पडण्याची सोय आहे. कमरेच्या किंवा दंडाच्या स्नायूमध्ये इंजेक्शन देताना वेगवान फवारा वापरला जातो. पण, जर इन्सुलिनसारखे एखादे इंजेक्शन त्वचेखाली द्यायचे असेल, तर जरा सौम्य गतीचा फवारा वापरता येतो.
वेगवेगळ्या वयाच्या आणि त्वचेच्या वेगवेगळ्या जाडीप्रमाणे वेग कमी-जास्त करता येतो. म्हणजे एखाद्या छोट्या बाळाला एखादी लस किंवा इंजेक्शन देताना खूपच कमी गती लागेल, तर एखाद्या जाड कातडीच्या मजुराला जास्त वेग वापरावा लागेल. त्याचप्रमाणे एखाद्याच्या स्नायूमध्ये ते इंजेक्शन किती खोलवर द्यायचेय, हेदेखील नियंत्रित करता येते.
या तंत्रज्ञानात यापुढे अजून सुधारणा करून पावडर स्वरूपात असलेली इंजेक्शन्स आणि लसी देता येतील, अशी सोय करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment