Blogroll

इंटरनेट रेडिओ Internet Radion India

इंटरनेट रेडिओ Internet Radio India



रेडिओवरच्या कार्यक्रमात आपण आपल्या सेलफोनवरून भाग घेऊ शकतो वा आपले मत तत्काळ नोंदवू शकतो. पूर्वी रेडिओ असलेले घर श्रीमंतच समजले जायचे. काही मोजक्याच घरात रेडिओ असायचा. आता तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे आपण आपल्या मोबाईलमधूनही रेडिओ ऐकू शकतो. इतकेच नव्हे, तर त्यांच्या कार्यक्रमात फोनवरून सहभागीही होऊ शकतो. इंटरनेट रेडिओने हे सर्व शक्य केले आहे. गीताच्या विश्‍वामध्ये रेडिओचे महत्त्व किती आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आजचे आणि कालचेही अनेक दिग्गज कलाकार – ते नामवंत नसण्याच्या त्यांच्या काळामध्ये - जगापुढे आले, ते फक्त याच माध्यमातून! आजच्या अतिप्रगत, तंत्नशुद्ध, बहुविध आणि बहुगुणी इलेक्ट्रॉनिक साधनांपुढेही रेडिओ टिकून आहे! 
अर्थात, काळाप्रमाणे आणि वापरकर्त्यांच्या गरजेनुसार रेडिओनेही नवे रूप धारण केले आहे. इंटरनेटच्या माध्यमातून तो संगणक आणि सेलफोनवरही वाजू लागला आहे. इंटरनेट रेडिओला वेब रेडिओ, नेट रेडिओ, स्ट्रीमिंग रेडिओ किंवा ई-रेडिओ वेबकास्ट अशी बरीच नावे असली, तरी त्यामागचे मूळ तंत्न एकच असते. 
इंटरनेटवरील संगीताला वेबकास्ट म्हणतात. कारण, पारंपरिक अर्थाने ते बिनतारी प्रक्षेपण म्हणजे 'ब्रॉडकास्ट' वा 'टेलिकास्ट' नसते. अर्थात, इंटरनेट रेडिओचे कार्यक्रम 'स्ट्रीमिंग मीडिया' पद्धतीने प्रसारित होत असल्याने रिप्ले वगैरे करता येत नाहीत. बर्‍याचशा इंटरनेट रेडिओ सेवा पारंपरिक रेडिओ केंद्रांशी निगडित असतात. याचे वैशिष्ट्य म्हणजे जगातील कोणतेही स्टेशन कोठेही बसून ऐकता येते. 
इंटरनेटमार्फत TCP किंवा UDP 'पॅकेज' पद्धतीने श्राव्य आशय सतत प्रसारित केला जातो (स्ट्रीमिंग प्रवाही ऑडिओ) व ही माहिती वापरकर्त्याने स्टेशन निवडल्यावर त्याला पुन्हा ऐकवली जाते. या प्रक्रियेत लहरींची उचलफेक करण्यात एखादा सेकंद जाऊ शकतो. या उशिरास 'रेडिओ लॅग' असे म्हणतात. २000 सालानंतरच्या बदलत्या तंत्नज्ञानामुळे बँड विड्थ्स परवडणार्‍या दरात मिळू लागल्याने अशा रेडिओच्या स्ट्रीमिंगचा दर्जा वाढला आहे.
साधारण ६४ केबी ते १२८ केबी प्रतिसेकंद वेगाने हे स्ट्रीमिंग केले जाते आणि आवाजाचा दर्जा जवळजवळ ऑडिओ सीडीइतका असतो. online radio असा सर्वसाधारण सर्च दिल्यावरही अनेक वेब-पृष्ठे उघडतात. आता तर रेडिओवरच्या कार्यक्रमात आपण आपल्या सेलफोनवरून भाग घेऊ शकतो वा आपले मत तत्काळ नोंदवू शकतो. मोबाईल हँडसेटमध्ये एफएम रेडिओ असेल, तर हे आणखीनच सोपे होते.

No comments:

Post a Comment