Blogroll

होमी भाभा Homi Bhabha

होमी भाभा Homi Bhabha 

होमी भाभा Homi Bhabha



होमी भाभा Homi Bhabha  : - (१८0९ - १९६६) अणुशक्तीमुळे आपल्या देशाची उन्नती होत राहील, असं पंडित नेहरुंना वाटत होतं. डॉ. होमी भाभा हेच या प्रकल्पाची जबाबदारी घेऊ शकतील याची पंडितजींना खात्री होती. भाभांचं शिक्षण मुंबईला एल्फिन्स्टन कॉलेज आणि बंगलोरला इंडियन इंन्स्टीटयूट ऑफ सायन्स येथे झाले. त्यांना पॉल डि-याक, एन्रिको फर्मी, जेम्स श्याडविक, अर्नेस्ट रुदरफोर्ड, निल्स बोहर अशा दिग्गज शास्त्रज्ञांबरोबर संशोधन करण्याची संधी मिळाली. संयुक्त राष्ट्रसंघानं १९५५ मध्ये 'शांततेसाठी अणुशक्ती'वर एक (पहिलाच) परिसंवाद जिनिव्हा येथे आयोजित केला होता. त्याचे अध्यक्ष होमी भाभा होते. भारतातील पहिली अणुभट्टी १९५६ साली भाभांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झाली. त्यावेळी आशियात फक्त रशियाकडे अणुभट्टी होती. अणुविद्येत भाभा जगात आघाडीवर होते. सर्व दिशांकडून पृथ्वीवर अदृश्य वैश्‍विक किरणांचा वर्षाव होत असतो. त्यातील अनेक गूढगोष्टी त्यांनी उकलून दाखवल्या. त्यांनी मेसॉन या एका अतिसूक्ष्मकणाचे सखोल संशोधन केले. त्यांच्या प्रायोगिक पुराव्यामुळं अल्बर्ट आईन्स्टाइन यांच्या सापेक्षता सिद्धांताला बळकटी आली. मूलभूत विज्ञानाचं महत्व ओळखून त्यांनी मुंबईला 'टाटा इंस्टीटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च' या संस्थेची स्थापना करण्यात सक्रीय भाग घेतला. 
होमी भाभांमुळे कृषी, वैद्यक आणि अभियांत्रिकी क्षेत्रांना उपयुक्त असणारी किरणोत्सर्गी मूलद्रव्यं तयार होऊ लागली. अणुऊर्जा तयार करताना 'जड पाणी' लागते. त्यात भारत स्वयंपूर्ण झाला. पंडित नेहरुंचं स्वप्न साकारण्यात होमी भाभा यांना यश मिळत असताना एक दुर्घटना घडली. २४ जानेवारी १९६६ रोजी युरोपकडे भाभांना घेऊन जाणारे विमान आल्प्स पर्वतराजींमध्ये कोसळून त्यांचा अंत झाला. होमी भाभा हे उत्तम कवी, चित्रकार, पर्यावरणप्रेमी आणि व्हायोलिनवादक होते. निर्घृण काळानं घात केला नसता तर त्यांनी निश्‍चितच अणुविज्ञानशास्त्रात खूप मोलाची भर घातली असती.  

1 comment:

  1. birth date of homi bhabha mentioned wrong...actual birth date is 1909

    ReplyDelete