कासवांची कहानी Development of Tortoise
सागरी कासवं भरपूर पोहतात. ते साहजिकच आहे. ते दर वर्षी हजारो किलोमीटरचा प्रवास
करतात. साधारणपणे १0 कोटी वर्षांपूर्वी कासवांनी सागर प्रवासास सुरुवात
केली. त्या वेळी ही कासवं इतकं चांगलं पोहू शकत नसावीत, असे पुरावे काही
वर्षांपूर्वी हाती आले आहेत. ब्राझीलच्या जागी एकेकाळी जो सागर होता; त्या
सागरात ११ कोटी वर्षांपूर्वी वावरणार्या कासवाचे अवशेष काही जपानी पुराजीव
शास्त्रज्ञांना सापडले. ११ कोटी वर्षांपूर्वीचे हे अवशेष अभ्यासून या
शास्त्रज्ञांनी अनेक तर्क केले; त्यानुसार हे कासव २२ ते २५ सें.मी. लांब
असावं. या कासवाच्या हातापायातली हाडं सुटीसुटी होती. त्यामुळे वल्ही
म्हणून या हातापायांचा काही उपयोग नव्हता. जी कासवं दीर्घकाळ पाण्यात
राहतात, त्यांच्या हातापायातली हाडं एकमेकांत पक्की बसून ती एकसंध
हाडासारखी होतात. अशा हाडांचा वल्ही म्हणून उपयोग होतो. गोड्या पाण्यात
राहणार्या आणिवारंवार जमिनीवर येणार्या कासवांची हाडं अशी एकजीव नसतात.
कारण जमिनीवर चालताना ती सांध्यात वाकवावी लागतात, पणजेव्हा या कासवाची
कवटी तपासली तेव्हा हे कासव खार्या पाण्यात वावरणारं असावं, असं दिसून
आलं. त्याच्या डोळ्यातील अश्रूग्रंथी प्रचंडमोठय़ा होत्या. जमिनीवरचे प्राणी
सागरवासी बनतात तेव्हा त्यांना शरीरातील खारं पाणी बाहेर टाकण्यासाठी
अश्रूंचा उपयोग होतो. त्यांचे अश्रूबिंदू खूप मोठे असतात. त्यातून मोठय़ा
प्रमाणावर शरीरातील क्षार बाहेर टाकले जातात. त्यावरून हे कासव सागरात
वावरणारे होते. पण, त्या काळात त्यांनी नुकताच सागरात प्रवेश केला असावा,
असं त्यांच्या अवयवांवरून सिद्ध होतं.
No comments:
Post a Comment