Birbal Sahani प्रो. बिरबल साहनी : १८९१-१९४९- प्राचीन काळातील वनस्पती काळाच्या ओघात नष्ट होत गेल्या खर्या;
पण जाताना काही वनस्पतींनी आपला ठसा जणू शिलालेखात कोरावा तसा कोरला होता.
संशोधक त्याला 'जीवाश्म' म्हणतात. त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला तर
प्राचीन काळच्या जीवसृष्टीचा मागोवा घेता येतो. या संशोधनाकरिता बुद्धी,
चिकाटी आणि कौशल्याची गरज असते. या तिन्हीचा त्रिवेणी संगम लाभलेली महान
व्यक्ती म्हणजे प्रो. बिरबल साहनी! त्यांना लहानपणापासूनच वृक्ष-वेली,
झाडे-झुडपं याचं सखोल निरीक्षण करण्याचा छंद होता. शालेय जीवनात त्यांनी
पाने-फुले आणि चित्र-विचित्र दगडांचे नमुने जमवून त्यांचा एक आकर्षक संग्रह
तयार केला होता. त्यांचे वडील रुचीराम साहनी हे रसायनशास्त्राचे
प्राध्यापक होते. ते विज्ञान-प्रसारक आणि पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते
होते. त्यांनी बिरबल यांना सतत प्रोत्साहन दिलं. उत्कृष्ट संशोधनामुळं
त्यांना इंग्लंडमध्ये 'एफ आर एस' होण्याचा मान मिळाला. बिरबल साहनी हे
पंडित नेहरू यांचे स्नेहांकित होते. दोघांची जन्मतारीख १४ नोव्हेंबर होती!
पंडितजींनाही जीवाश्मांमध्ये विलक्षण आकर्षण वाटत असल्यामुळं त्यांनी या
विषयाचं एक जागतिक दर्जाचं संशोधन करणारी संस्था स्थापन करण्यासाठी डॉ.
बिरबल यांना उद्युक्त केलं. लखनौ येथे ही संस्था स्थापन व्हावी म्हणून अखंड
परिश्रम करून डॉ. साहनी यांनी एक आदर्श आराखडा तयार केला. या
प्रयोगशाळेच्या पायाभरणी समारंभाला ३ एप्रिल १९४९ रोजी पंतप्रधान नेहरू आले
होते. दुर्दैवानं एक आठवड्यानंतर (१0 एप्रिलला) अतिश्रमामुळं बिरबल साहनी
यांचं निधन झालं. त्यांच्याच इच्छेनुसार त्यांची पत्नी सावित्री साहनी
यांनी हिकमतीनं 'बिरबल साहनी इन्स्टिट्यूट ऑफ पालीओबॉटनी'ची उभारणी केली.
पंडितजी पुन्हा त्या संस्थेत (२-१-१९५३) उद््घाटनासाठी आले. आज ती संस्था
खरोखरीच जगन्मान्य झाली आहे.
No comments:
Post a Comment