विश्वेश्वरया Vishveshwarya Scientist
'सि व्हिल इंजिनियरिंग' हे एक मोठं शास्त्र आहे. 'बांधकामाशी संबंधित'
एवढीच या शास्त्राची र्मयादा नाही, त्या मध्ये अनेक छोट्या-मोठय़ा विषयांचा,
कला-कौशल्यांचा अंतर्भाव आहे. मूलभूतशास्त्रात स्वत:ला पूर्ण झोकून नवभारत
घडविण्यात ज्यांचा मोठा सहभाग होता, त्यात डॉ. मोक्षगुंडन विश्वेश्वरैया
यांचं नाव अग्रणी आहे. ते मूळचे कर्नाटकातील मदनहळ्ळी गावचे होते.
कौटुंबिक परिस्थिती बेताची असूनही ते पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमधून
१८८३ मध्ये सर्वप्रथम येऊन पदवीधर झाले. मुंबई प्रांताच्या पाटबंधारे
खात्यात मुख्य अभियंता म्हणून त्यांनी अभिनव कल्पनांचा उपयोग करून रचनात्मक
कार्य सुरूकेले. त्यांनी केलेले काम 'ब्लॉक सिस्टीम' आणि 'ऑटोमॅटिक गेट्स'
म्हणून आजही परिचित आहे, कारण त्यामुळे पाणी-साठवण करण्याची धरणांची
क्षमता वाढली. मुंबई, पुणे आणि नागपूर या शहरांचा पाणीपुरवठा त्यांनी
सुधारला. पुण्याच्या खडकवासला धरणाचे श्रेय त्यांच्याकडे जाते.
म्हैसूरचे
राजे कृष्णराज ओडेयार (१८९३-१९४0) यांच्या कारकिर्दीत ते दिवाण होते.
इंग्रज सरकारने त्यांना 'सर' हा किताब दिला होता. विश्वेश्वरैया यांनी
जेव्हा जोग धबधबा पाहिला तेव्हा ते निसर्गसौंदर्य पाहून स्तिमित झाले; पण
पाणी वाया जातंय हे पाहून व्यथितही झाले. त्यांनी शिवसमुद्रम, शिंशा,
गिरसप्पा, कृष्णराजसागरसाठी अनेक धरणांच्या योजना आखून कार्यवाही केली,
त्यामुळे घराघरांतून वीज खेळविली गेली व अनेक कारखाने सुरू झाले.
अनेक
प्रकल्पांसाठी पंडित नेहरू त्यांचा सल्ला घेत असत. समृध्द भारताचे स्वप्न
साकारण्याचे प्रयत्न करणार्या सर विश्वेश्वरैया यांना १९५५ मध्ये
'भारतरत्न'चा सन्मान प्राप्त झाला.
No comments:
Post a Comment