Blogroll

टपर वेअर लॅस्टिक

टपर वेअर लॅस्टिक


बाजारातून श्रीखंड, दही, गुलाबजामसह अनेक वस्तू प्लॅस्टिकच्या भांड्यातून आणतो. त्या वस्तू संपल्या की ही प्लॅस्टिकची भांडी अथवा डबे घरात वापरू लागतो. याचं कारण त्यांची झाकणं घट्ट बसतात हे आहेच, पण त्याचबरोबर हे डबे चांगले टिकाऊ, पण वजनाला हलके असतात. ते गंजत नाहीत. लोणच्याच्या खाराचा त्यांच्यावर परिणाम होत नाही. यामुळे अशा प्रकारच्या भांड्यांना महिलावर्गाची चांगलीच पसंती असते.
या प्रकारच्या प्लॅस्टिक भांड्यांचा शोध अर्ल सायलाय टपर याने लावला म्हणून यांना 'टपर वेअर' असं म्हणतात. हा टपर खरं तर व्यवसायानं झाडांचा डॉक्टर होता. झाडांवरची कीड नाहीशी करणे, एका ठिकाणचं झाड अडथळा होऊ लागले, तर ते मुळासकट काढून दुसरीकडे लावून जगवणे हा त्याचा व्यवसाय.
अमेरिकेतील आर्थिक मंदीच्या काळात त्यानं द्यू पाँट कंपनीत नोकरी धरली. त्या काळात काचेच्या, तसंच चिनी मातीच्या बरण्या आणि पत्र्याचे डबे पदार्थ साठविण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर वापरले जात. टपर कचर्‍यापासून प्लॅस्टिक बनवण्याच्या संशोधन प्रकल्पावर काम करीत होता. प्लॅस्टिकला हवा तसा आकार देता येतो. ते लवचिक असलं तरी टिकाऊ असतं. तसंच खाद्य पदार्थातील रसायनांचा त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही.
टपरच्या हे लक्षात येताच बराच पुढचा विचार करून त्यानं द्यू पाँटची नोकरी सोडली. मग त्यानं टपर प्लॅस्टिक कंपनीची स्थापना केली. सुरूवातीस त्यानं बुटाच्या टाचा बनवून विकल्या; पण युद्ध समाप्तीनंतर त्यानं घरगुती वापरासाठी प्लॅस्टिकचे डबे तयार करणे सुरू केले.
या डब्यांचं झाकण विशिष्ट प्रकारे दाबून बसवलं, की डब्यातील हवा बाहेर पडते, हे त्याच्या प्रतिनिधींनी दारोदार हिंडून सिद्ध केलं. त्यामुळे या डब्यांना मिळणारा प्रतिसाद वाढला. खाद्यपदार्थांसाठी अशी भांडी उपयोगी पडतात, हे समजल्यावर तर त्याच्या वापरात कितीतरी वाढ झाली व टपरचा कोट्यधीश बनवायचा मार्ग मोकळा झाला.

No comments:

Post a Comment