Blogroll

न्यूमॅटिक ब्रेक, pneumatic brake

न्यूमॅटिक ब्रेक, pneumatic brake how it works??

न्यूमॅटिक ब्रेक, pneumatic brake


एक आगगाडी रुळावरून घसरलेली पाहून अशा घसरलेल्या रेल्वेचे डबे उचलून परत रुळावर ठेवणारे यंत्र त्याने बनवले. त्याचे पेटंट घेतले आणि वडिलांच्या कारखान्याशेजारीच त्याने स्वत:चा कारखाना उभारला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. र्ज वेस्टिंग हाऊस (धाकटा) हा जॉर्ज वेस्टिंग हाऊस यांचा मुलगा. वडिलांच्या नावावर तब्बल ३00 शोधांची एकाधिकार पत्रे होती. धाकटा जॉर्ज वडिलांच्या कारखान्यातच वाढला आणि तिथेच लुडबुड करता-करता त्याने यांत्रिकीचे पहिले धडे घेतले. वयाच्या पंधराव्या वर्षी तो पळून अमेरिकी उत्तरी सैन्यात दाखल झाला. यादवी संपल्यावर वडिलांच्या आग्रहास्तव तो न्यूयॉर्क येथे महाविद्यालयात दाखल झाला. काही काळातच प्राचार्यांनी धाकट्या जॉर्जची हुशारी पाहून थोरल्या वेस्टिंग हाऊसना 'त्याला तुमच्या यंत्रशाळेत काम करू द्या' असा सल्ला दिला व तो लगेचच अमलात आणण्यास सांगितले.
दरम्यान, एक आगगाडी रुळावरून घसरलेली पाहून अशा घसरलेल्या रेल्वेचे डबे उचलून परत रुळावर ठेवणारे यंत्र त्याने बनवले. त्याचे पेटंट घेतले आणि वडिलांच्या कारखान्याशेजारीच त्याने स्वत:चा कारखाना उभारला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. काही वर्षांनंतर दोन आगगाड्यांची समोरासमोर झालेली टक्कर त्याला पाहायला मिळाली. त्या काळात प्रत्येक डब्यात आणि इंजिनात एक-एक 'ब्रेकमन' असे. त्यातल्या एकाने ब्रेक दाबला तरी बाकी ब्रेकमन्स बरोबर नेमके त्याच वेळी ब्रेक दाबू शकत नसत. त्यांच्यातील या विसंवादामुळे गाड्यांचे डबे रुळावरून घसरत असत.
त्या काळात स्वित्झर्लंडमध्ये खूप दाबाखालची हवा झोत स्वरूपात वापरून बोगदे खणल्याचे धाकट्या वेस्टिंग हाऊसच्या वाचनात आले. याच तत्त्वाचा वापर करून ड्रायव्हरनं एक खटका ओढताच सर्व डब्यातले ब्रेक या हवेच्या झोताने एकदमच कार्यरत करता येतील, असा विचार त्याच्या मनात डोकावला. त्यावर संशोधन करत त्याने आपला विचार प्रत्यक्षात उतरवला. यामुळे आता गाड्या हळू चालवायचं कारण उरलं नव्हतं. याचं कारण वेस्टिंग हाऊसची नवी हवा दाब प्रणाली चाकांची गती थांबवायला उपयुक्त ठरू लागली होती. पुढे या धाकट्या वेस्टिंग हाऊसने सुमारे ४00 शोधांचं पेटंट घेतले आणि बापसे बेटा सवाई हे सिद्ध केले. न्यूमॅटिक ब्रेक ही त्याने रेल्वेला दिलेली मोठीच देणगी आहे. काही काळानंतर आता ब्रेकच्या प्रणालीत सुधारणा होऊन त्यात अत्याधुनिकता आली, तरी जॉर्ज वेस्टिंग हाऊस (धाकटा) यांच्या शोधाचे महत्त्व अद्यापही कमी झालेले नाही.

No comments:

Post a Comment