Blogroll

एबल ३३ तेजोमेघ, Abell 33 nebula

 एबल ३३ तेजोमेघ, Abell 33 nebula 

 एबल ३३ तेजोमेघ, Abell 33 nebula
लग्नाचे दिवस आले म्हणजे अंगठय़ा आल्याच आणि आजची ही अंगठी खरोखरच आकाशातून आलेली आहे. हा तेजोमेघ आहे एबल ३३. हा तेजोमेघही ग्रहसदृश तेजोमेघांपैकी आहे. हा हायड्रा तारकासमूहातील अल्फराड तार्‍याच्या किंचित उत्तरेला आहे.
सूर्यासारख्या तार्‍यांचा अंत एका कृष्णबटू तार्‍यात होतो. त्यापूर्वी हे तारे प्रसरण पावू लागतात. त्यांचा आकार इतका वाढतो, की ते त्यांच्या ग्रहमालेतील ग्रहांच्या कक्षेपेक्षाही मोठे होतात. कालांतराने हे प्रसरण थांबतं आणि त्या तार्‍याचे बाह्यआवरण थंड होऊ लागतं. आता त्या तार्‍याचं आकुंचन होऊ लागतं. या आकुंचनाच्या वेळी थंड झालेला बाह्यभाग तसाच राहतो. त्या तार्‍याभोवती त्याचे एक प्रकारचे आच्छादन तयार झाल्यासारखे होते. असा हा खगोलीय पदार्थ आपल्याला ग्रहांसारखा दिसतो.
सहसा हे तेजोमेघ अगदी अचूक वतरुळाकार नसतात. तार्‍याच्या आकुंचनाच्या वेळी काही घडमोडी होत असतात; पण हा तेजोमेघ फारच सुंदर असा गोलाकार तेजोमेघ आहे. गंमत म्हणजे या तेजोमेघात आणि आपल्यात एक तारा असा आला आहे, की तो याच्या बाह्यआवरणाच्या जवळ आहे, त्यामुळे याला एक हिरा जडविलेल्या अंगठीचे रूप आले आहे. हा तेजोमेघ खुद्द आपल्यापासून २५00 प्रकाशवर्ष अंतरावर आहे, तर हा तारा आपल्यापासून सुमारे ७८0 प्रकाशवर्ष दूर आहे. एकूण काय तर 'हिरा कुठे तर अंगठी कुठे' अशी परिस्थिती आहे; पण तरीही हे एकूण दृश्य मात्र फारच सुंदर आहे. हे चित्र युरोपियन सदर्न ऑब्जरवेटरीचा व्हेरी लार्ज टेलिस्कोप वापरून घेतले आहे.

No comments:

Post a Comment