पायथागोरस पहिला गणिती
गणिताची आवड आणि जाण असणार्या या शास्त्रज्ञाचे इतर विचार मात्र खूपच काल्पनिक आणि मजेशीर असल्याचे दिसून येते. असे असले तरी पायथागोरस यांनी गणिताला दिलेले योगदान हे चिरकाल टिकणारे आहे.
स्त पूर्व काळामध्ये जे महान शास्त्रज्ञ होऊन गेले, त्यामध्ये पायथागोरस यांचे महत्त्वाचे स्थान आहे. पायथागोरस यांचे जीवन आणि कार्य हे अनेक अद्भुत, त्याचप्रमाणे विज्ञानविषयक घटनांनी भरलेले आहे. पायथागोरस हे शास्त्रज्ञ त्यांच्या त्रिकोणाविषयीच्या सिद्धांतामुळे सर्वांना परिचित आहेत. 'कर्ण वर्ग +पाया वर्ग = उंची 'वर्ग' हे सूत्र विद्यार्थ्यांना तोंडपाठ असते. हा सिद्धांत इसवी सन पूर्व ५00 वर्षांपूर्वी मांडला गेला. त्यामुळेच पायथागोरस यांना पहिला गणिती म्हणून संबोधले जाते. या सूत्राबरोबरच त्यांनी त्रिकोणाच्या तीन कोनांची बेरीज दोन काटकोनाएवढी असते, त्याचप्रमाणे बहुभूज आकृतीच्या आंतरकोनाची बेरीज ही दोन-चार काटकोन एवढी असते, असे प्रतिपादन केले.
पायथागोरस यांचा राजकीय घटनांमध्ये सहभाग होता. त्यासाठी त्यांना इजिप्तला जावे लागले. मात्र, संशोधन आणि अभ्यास करण्याची त्यांची इच्छा थोडीही कमी झाली नाही. त्या काळी अभ्यासकेंद्रे ही बहुधा मंदिरांमध्ये असत. मात्र, पायथागोरस यांना प्रयत्न करूनही मंदिरामध्ये प्रवेश मिळाला नाही. याचे कारण मंदिरामध्ये प्रवेश देण्यासाठी विशिष्ट अटींचे पालन करावे लागे. खूप प्रयत्नानंतर त्यांना डायस कॉलीस येथील मंदिरामध्ये प्रवेश मिळाला. मात्र, त्यासाठी मंदिराच्या सर्व अटी मान्य करून घ्याव्या लागल्या. आपल्या अस्तित्वाचे मूळ हे गणितावर आधारित आहे, अशी त्यांची ठाम धारणा होती. त्यांचा कल हा आध्यात्मिक बाबींकडे असल्यामुळे आत्म्याचे उत्थान करून दैवी शक्तींचे मीलन घडवून आणता येईल, अशी त्यांची धारणा होती.
पायथागोरस यांच्या निरनिराळ्या अंकांबाबत काही कल्पना होत्या. '१' अंक हा कार्यकारण भावाशी निगडित आहे, असे त्यांचे मत होते. '२' ही सम संख्या असून, हा स्त्रीत्वाशी संबंधित अंक आहे, अशी त्यांची धारणा होती. मत प्रदर्शनाशीही या अंकाचा संबंध त्यांनी लावला. '३' आकड्याचा संबंध पुरुषत्वाशी असून, तो साधम्र्यता दर्शवितो, असे त्यांचे मत होते. '४' अंक न्याय दर्शवितो. '५' अंकाचा विवाहाशी संबंध आहे.
'६' अंक निर्मितीशी संबंधित आहे, असे त्यांचे मत होते. त्याचप्रमाणे '१, ३, ६, १0 आणि १५' हे अंक त्रिकोणाशी संबंधित आहेत, तर १, ४, ९, १६ आणि २५ या अंकाचा संबंध चौरसाशी आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले.
No comments:
Post a Comment