ISON Comet आयसॉन धूमकेतू
या धूमकेतूबद्दलची दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे हा सूर्याच्या इतक्या जवळून जाणार होता (आता तो गेला आहे), की त्याचे सूर्याच्या गुरुत्वीय बलाच्या लाटांमुळे आणि ऊर्जेमुळे तुकडे होतील का, ही शंका वर्तवण्यात आली होती. आजचे हे चित्र 'सोहो' या अवकाशातील वेधशाळेने घेतले आहे. ही वेधशाळा नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सी यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यरत आहे. ही वेधशाळा सूर्याच्या वरच्या वातावरणाच्या अभ्यासासाठी पाठविण्यात आली आहे. यात सूयार्चा भाग एका काळ्या चकतीने झाकला आहे, जेणेकरून सूर्याच्या प्रखर तीव्रतेचा या कॅमेर्याला धोका पोहोचणार नाही.
या चित्रात डावीकडचा भाग आयसॉन स्रू्याच्या दिशेने जात असतानाचा आहे. यात आपण धूमकेतूची लांब शेपटी बघतो, तर चित्राच्या उजव्या भागात तो सूर्याच्या खूप जवळून गेल्यानंतर त्यावर झालेले परिणाम दिसून येत आहेत. धूमकेतूची तीव्रता मंद झाली आहे. काही शास्त्रज्ञांनी या चित्रांवरून धूमकेतू कदाचित नष्ट झाला असावा असे सांगितले, तर काहींचा कयास आहे, की सूर्याजवळून गेल्यानंतरही धूमकेतूचा गाभा अजून टिकून आहे. या चित्राच्या दोन्ही भागांची तुलना करून बघा. आपल्याला सूर्याभोवतीचे बदलते वातवरणही चांगल्या प्रकारे दिसत आहे. तसेच, या चित्रात काही तारेही आहेत.
No comments:
Post a Comment