Blogroll

चहाच्या पेल्यातील वादळ

 चहाच्या पेल्यातील वादळ

चहाच्या पेल्यातील वादळ' या साध्या वाक्प्रचारावरून शास्त्रज्ञांनी संशोधन सुरू केलं व त्यातून निष्कर्ष काढले. विज्ञानात कोणतीही गोष्ट कधीही वाया जात नाही, असं म्हणतात ते खरंच आहे. ल्लक गोष्टीसाठी विनाकारण झालेला वाद म्हणजे 'चहाच्या पेल्यातील वादळ' असं आपण म्हणतो. काही वैज्ञानिकांनी खरोखरच बंद किटलीत चहा उकळत असताना काय घडतं, याचा अभ्यास करायचं ठरवलं. यासाठी त्यांनी 'टेंपेस्ट' (म्हणजे वादळ) नावाचा संगणकी कार्यक्रम वापरून चहाच्या किटलीत काय घडतं, ते बघायचा घाट घातला. त्यांना या प्रयोगासाठी बृहद्संगणकाची मदत घ्यावी लागली. किटलीत थंड पाणी ओतून ती तापविली की त्या पाण्यात प्रवाह सुरू होतात. बाष्प साठतं, त्याचा दाब वाढतो. इतरही काही घटक कार्यक्षम होतात, असे या प्रयोगात शास्त्रज्ञांना आढळलं. 
हा अभ्यास करणार्‍या शास्त्रज्ञांच्या मते या अभ्यासामुळे एखाद्या बंद प्रणालीमध्ये ट्रायू (फ्लूईड्स) कसे वागतात, हे सांगणं शक्य होणार आहे. आपलं शरीर अशीच एक ट्रायूयुक्त बंद प्रणाली आहे, त्यामुळे वैद्यकीय अभ्यासात या वादळी कार्यक्रमाची मदत होईल. विशेषत: शरीरांतर्गत अवयवांच्या कार्यप्रणालीचे बारकावे या प्रकारे अभ्यासता येतील आणि त्यामुळे काही नव्या उपाययोजनाही अमलात आणता येतील. भूशास्त्रज्ञांना भूजल आणि खनिज तेलाचे भूपृष्ठांतर्गत प्रवाह कसे वाहतात, याची माहिती यामुळे मिळू शकेल. त्याचबरोबर मान्सूनबाबतचे अंदाजही यातून काढता येणे शक्य होणार आहे.

No comments:

Post a Comment