Blogroll

व्होल्टा Volta Scientist

व्होल्टा Volta Scientist 

व्होल्टा Volta Scientist


कृत्रिमरीत्या वीजनिर्मितीमध्ये अनेक महान संशोधकांनी अपूर्व योगदान दिल्यामुळे हे शक्य झाले आहे. या संशोधकांमध्ये व्होल्टा यांचे संशोधन खूपच महत्त्वपूर्ण आहे. खरेतर व्होल्टा यांनी आपले संशोधन मिथेन या वायूच्या शोधापासून सुरू केले. त्यांनी मिथेन हा वायू अलग करून त्याच्या गुणधर्माचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांना विजेविषयी संशोधन करण्यात रस वाटू लागला. सुरुवातीचे त्यांचे संशोधन हे प्रसिद्ध संशोधक ल्युॅगी गॅव्हानी यांच्याबरोबर झाले. मात्र, सजीवांमध्ये असणार्‍या विजेच्या अनुमानाविषयी गॅव्हानी यांनी केलेले प्रतिपादन त्यांना तितकेसे रुचले नाही. त्यामुळे त्यांनी स्वतंत्रपणे विद्युतघटाविषयी संशोधन करण्याचा निश्‍चय केला. रासायनिक द्रव्य वापरून वीजनिर्मिती कशी करता येईल, याविषयीचे संशोधन त्यांनी सुरू केले. सुरुवातीला त्यांनी त्यासाठी मिठाचे पाणी कपामध्ये घेऊन त्यामध्ये निरनिराळय़ा धातूंच्या सळया ठेवून त्याविषयी अभ्यास केला. 
हा प्रयोग खूपच प्राथमिक अवस्थेत होता. मात्र त्यांनी या अतिशय साध्या अशा उपकरणांच्या साहाय्याने वीजदाब आणि त्याचा विद्युतप्रवाहाशी असणारा संबंध प्रस्थापित केला. त्यामुळे विद्युतघटाच्या संशोधनाचे श्रेय यांना मिळते. पर्शियन लोकांनी दोन हजार वर्षांपूर्वी अशा विद्युतघटाचा वापर केला होता, असे आढळून आले.
विद्युतघटाच्या निर्मितीमुळे कमी प्रमाणात होणार्‍या विजेच्या वापरासाठी एक चांगले साधन उपलब्ध झाले. त्यात साधनांमध्ये दिवसेंदिवस प्रगती होत गेली. आता रासायनिक द्रव्याच्या ऐवजी घनपदार्थांचा वापर करून विद्युतघट निर्माण करता येतात. मनगटी घड्याळ, मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये आता घन विद्युतघटाचा वापर आहे. व्होल्टा यांनी प्रथमच कॅपॅसिटरची रचना तयार केली. या रचनेचा वापर करून त्यांनी विद्युतदाब व विद्युतभार यांचा संबंध प्रस्थापित केला. मूलभूत विज्ञानामध्ये दिलेले हे त्यांचे मौलिक योगदान आहे. धातूच्या तारांचा वापर करून कोमो ते मिलान या ५0 कि. मी. अंतरावर असणार्‍या शहरामध्ये त्यांनी संबंध प्रस्थापित केला. त्यांनी एका शहरातून एक कळ दाबून विद्युतप्रवाहाच्या साहाय्याने दुसर्‍या शहरातील पिस्तूल उडवून दाखविले. त्यांच्या या प्रयोगाला खूपच महत्त्व आहे. कारण या प्रयोगामुळे पुढे टेलिग्राफची कल्पना प्रत्यक्षात निर्माण झाली. या कार्याबद्दल त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. नेपालियन बोनापार्ट यांनी त्यांना काउंट ही पदवी दिली. इटालियन सरकारने त्यांच्या 'लिरे' या चलनी नोटांवर त्यांचे छायाचित्र छापले. त्यांच्या या महत्त्वपूर्ण योगदानामुळे विद्युतदाबाच्या परिमाणाला 'व्होल्ट' असे नाव देण्यात आले. 

No comments:

Post a Comment