व्हॅसलीन vaseline पेट्रोलियम जेली
पेट्रोलियम जेली, पांढरे पेट्रोलियम किंवा सॉफ्ट पॅराफिन असेही म्हटले जाते. पूर्वी व्हॅसलीनचा उपयोग त्वचाविकारांसाठी केला जात असे.
व्हॅसलीन हे तेलविहिरीतून सापडणार्या कच्च्या तेलाचे शुद्ध स्वरूप आहे.
१८५९ मध्ये अमेरिकेतील पेन्सीलव्हिया राज्यातील टिटूसव्हिले या ठिकाणी
तेलविहीर खणताना अनपेक्षित असा काळपट रंगाचा घट्टसर द्रव बाहेर आला. कामात
अडथळा आणणारा तो द्रव कामगारांना आवडेनासा झाला होता; परंतु कामगारांच्या
जखमांवर तो द्राव लावल्यावर जखमा भरून आल्या, तसेच वेदनाही कमी झाल्या.
तेलावर संशोधन करणारे तरुण शास्त्रज्ञ रॉबर्ट चेसब्रफ यांनी कच्चे तेल
शुद्ध करण्यावर लक्ष केंद्रित केले होते. टिटूसव्हिले येथे सापडलेल्या या
नवीन तेलात नक्की काय आहे, हे जाणून घेण्यासाठी रॉबर्ट चेसब्रफ तेथे गेले व
त्यांनी विहिरीत सापडलेला काळसर द्रव पदार्थशुद्ध करण्यासाठी प्रयोगशाळेत
आणला.
निर्वात ऊध्र्वपातन प्रक्रियेने काळपट द्रवाचे शुद्ध स्वरूपातील
पांढर्या घट्ट जेलीत (तैलीय पदार्थ) रूपांतरित झाले. ती जेली त्यांनी
हाडाच्या चुर्यातून गाळून घेतली. १८७0 मध्ये रॉबर्ट चेसब्रफ यांनी या
जेलीचे पेटंट घेतले व जेलीच्या विक्रीसाठी न्यूयॉर्क शहरात जाहिरातीद्वारे
प्रचारही केला; पण जेलीची फारशी विक्री झाली नाही.
रॉबर्ट यांनी मग
स्वत:च्या हाताची त्वचा अँसिडने जाळली. ही जळलेली-भाजलेली त्वचा रॉबर्ट
यांनी व्हॅसलीनने बरी केली. अशा प्रकारे रॉबर्ट यांनी लोकांना व्हॅसलीनकडे
वळवले. त्यानंतर १८७२ मध्ये त्यांनी ब्रुकलीन येथे व्हॅसलीनचा पहिला
कारखाना सुरू करून मोठय़ा प्रमाणात व्हॅसलीनचे उत्पादन सुरू केले.
विविध
सौंदर्यप्रसाधनात, मलमांमध्ये मोठय़ा प्रमाणात वापरले जाणारे व्हॅसलीन हे
हायड्रोकार्बनचे मिश्रण असून, त्याचा वितलन बिंदू हा मानवाच्या शरीर
तापमानाएवढाच म्हणजे ३७ अंश से. इतका आहे. थोड्याशा उष्णतेतूनही या जेलीचे
ज्वलन होऊन तिचे वाफेत रूपांतर होते.
शुद्ध स्वरूपातील जेली ही रंगहीन व
गंधहीन असते. हवेच्या किंवा कोणत्याही रसायनाच्या संपर्कात आल्यावर जेलीत
कोणतीही प्रक्रिया घडून येत नाही. व्हॅसलीन पाण्यात विरघळत नसले, तरी
डायक्लोरो मिथेन, क्लोरोफॉर्म, बेन्झीन, डायइथाईल, इथर, कार्बन डाय सल्फाइड
आणि ऑईल ऑफ टर्पेन्टाइनमध्ये मात्र ते विरघळते.
व्हॅसलीन आणि ग्लिसरीन
हे दर्शनी सारखे दिसत असले आणि दोन्हींचे कार्य त्वचेचा ओलावा टिकवणे हे
असले, तरी त्यांचे मूलभूत गुणधर्म परस्परविरोधी आहेत. व्हॅसलीन हे
हायड्रोकार्बन हायड्रोफोबिक असून, ते पाण्यात विरघळत नसून ते ध्रुवीयही
नाही.
याउलट ग्लिसरीन मात्र हायड्रोकार्बन नसून, अल्कोहल आहे. तसेच, ते
हायड्रोफिलिक म्हणजेच पाण्याला आकर्षित करणारे आहे. व्हॅसलीन हे
पृष्ठभागाला घट्ट चिकटणारे असल्याने अजैविक पदार्थांपासून ते वेगळे करता
येत नसले, तरी ते पेन्ट थीनर किंवा अँसिटोनमध्ये विरघळते.
No comments:
Post a Comment