जवानांची युद्धसखी
लघुशस्त्राचा सर्वांत जास्त उपयोगात असणारा प्रकार म्हणजे रायफल. सर्वसाधारणपणे ४00 मीटर पल्ला असणारे हे शस्त्र म्हणजे जवानांची युद्धस्थळावरची सोबतीणच आहे. कारण, जवळपास प्रत्येक जवानाजवळ रायफल असतेच. यफलमधून झाडलेली गोळी ४00 मीटरवरील माणसाचा अचूक वेध घेते. लांबचा पल्ला व अचूकता मिळवण्यासाठी रायफलचे बॅरल म्हणजेच नळी लांब असते. रायफलच्या कॅलिबरच्या १00 ते १२५ पट लांबीचे बॅरल हे सामान्यत: वापरतात. बॅरल हे विशिष्ट पोलादाच्या मिश्र धातूपासून बनवतात. त्याला बॅरल स्टील म्हणतात. हा धातू अर्थातच पोलादामध्ये वेगवेगळे घटक धातू मिसळून तयार केला जातो. गंजविरोधी बनविण्यासाठी क्रोमियम व निकेल, चिवट बनविण्यासाठी कार्बन, अशा काही धातूंचा त्यात समावेश आहे. अशा गुणांनी युक्त असणार्या पोलादापासून बॅरल बनविणे एक कठीण काम आहे. त्यासाठी तसे तंत्रज्ञान व त्यासाठी आवश्यक असणारी यंत्रसामग्री आवश्यक असते.
फायरिंगनंतर बॅरलमध्ये अतिशय उच्च दाबाचे प्रोपेलंट गॅस तयार होतात. त्याचे तापमानही जास्त असते. प्रोपलंटमध्ये साठविलेली रासायनिक ऊर्जा गोळीस वेगाने प्रक्षेपित करण्यासाठी उपयोगात आणतात. हवेतून प्रवास करताना स्थिर ं१्रं'>(र३ुं'ी)/ं१्रं'> राहण्यासाठी ही गोळी स्वत:च्या अक्षाभोवती फिरत जाते. त्यासाठी बॅरलला रायफलिंग म्हणजेच आतून हेलिकल ग्रुव्हज केलेले असते. गोळीची गतिज ऊर्जा वाढवण्यासाठी वस्तुमान, अर्थात पदार्थाची घनता जास्त हवी म्हणून शिसे ं१्रं'>(छीं)ि/ं१्रं'> वापरले जाते. मात्र, शिसे विषारी असल्याने त्याच्या नुसत्या उपयोगावर बंदी आहे. म्हणून तांब्याचे कवच करून शिशाची गोळी करतात.
रायफलपासून शत्रूपर्यंत गोळीचा प्रवास हवेतून होतो. गोळीला हवेचा रोध होऊन गती कमी होते. त्यामुळे हवेचा रोध कमी करून शत्रूवर मारा करणारी गती ं१्रं'>(र३१्र'्रल्लॅ श्ी'्रू३८)/ं१्रं'> जास्तीत जास्त ठेवण्यासाठी गोळीला विशिष्ट आकार देतात. अशा आकाराला एरोडायनामिक शेप म्हणतात.
रायफलच्या गोळीपासून बचाव व्हावा म्हणून शत्रूही चिलखत किंवा बॉडी आर्मर ं१्रं'>(इ८ि अ१ें४१)/ं१्रं'> वापरतो. त्यामुळे रायफलच्या गोळीमध्ये चिलखत भेदण्याची क्षमता हवी. अर्थातच, जास्त गतिज ऊर्जा हवी; म्हणून प्रक्षेपण वेग जास्ती असायला हवा. गोळीची भेदकता वाढविण्यासाठी गोळीच्या पुढील टोकाला पोलादी शंकुकृती तुकडा बसवितात. तो चिलखत भेदायला सुरुवात करून देतो. त्यामुळे गोळीने चिलखत पूर्णपणे भेदले जाते व आतील जवानास इजा पोहोचते. गोळीचा मारा शत्रूच्या नाजूक व महत्त्वाच्या अवयवांवर झाला, तर शत्रूचा मृत्यू निश्चित होतो.
७.६२ मिलिमीटर कॅलिबरची रायफल किंवा 0.३0३ कॅलिबरची रायफल अनेक वर्षे वापरात आहे. मात्र, त्यामुळे शत्रूच्या जवानाचा मृत्यू होतो. सध्याच्या युद्धनीतीनुसार, शत्रूला जिवे मारण्यापेक्षा त्याला जखमी करून, अर्धमेले करण्याने युद्धाचे परिणाम जास्त चांगले मिळतात. म्हणून हल्ली ५.५६ मिलिमीटर रायफलच जगभर प्रचलित आहे.
No comments:
Post a Comment