लवकरच फेसबूकचे नवे मेसेंजर ऍप
मोबाईल ऍप्स वापरणाऱ्या सर्वांसाठी चॅटिंग करण्यासाठी फेसबूक एक वेगळे नवे मेसेंजर ऍप सादर करणार आहे. हे ऍप सर्व ग्राहकांना आवडेल अशी ग्वाही फेसबूकच्या वतीने देण्यात आली आहे.जगातील सर्वांत मोठे सोशल नेटवर्किंग संकेतस्थळ असलेले फेसबूक पुढील दोन आठवड्यांमध्ये आपली चॅटिंगची सुविधा स्मार्टफोन ऍप्समधून काढून टाकणार आहे. तसेच, ज्यांना फेसबूकवरून अशाच पद्धतीने संदेश पाठवायचे किंवा स्वीकारायचे असतील त्यांना फेसबूकचे नवे मेसेंजर ऍप डाउनलोड करावे लागणार आहे.
हा बदल प्रथमतः ब्रिटन, फ्रान्स आणि स्कँडिनिव्हियन देशांमध्ये करण्यात येणार आहे. मात्र, अमेरिकेसह उर्वरित जगभरात त्यानंतर ही सुविधा देण्यात येणार आहे. ऍपल आणि अँड्रॉइड वापरणारे लोक ही सुविधा वापरू शकतील.
No comments:
Post a Comment