कृष्णकमळ
ख्रिस्ती बांधव याच फुलाला भगवान येशूने क्रूसावर स्वीकारलेले मरण समजतात. वेलाचे ताण म्हणजे येशूवर उगारलेला आसूड, किरीट म्हणजे येशूच्या मस्तकावरचा काटेरी मुकुट.
पाच निदले आणि पाच दले म्हणजे येशूचे दहा शिष्य. पीटर आणि ज्युडास या दोघांनी अखेरीस येशूला नाकारले होते. पाच पुकेसर म्हणजे पाच जखमा आणि तीन कुक्षी म्हणजे मस्तकावर मारलेले तीन खिळे. संस्कृत भाषेच्या प्रभावामुळे अनेक वनस्पती तसेच फुलांना संस्कृतप्रचुर नावे मिळाली आहेत. कृष्णकमळ त्यापैकीच एक आहे. मुळातील ही परदेशी वेल आता पक्की भारतीय झाली आहे. ष्णकमळ! ऊर्फ पॅशन फ्लॉवर. सौंदर्याचा परिपूर्ण आविष्कार. केवळ सौंदर्याचाच नव्हे, तर सुगंधाचा आणि नाजुकपणाचाही! तसं पाहिलं तर कृष्णकमळ हे नामाभिधान जरी अस्सल भारतीय असलं, तरी ही वेल निवासी अ-भारतीय आहे. हिची जन्मभूमी ब्राझील. तिथून भारतात ती कधी पोहोचली? कशी पोहोचली? कुणी आणली? हे सर्व प्रश्न अनुत्तरित असले, तरी भारतभूमीनं तिला नुसतंच स्वीकारलं नाही, तर थेट भगवंताचं प्रतीकच केलं! कृष्णकमळ ही एक बहुवर्षीय वेल; पण ती एकटीच नाही, तर पॅशन फ्लॉवर-वानसशास्त्रीय नाव पॅसीफ्लोरा या प्रजातीच्या कमीत-कमी चार जाती आपल्या आसपास वाढतात.
कृष्णकमळाची वेल बहुवर्षायू! एकदा कुंपणावर चढली, की अनेक वर्षे सुखानं नांदते, पावसाळ्यात भरभरून फुलते आणि परिसरावर सुगंधाचं साम्राज्य पसरतं. डंख नसलेली, मधमाशीची एक जाती या गंधावर आकर्षित होते. खेरीज फुलामध्ये मकरंदाचा ठेवाही असतोच. म्हणजेच आनंदयज्ञाचं जोरदार आमंत्रण! या वेलीची पानं त्रिखंडी, पानाच्या बेचक्यातून फुटणार्या ताणांना आधाराचा स्पर्श झाला, की त्यांची गुंडाळी होऊन आधाराला घट्ट पकडण्याचं काम झालंच. पानांच्या लांब देठाच्या टोकाशी असणार्या दोन ग्रंथी हे पानाचं आणखी एक वैशिष्ट्य! प्रत्येक कृष्णकमळाच्या लांब देठाच्या अग्राशी तीन छदांचं वलय असतं. प्रत्येक छद ठसठशीत आकारमानाचा. पाच निदलांचा तळाशी एक पेला आणि नंतर तलम फिकट जांभळ्या पाच पाकळ्या या पाकळ्यांपासून निघतात. असंख्य जांभळे धागे, फुलाचा सर्वांत देखणा भाग-किरीट. नंतर एका चिमुकल्या दांड्यावर पाच पिवळे अधोमुख पुकेसर, त्यांच्या अग्रावर बीजांडकोष. त्यापासून निघणारा आखूड कुक्षीवृंत आणि त्याला फुटलेल्या तीन लांबलचक कुक्षी.
आपण या फुलाला कौरव, पांडव आणि कृष्णाचं प्रतीक समजतो. जांभळ्या धाग्यांचा किरीट म्हणजे कौरव, पाच पुकेसर म्हणजे पांडव आणि बीजांडकोष अर्थात्च कृष्ण.
ख्रिस्ती बांधव याच फुलाला भगवान येशूचं क्रूसावर लटकणं समजतात. वेलाचे ताण म्हणजे येशूवर उगारलेला आसूड, किरीट म्हणजे येशूच्या मस्तकावरचा काटेरी मुकुट; पाच निदले आणि पाच दले म्हणजे येशूचे दहा शिष्य पीटर आणि ज्युडास या दोघांनी अखेरीस येशूला नाकारले होते. पाच पुकेसर म्हणजे पाच जखमा आणि तीन कुक्षी म्हणजे मस्तकावर मारलेले तीन खिळे.
आपल्याकडच्या कृष्णकमळाचं आयुष्य एकाच दिवसाचं; पण काही कृष्णकमळं तीन दिवस टिकतात. येशूला क्रूसावर लटकवलं शुक्रवारी, तो दिवस म्हणजे गुड फ्रायडे, त्याचं पुनरुत्थान झालं 'ईस्टर डे'ला म्हणजे रविवारी, तीन दिवस टिकणारं कृष्णकमळ म्हणूनच येशूचही प्रतीक आहे.
No comments:
Post a Comment