Blogroll

उग्र गंधाचा सैनिक - Camel Soldier

उग्र गंधाचा सैनिक Camel Smiling Soldier

उग्र गंधाचा सैनिक Camel Smiling Soldier


ज्युलियस सिझरला युद्ध जिंकल्यामुळे पराभूत न्युमिडियाचा राजा जुबा याच्याकडून उंटाच्या रूपाने मोठी खंडणी वसूल करता आली. त्यावेळचा न्युमेडिया म्हणजे आजचा अल्जेरिया. त्याचप्रमाणे जनरल रोमॅनस याने इ.स. ६६३मध्ये लेपीस मॅग्ना, म्हणजे आजच्या लिबियाकडून ४000 उंटांची खंडणी वसूल केली. सैन्याच्या वाहतुकीसाठी त्याला त्यांचा उपयोग झाला.
कालांतराने काही धर्मीयांकडून असा दावा केला, की पृथ्वीवरच्या डोंगरदर्‍या, समुद्र, नद्या आणि इतर प्राणिजीवनाच्या उत्पत्तीच्याही आधी उंटांची निर्मिती झाली. यामुळेही उंटाला पुढे महत्त्व येत गेले. त्यांची श्रद्धा आहे, की उंटाचा पुढचा उजवा पाय म्हणजे सैतान होय. गातील अनेक युद्धांत उंटांची कामगिरी निर्णायक ठरली आहे. ५५९ ते ५३0 या इ.स. पूर्व काळातला पर्शियाचा राजा 'सायरस द ग्रेट' याने सशस्र उंटदळ उभं केलं. ५४७मध्ये त्या वेळच्या लिडिया (आताचा तुर्कस्थान) या देशाच्या क्रोएशिया राजाचा पराभव केला. इतिहासातली उंटदळाची ही पहिली नोंद. त्याच्या उंटदळाने मागच्या पायदळाला संरक्षण देत समोरच्या शत्रूच्या घोडदळावर हल्ला केला. घोडे उंटांना समोर पाहून घाबरून सैरावैरा पळत सुटले. घोड्यांना उंटांचं दर्शनच काय; पण त्यांच्या शरीराचा तीव्र गंधही घाबरवतो, हे लिडियाच्या राजाचं निरीक्षण युद्ध जिंकायला उपयोगी पडलं. नंतरच्या पर्शियाच्या कॅबिसस राजाने इ.स.पू. ५३२-३0 या काळात आणि कसेरकससने इ.स.पू. ४८५ ते ४८२मध्ये उंटदळाचा वापर केला. प्रत्यक्ष युद्धदळाशिवाय सैन्याला रसद पुरविण्यासाठी, त्यांची मांसाची आणि दुधाची गरज भागविण्यासाठी, सामान, तंबू यांच्या वाहतुकीसाठीही उंटांचा मोठा उपयोग त्या काळापासून सुरू झाला.
उत्तर आफ्रिकेतल्या देशांवर कब्जा मिळविण्यासाठी तत्कालीन सैन्यदलांनी वाळवंटातून अरबी उंटांवरूनच प्रवास केला. उंटांनी अवजड सामानाची वाहतूक केली, यामुळेच सहारा वाळवंटातली उंटावरून रहदारी सुरू झाली, वाढली. उंट हे 'वाळवंटातील जहाज' म्हणून त्यानंतरच पुढे ओळखले जाऊ लागले. वाळवंटातील त्यांचा वापरही वाढला. अरबांनी युरोपातील स्पेन (इ.स. १0२0), सिसीली (इ.स. १0५९) आणि र्‍हाईन (इ.स. १९३६) मध्ये उंटासह प्रवेश केला. उंट तिथे स्थिरावले. नंतर मात्र ते नष्ट झाले; परंतु यापूर्वी दोन दशलक्ष वर्षांपूर्वीचे उंटाचे 'कॅमेलस आल्युटेन्सिस' जातीचे जीवाश्म युरोपातच सापडल्याची पुरातत्त्वीय नोंद आहे. चीन आणि मध्यपूर्वेकडील जोडणार्‍या व्यापारी 'रेशीम मार्गावर' उंटांच्या काफिल्याद्वारा व्यापारी मालाची वाहतूक नंतर रूढ झाली. अनेक समाजांमध्ये वधूसाठी वराकडून उंटरूपाने हुंडा वसूल केला जातो. मानवी जीवनात उंटाचा अशा रीतीने हळूहळू प्रवेश होत गेला. उत्क्रांत होत गेलेल्या या ऐतिहासिक महत्त्वाच्या प्राण्याच्या सवयी आणि जीवनक्रमही खूप अद्भुत आहे, त्यामुळेच तो अन्य कोणत्याही प्राण्यांपेक्षा वेगळा दिसतो व असतोही. 


No comments:

Post a Comment