मुरा मासे (MURA Fish)
मुरा जातीचे मासे पूर्वी मुळा, मुठा नदीत शहराचा भाग सोडला, तर सर्वत्र मिळत असत. विशेषत: कातकरी जमातीचे स्त्री-पुरुष नदी-ओढय़ामध्ये उभे राहून दोन्ही बाजूने एक पातळ कापड प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने धरून एकदम उचलतात. या कापडामध्ये झिंगे, मुरे, वाम, माशांची छोटी पिले इत्यादी सापडतात. कातकर्यांच्या या मासेमारीच्या पद्धतीमुळे बर्याचदा हे मासे कापडाच्या झोळीत जिवंत सापडतात आणि हे मासे अँक्वारियममध्येसुद्धा व्यवस्थित राहतात. मुरा हा मासा सध्या मात्र मुळा, मुठा नदीत सापडत नाही, तो केवळ वाढलेल्या प्रदूषणामुळे.
मुरा माशाचे शरीर लांबट, दोन्ही बाजूला टोकदार, तोंड वतरुळाकाराचे असते. दोन्ही ओठ एकमेकांशी जोडून हा विशिष्ट वतरुळाकार तयार होतो. त्याचा उपयोग पाण्याच्या तळाशी असलेल्या दगड, खडकावरील शेवाळ खरवडून काढण्यासाठी होत असावा. या माशाच्या वरच्या ओठावर छोटे-छोटे फुगवटे दिसतात आणि खालील ओठ मध्यभागी विभागल्यासारखा दिसल्यामुळे खालील ओठाचे दोन जाडसर भाग दिसतात. या माशाला चार छोट्या मिशा असतात. नाकावरील मिशी तुलनेने छोटी असते. या माशाचे पर विशिष्ट पद्धतीचे आहेत. पाठीवरील पर शरीराच्या मध्यभागी असण्याऐवजी ते तुलनेने डोक्याच्या जवळ असते. खांद्यावरील पर, पोटावरील पर आणि शरीराच्या खालील बाजूकडील परांच्या वर काळ्या रंगाचे ठिपके विशिष्ट पद्धतीने असतात. शरीराचा रंग पिवळसर राखाडी असतो. बिबट्याच्या अंगावर जसे काळे ठसे असतात, तसे या माशाच्या अंगावर विशिष्ट पद्धतीचे काळे ठसे असतात.
पूर्ण वाढ झालेला हा मासा ५.५ ते ६.५ सेंमीपर्यंत लांबीला भरला, तरी वजनाला ३.५ ग्रॅमपर्यंत भरतो. हा अत्यंत छोटा मासा असला, तरी कातकर्यांकडे या माशांसाठी खूप मागणी असते. या माशाच्या विणीचा हंगाम मुख्यत्वेकरून ऑगस्ट-सप्टेंबर आणि फेब्रुवारी-मार्च असे वर्षातून दोनदा असला, तरी हा मासा वर्षभर अंडी देत असतो, असे अभ्यासातून दिसून आले आहे. हा मासा २५0 ते १२00पर्यंत अंडी देतो. मुरा मासा मुख्यत्वेकरून अळी, कृमी, कीटक, झुप्लॅक्टन आणि फायटोप्लॅक्टनवर आपली उपजीविका करत असतो. शरीराच्या खालील बाजूकडील परांच्या वर काळ्या रंगाचे ठिपके विशिष्ट पद्धतीने असतात. शरीराचा रंग पिवळसर राखाडी असतो. बिबट्याच्या अंगावर जसे काळे ठसे असतात, तसे या माशाच्या अंगावर विशिष्ट पद्धतीने काळे ठसे असतात. पुण्याजवळच्या बहुतेक नदीनाल्यांमध्ये काही वर्षांपूर्वीपर्यंत विविध प्रकारचे मासे सापडत असत. आता मात्र शेतीसाठी रासायनिक खतांचा वापर सुरू झाल्याने या माशांवर संक्रांत आली आहे.
No comments:
Post a Comment