Blogroll

बबल तेजोमेघ bubble nebula

 बबल तेजोमेघ bubble nebula

bubble nebula बबल तेजोमेघ

र्मिष्ठा तारकासमूहातील या बबल नेब्युलाला बुडबुडा किंवा फुगा तेजोमेघ म्हणण्यापेक्षा बबल तेजोमेघ म्हणणं योग्य वाटतं. मागील वेळेस चर्चा केली त्या सोप बबल तेजोमेघासारखाच हा तेजोमेघ आहे. फक्त याच्या आणि सोप बबल तेजोमेघाच्या निर्मितीत मात्र फार मोठा फरक आहे. सोप बबल तेजोमेघ हा ग्रहसदृश तेजोमेघांपैकी आहे. अशा तेजोमेघांची निर्मिती तारा आधी फुगीर होऊन नंतर त्याच्या आकुंचन होण्यामुळे होते. बबल तेजोमेघाची निर्मिती एका अतितप्त तार्‍याने फेकलेल्या द्रव्याने जवळच्या आण्विक मेघाला पसरवल्यामुळे झाली आहे. छायाचित्र पाहून हे लक्षात येते.
फक्त वरवर बघून या दोघांतील फरक जाणवणार नाही. पण हे तेजोमेघ एक प्रकारे स्वयंप्रकाशित असतात.
दुसरी बाब म्हणजे ग्रहसदृश तेजोमेघांच्या केंद्रस्थानी त्यांचा तारा असतो. पण इथे तसं असेलच असं नाही. या तेजोमेघाचा शोध विल्यम हश्रेल यांनी १७८७ मध्ये लावला. हा तेजोमेघ आपल्यापासून सुमारे ७८00 प्रकाशवर्ष दूर आहे. आणि याचा व्यास ६ प्रकाशवर्ष आहे. ज्या तार्‍यातून हे द्रव्यमान बाहेर पडले आहे, त्या तार्‍याचे वस्तुमान सूर्याच्या १0 ते ४0 पट, तर त्याची प्रखरता सूर्याच्या काही हजारपट निश्‍चित करण्यात आली आहे. अशा तार्‍यांचा अंत एका महास्फोटातून होतो

No comments:

Post a Comment