लहानग्यांना दमा Asthma in Children
शहरांच्या प्रदूषणात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. वाहनांचा धूर,
कारखान्यातला धूर, त्यात भर म्हणजे फटाक्यांमधून निघणारा विषारी धूर.. या
सर्वांमध्ये आपली भावी पिढी अगदी गुदमरून जात आहे. नियमित औषधोपचारांबरोबरच
अँलर्जी व दमा असणार्या बालकांची विशेष काळजी घेतल्यास निश्चितच त्यांचा
आजार आटोक्यात राहू शकतो. कमकुवत प्रतिकारशक्ती
हल्ली फास्टफूडच्या
जमान्यात मुलांना पोषक व परिपूर्ण आहार मिळत नाही. मैदानी खेळ, नियमित
व्यायाम यांचा अभाव यांमुळे त्यांची प्रतिकारशक्तीही कमकुवतच असते. याचाच
दृश्य परिणाम म्हणजे लहान मुलांमध्ये अँलर्जी व दम्याच्या प्रमाणात प्रचंड
वाढ झालेली दिसून येते. आपल्या अवती- भवती नजर टाकल्यास हल्ली कितीतरी
बालके इनहेलर, स्पेसर व नेब्युलायझर दिसतात. शहरांच्या प्रदूषणात प्रचंड
प्रमाणात वाढ झाली आहे. वाहनांचा धूर, कारखान्यातला धूर, त्यात भर म्हणजे
फटाक्यांमधून निघणारा विषारी धूर.. या सर्वांमध्ये आपली भावी पिढी अगदी
गुदमरून जात आहे. नियमित औषधोपचारांबरोबरच अँलर्जी व दमा असणार्या
बालकांची विशेष काळजी घेतल्यास निश्चितच त्यांचा आजार आटोक्यात राहू शकतो.
ह/ल्ली दमा व अँलर्जीचे (त्वचेची अँलर्जीक र्हाइनाइट्स (सर्दी) नियंत्रण
करणारी उत्तम औषधे, श्वसनावाटे औषधे घेण्याची उपकरणे उपलब्ध आहेत. आपल्या
डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे ही औषधे नियमित द्यावीत. औषधे घेणे अचानक बंद
केल्यास अँलर्जी व दमा बळावतो.
ज्य/ा घटकांमुळे अँलर्जी दमा बळावतात,
त्यांना ळ१्रॅgor AÀfे म्हणतात. धूर, धूळ, परागकण, बुरशी, रासायनिक पदार्थ,
आहारातील ठरावीक पदार्थ, थंड पदार्थ, जंतुसंसर्ग या कारणांनी दमा अथवा
अँलर्जी उद्भवू किंवा वाढू शकतो. दमा अचानक बळावल्यास तातडीने वापरण्यासाठी
उत्तम औषधे उपलब्ध आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधी फवारा सतत जवळ
बाळगावा.
स्ांब/धित साधने वापरण्याचे योग्य तंत्र आपल्या डॉक्टरांकडून
शिकून घ्यावे. अन्यथा त्यातील औषध फुफ्फुसांपर्यंत पोहचणार नाही. औषध
घेण्याचे उपकरण आठवड्यातून एकदा धुवून कोरडे करून घ्यावे. नेब्यूलायझेशन
करताना प्रत्येक रुग्णासाठी वेगळा मास्क व ट्यूब वापरावी.
झाेपण्/याची
खोली, अंथरूण व उशा यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्याकरिता गालिचे,
केसाळ खेळणी, पांघरुणे वापरू नयेत. त्यात धूळ अडकते. त्याऐवजी सुती (धुता
येण्याजोगी) पांघरुणे व चादरी वापराव्यात. आवश्यक तेवढय़ाच चादरी व उशा
अंथरुणात ठेवाव्यात. फारशी धूळ बसणार नाही अशा कापडाच्या खोळी (१ी२्र२३r)
Uf´fSXf½यात.
घरात प्/ाळीव प्राणी ठेवणे टाळावे. हे शक्य नसल्यास त्यांचा बिछाने, सोफा इत्यादींशी संपर्क येऊ देऊ नये.
अगरबत्ती /अथवा रूम फ्रेशनर वापरू नये.
धूळ झटकण/े, रंगकाम, जंतुनाशक फवारणी (ढी२३ उल्ल३१'), °fT¯fZ B°¹ffदी गोष्टी करताना लहान मुलांना दूर ठेवावे.
मुलांना सक/स व चौरस आहार द्यावा. दिवसातून ४ वेळा विभागून द्यावा. भरपूर
पाणी पिण्यास प्रोत्साहित करावे. अँलर्जी वाढवणारे पदार्थ मात्र टाळावेत.
दही, चॉकलेट, मैदा, अतिसाखर इत्यादी पदार्थ कफाचे प्रमाण (चिकट स्राव)
वाढवतात. तेव्हा वरील पदार्थ टाळावेत.
मोकळय़ा हवेत /मैदानी खेळ
खेळण्याने फुफ्फुसाची क्षमता वाढते. ऑक्सिजन भरपूर मिळतो.
प्रतिकारशक्तीही वाढते. तेव्हा आपल्या मुलांना नियमित खेळ खेळण्यास
प्रोत्साहित करावे.
घरातील दम्याची/ औषधे पूर्ण संपण्याच्या आधीच विकत घेऊन ठेवावीत म्हणजे उपचारात खंड पडणार नाही.
सर्दी, पडसे झाल्य/ास दमा बळावू शकतो. अशा वेळी बर्याच रुग्णांना
अल्ल३्र्रु३्रू२ देऊन जंत्fbÀfaÀf¦fÊ लवकरात लवकर बरा करावा लागतो. तेव्हा
सर्दी पडशाकडे दुर्लक्ष करू नये.
सर्दी व स्वाईन फ्लू ट/ाळण्यासाठी लस उपलब्ध आहे. दमा व अँलर्जीक सर्दी असणार्या बालकांनी ही लस दर वर्षी घ्यावी.
तीव्र गारठय़ापासून ब्/ाळांना जपावे तसेच अंघोळीनंतर केस त्वरित पुसून कोरडे करावेत.
पालकांच्या धूम्रपानाम्/ाुळेही मुलांना त्रास उद्भवतो. तेव्हा मुलांसमोर
धूम्रपान टाळावे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपल्या बालकास दमा आहे, हे
स्वीकारून त्यावर नियमित उपचार करणे आवश्यक आहे.