Blogroll

ZIP Chains , झिप चेन

ZIP Chains , झिप चेन


सवी सनाच्या एकोणिसाव्या शतकात नवनव्या प्रकारचे कपडे अस्तित्वात आले. त्यामुळे हे कपडे अंगावर नीट बसावेत आणि अंगावरून झटपट काढता यावेत, अशा सोयींचे बरेच शोध लागले.
आपल्याकडे जशी बाराबंदी असायची, तसेच अनेक बंद बांधायचे कपडे युरोपातही वापरले जात. अगदी श्रीमंत व्यक्ती शिंपले आणि त्यापेक्षाही धनिक असलेले लोक हस्तिदंताची बटणे सतराव्या शतकात वापरत असत. त्याचं प्रमाण अर्थातच फार कमी होतं.
पुढं लाकडी बटणे आणि काजांचा जमाना आला. आकडी म्हणजे हुक आणि अडणी म्हणजे लूप, हे स्त्रियांचे कपडे बंद करण्यासाठीचे साधन मानले जाऊ लागले. धातुशास्त्रात जशी प्रगती झाली, तशी धातूंची बटणे आली. त्याचबरोबर एकमेकांत अडकणारे दाते तयार केले गेले. दाबून बसवायची 'टिच' बटणे आली. पण, ही एक एक करून लावावी लागत असत. त्यामुळे थोडी त्रासदायक वाटत.
व्हिटकोंब जुडसन या अमेरिकनाने बुटांसाठी सर्वप्रथम एकात एक घट्ट बसणार्‍या दात्यांचे क्लास्प लॉकर बनवले; पण थोडा ताण पडताच हे सुटत असत. १९१३मध्ये गिडीअन सुंडस्टॉर्म याने या दात्यांना एका झटक्यात एकत्र आणून एकमेकांत अडकवणारी सरक चावीची सोय बनवली. या चेनचे दाते एका पट्टीवर बसवले होते. चेनची सरक चावी सरकवताना होणार्‍या आवाजामुळं या सुविधेला झिप चेन किंवा झिप फासनर असं म्हणण्यात येऊ लागलं. प्लॅस्टिकच्या जमान्यात धातूच्या ऐवजी प्लॅस्टिक झिप अवतरल्या. त्या स्वस्त असल्यामुळे लोकप्रिय झाल्या. आता तर या चेन कपड्यांशिवाय पिशव्या, बूट, बॅगा, लहान लहान मनीपर्स यांसाठीही वापरल्या जातात. 

फूलपाखरांचे अद्भुत स्थलांतर

फूलपाखरांचे  अद्भुत स्थलांतर


वर्षी पानगळीच्या ऋतूमध्ये कोट्यवधी मोनार्क फूलपाखरे कॅनडा आणि अमेरिकेच्या ग्रेट लेक्स भागातून दक्षिणेकडे स्थलांतर करतात. ती ३,२00 किलोमीटर प्रवास करून हिवाळ्यात मध्य मेक्सिकोत पोहोचतात. हे एक नैसर्गिक आश्‍चर्य आहे; कारण आदल्या वर्षीच्या आणि पुढच्या वर्षीच्या फूलपाखरांमध्ये ५ पिढय़ांचे अंतर असते. तरीही ही फूलपाखरे ठराविक ठिकाणी वास्तव्यास जातातच; पण ती वर्षानुवर्षे खरे म्हणजे हजारो वर्षे ठाराविक मार्गानेच जातात. ठराविक झाडांवरच वाटेत वास्तव्यास उतरतात. त्यांच्यामुळे आकाश काळवंडून जाते, असे त्यांचे ढग विहरत असतात. ठराविक तारखेला ती ठराविक ठिकाणी पोहोचतात. त्यामुळे आता त्यांचा मार्ग पर्यटकांचे आकर्षण झाले आहे.

Computer Hackers हॅकरचे उद्देश

Computer Hackers  हॅकरचे उद्देश


बर्‍याचदा हॅकरना आपले ज्ञान किती प्रगत झाले आहे, किती अवघड आणि मोठय़ा सर्व्हरमध्ये आपण शिरू शकतो, याचा अंदाज घ्यायचा असतो. आपले ज्ञान आणि बुद्धी अशा प्रकारे अजमावून पाहण्याची, त्यातून थ्रिलिंग व समाधान मिळविण्याची त्यांची इच्छा असते. मात्र, यासाठी संगणकशास्त्राचे चांगले ज्ञान, भरपूर वेळ आणि कमालीचा संयम त्यांना ठेवावा लागतो.
हॅकरचा इतिहास पाहिला, तर त्यात शाळकरी मुले व कोवळे तरुण यांचा भरणा दिसतो. किती तरी शाळकरी वयाचे हॅकर वर्षानुवर्षे तुरुंगात खितपत पडल्याची, तुरुंगात संशयास्पद स्थितीत मरण पावल्याची उदाहरणे आहेत.
जॉन द रीपरसारखी टुल्स आता कालबाह्य झाली आहेत. ती वापरून पासवर्ड क्रॅक होण्याची शक्यता आता फारच दुरापास्त आहे. बर्‍याचदा तीनदा चुकीचा पासवर्ड टाइप केल्यानंतर तुमचा पासवर्ड लॉक करण्याची पद्धत बँका किंवा तत्सम संस्थांच्या वेबसाईटवर आजकाल दिसते. यामागील कारणही सुरक्षा हेच आहे.
आता अनेक बुद्धिमान हॅकर हे सरकारच्या वा मोठय़ा कंपन्यांच्या सेवेत सल्लागार म्हणून गेलेले दिसतात. एके काळी एफबीआयच्या टेन मोस्ट वाँटेड लीस्टमध्ये असलेला भारी हॅकर केविन मिटनीकदेखील आता सल्लागारी पेशात आहे.  

असा होतो पासवर्डहॅक | Computers Password Hacking

असा होतो पासवर्डहॅक | Computers Password Hacking 

जगातील संपूर्ण संगणकीय व्यवस्था 'पासवर्ड' पद्धतीवर आधारलेली आहे. डेबिट कार्डाचा पिन क्रमांक हादेखील एक प्रकारचा पासवर्डच असतो. ऐतिहासिक काळात किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठीचा परवलीचा शब्द शत्रूच्या हातात पडणार नाही, याची काटेकोर काळजी घेतली जात असे. शत्रूने परवलीचा शब्द मिळविला आणि बेकायदेशीरपणे किल्ल्यावर प्रवेश केला, असे उदाहरण इतिहासात फारसे सापडत नाही.
आज मात्र अगदी सर्रास पासवर्ड पळविला जातो. याचे कारण तंत्रज्ञानाचा ज्याला गंधही नाही, प्रोग्रॅमिंग कशाशी खातात, हे ज्याला कणभरही माहीत नाही असा माणूसही तुमचा पासवर्ड मिळवू शकतो. त्यासाठी त्याने कॉम्प्युटर सायन्स शिकलेले असण्याची किंवा तो बुद्धिमान असण्याची गरज नाही.
जगातला सर्वांत गाजलेला अमेरिकन हॅकर म्हणजे केविन मिटनीक. एफबीआयच्या तपास यंत्रणेला जे पहिले १0 मोस्ट वाँटेड गुन्हेगार होते, त्यांत केविन मिटनीक हा होता. १९९४-९५च्या सुमारास त्याने काही टेलिफोन कंपन्यांच्या संगणकीय सिस्टीमचे पासवर्ड हॅक करून त्यांचा दुरुपयोग करून शेकडो टेलिफोन (नंतर मोबाईल सेवेचीही) कनेक्शन दिली होती. अनेक महिने केविन मिटनीक फरारी होता. नंतर तो पकडला गेला. त्याची शिक्षा पूर्ण होऊन जेव्हा तो बाहेर पडला, तेव्हा त्याने ं१्रं'>अ१३ ा ीिूीस्र३्रल्ल /ं१्रं'>नावाचे पुस्तक लिहिले. या आणि त्याच्या इतर पुस्तकांमध्ये केविनने मुद्दा मांडला, की बहुतेक वेळा त्याने तंत्रज्ञानापेक्षा मानवी कौशल्यांचा उपयोग करूनच पासवर्ड मिळविले होते. एका टेलिफोन कंपनीच्या ऑपरेटर तरुणीशी त्याने सूत जमविले आणि तिने आपल्या प्रियकराला (म्हणजे केविनला) कंपनीचा पासवर्ड 'प्रेमपूर्वक' अर्पण केला.
पासवर्डच्या बाबतीत आता खूपच जागरूकता आली आहे; पण तरीही आजदेखील विशेषत: अशा लाखो महिला आहेत, की ज्यांचा पासवर्ड म्हणजे त्यांच्या मुलाचे नाव असते; फार तर मुलाचे नाव आणि त्याचे जन्मवर्ष असते. हॅकरगिरी करण्याची हौस असणारा कुणीही बिनडोक माणूस हे नावांचे पासवर्ड 'ट्राय' करून पाहत असतो. काही जण आपला फोन नंबर पासवर्ड म्हणून ठेवतात. असे साधे पासवर्ड मिळविण्यासाठी तंत्रज्ञान वापरावे लागत नाही.
खूपदा 'ं१्रं'>ऋ१ॅ३३ील्ल ढं२२६१ि/ं१्रं'>'साठी 'सिक्रेट क्वेश्‍चन'ची व्यवस्था असते. या गुप्त प्रश्नाचे अचूक उत्तर दिले, की आपण विसरलेला पासवर्ड आपल्याला परत मिळतो. बर्‍याचदा असे घडते, की ं१्रं'>हँं३ ्र२ ८४१ े३ँी१२ ें्रीिल्ल ल्लेंी?/ं१्रं'> असा प्रश्न असतो. समजा त्या प्रश्नाचे उत्तर ं१्रं'>ं२ँ िं/ं१्रं'>हे असेल, तर ते मिळविणे फारसे अवघड नसते. एकाने चक्क आजीलाच तिचे माहेरचे नाव विचारले आणि तिच्या मुलाचा ई-मेल पासवर्ड 'ं१्रं'>ऋ१ॅी३ ढं२२६१ि/ं१्रं'>' सुविधा वापरून मिळविल्याचे उदाहरण घडलेले आहे.
पण, आता पासवर्डच्या बाबतीत जागरूकता असल्याने मोठे पासवर्ड, त्यात अप्पर-लोअर केस अक्षरे, आकडे, काही सांकेतिक खुणा वगैरे यांनी युक्त असे पासवर्ड असतात. असे पासवर्ड कोणी कितीही संगणकतज्ज्ञ असला, तरी तोडू शकत नाही. त्यामुळेच पासवर्ड हॅकिंगची उदाहरणे आता खूपच कमी झाली आहेत. भारतातील एका फार मोठय़ा युद्धविषयक शासकीय यंत्रणेचा पासवर्ड होता अठं१्रं'>रक. /ं१्रं'>हा पासवर्ड एका किशोरवयीन अमेरिकन मुलाने तंत्रज्ञानाचा वापर करून तोडला. या मुलाने 'जॉन द रीपर' नावाचे मोफत उपलब्ध असलेले एक सॉफ्टवेअर त्यासाठी वापरले. पासवर्ड क्रॅकिंगसाठी हे सॉफ्टवेअर त्या काळात लोकप्रिय होते. हे सॉफ्टवेअर तो पासवर्ड म्हणजे एखादा शब्दकोशातला शब्द आहे का, हे तपासून पाहते. समजा जर पासवर्ड म्हणून इीं१्रं'>ं४३्रा४' ह/ं१्रं'>ा शब्द असेल, तर सॉफ्टवेअरला तो सापडत असे. पासवर्ड क्रॅकिंगची ही डिक्शनरी पद्धत वापरात असल्याचे समजल्यानंतर लोकांमध्ये जागरूकता आली आणि डिक्शनरीतले शब्द पासवर्डसाठी वापरणे खूपच कमी झाले.
सॉफ्टवेअर वापरून पासवर्ड तोडण्याची दुसरी पद्धत म्हणजे इ१४३ं१्रं'>ी ा१ूी. य/ं१्रं'>ात पासवर्डमधील प्रत्येक अक्षर कोणते आहे, हे तांत्रिक पद्धतीने तपासले जाते. वर उल्लेख केलेला अठरकं१्रं'> हा /ं१्रं'>पासवर्ड याच ब्रुट फोर्स पद्धतीने तोडण्यात आला होता. ब्रुट फोर्स पद्धत फार सरळ आणि साधी आहे. इंग्रजीत २६ कॅपिटल अक्षरे आणि २६ लोअर केस अक्षरे आहेत. याखेरीज, साधारणत: पासवर्डमध्ये वापरली जातील अशी , ं१्रं'>, वगै/ं१्रं'>रे आणखी काही चिन्हे व १0 अंक आहेत. त्यांच्याबाहेर पासवर्डमध्ये इतर काहीही नसते. अठरकं१्रं'> या /ं१्रं'>चार अक्षरी पासवर्डचे पहिले अक्षर अ आं१्रं'>ह/ं१्रं'>े की आणखी काही, हे तपासण्यासाठी त्या शाळकरी मुलाला फक्त काही मिनिटे लागली. काही तास जॉन द रीपर सॉफ्टवेअर नेटाने चालू ठेवल्यानंतर त्याला अठरकं१्रं'> हा /ं१्रं'>पासवर्ड मिळाला. तो वापरून भारताच्या एका फार मोठय़ा शासकीय यंत्रणेच्या सर्व्हरमध्ये त्याला शिरता आले. या निष्पाप मुलाने तो पासवर्ड पुढे एका फोरमवर प्रसिद्ध केला. यातूनच पुढे त्या शासकीय यंत्रणेची वेबसाईट इतर हॅकरनी हॅक केली आणि त्यावर भारताविरुद्ध संदेश प्रकाशित केला.
अशा घटनांमधूनच शिकता येते. त्यामुळेच आता पासवर्ड केवळ ३-४ अक्षरांचा न ठेवता तो किमान ८-१0 अक्षरांचा ठेवला जातो. त्यातही डिक्शनरीतील शब्द न वापरता काही तरी वेगळी अक्षररचना केली जाते. त्यात आकडे, ं१्रं'> यास्/ं१्रं'>ारखी चिन्हे, तसेच अप्पर-लोअर अक्षरांचा अंतर्भाव करतात. असे मोठे पासवर्ड जॉन द रीपर (खँल्लं१्रं'> ३ँी १्रस्रस्री१) सार/ं१्रं'>खी पासवर्ड क्रॅकिंग टुल्स वापरून तोडणे निव्वळ अशक्य असते. कित्येक दिवस प्रयत्न करीत राहूनही असे मोठे पासवर्ड क्रॅक होत नाहीत.
पासवर्ड मिळविण्यासाठी वापरली जाणारी आणखी एक पद्धत म्हणजे कीस्ट्रोक लॉगिंग. पासवर्ड जेव्हा तुम्ही तुमच्या संगणकावर टाइप करता, तेव्हा तुम्ही अर्थातच काही बटणे दाबता. तुम्ही कोणती बटणे दाबलीयत, याचे रेकॉर्ड गुप्तपणे नोंदवणारी स्पायवेअर असतात. त्यांना 'स्पाय' वेअर असे म्हटले जाते ते अगदी अर्थपूर्ण आहे. अशी स्पायवेअर आपले पासवर्ड, पिन नंबर चोरू शकतात. त्यासाठीच आपला संगणक किंवा मोबाईल हा चांगल्या अँटि-व्हायरस व अँटी-स्पायवेअर सॉफ्टवेअरने युक्त असायला हवा.

ब्लू टूथबद्दल मजेदार माहिती Bluetooth Details in Marathi

ब्लू टूथबद्दल मजेदार माहिती Bluetooth Details in Marathi

ब्लू टूथबद्दल मजेदार माहिती Bluetooth Details in Marathi

ब्लू टूथचा शोध एरिक्सन कंपनीने सन १९९४मध्ये लावला. आता ब्लू टूथमध्ये सुधारणा करण्याचे काम ब्लू टूथ स्पेशल इंटरेस्ट ग्रुप करीत आहे. एरिक्सन, इंटेल, आयबीएम, मोटोरोला, नोकिया, लेनिवो, मायक्रोसॉफ्ट, तोशिबा या कंपन्या या ग्रुपच्या सदस्य आहेत. ब्लू टूथ आता नवीन व वेगवान जनरेशनमध्ये येत आहे. त्याचा वापर त्यामुळे आता अधिक प्रमाणात होऊ लागेल. ब्लू टूथबद्दल मजेदार माहिती 'ब्लू टूथ' या तंत्रज्ञानाचे नाव डेन्मार्कच्या 'हेरल्ड ब्लू टूथ' नावाच्या मध्ययुगीन राजाच्या नावावरून दिले गेले. तो सत्तेवर येण्यापूर्वी डेन्मार्कमधील सर्व लहान राज्यांचे आपापसातील संबध बिघडले होते. हेरल्डच्या कर्तबगारीमुळे या लहान राज्यांचे संबंध चांगले झाले व सगळे एकत्रित आले. संबंध जुळवण्याच्या व वाढवण्याच्या हेरल्डच्या या वैशिष्ट्यामुळे या तंत्रज्ञानाला त्याचे नाव बहाल केले. तेच आता सर्वत्र रूढ झाले आहे.
र्ट मोबाईलचा अविभाज्य भाग म्हणजे ब्लू टूथ. स्मार्ट फोनमध्ये असलेली गाणी, चित्र व माहिती मित्रांना देताना ब्लू टूथचा उपयोग होतो. ब्लू टूथच्या प्रसिद्धीचे मुख्य कारण म्हणजे ते वायरलेस असते व माहितीची देवाणघेवाण करताना कसलाही आर्थिक भार पडत नाही.
ब्लू टूथ यंत्र १ ते ३ मिलिवॉट इतक्या कमी क्षमतेचे संकेत एकमेकांना पाठवतात. त्यामुळे १0 मीटरच्या क्षेत्रफळापर्यंत ते दुसर्‍या यंत्राशी बोलू शकतात. यातून एका मोबाईलद्वारे दुसर्‍या मोबाईलबरोबरच संपर्क साधता येतो असे नाही, तर एका मोबाईलमधून दुसर्‍या स्पीकर किंवा अन्य यंत्रांबरोबरही संपर्क साधता येतो. यामुळे मोबाईलची बॅटरी लवकर संपत नाही व दुसरे असे, की १0 मीटरपर्यंत तिसर्‍या यंत्राशी चुकूनही कनेक्ट होत नाही.
आता नव्या प्रकारात ब्लू टूथ यंत्र किंवा आपला मोबाईल एका वेळी इतर ८ यंत्रांशी कनेक्ट होऊ शकतो. हे 'स्पेशल स्पेक्ट्रम फ्रिक्वेन्सी होपिंग' या तंत्रामुळे होते. यात मोबाईल दुसर्‍या यंत्रांना पाठविण्यात येणार्‍या फ्रिक्वेन्सी दर सेकंदाला १,६00 वेळा बदलतो. ब्लू टूथच्या सॉफ्टवेअरमुळे हे शक्य होते. हे सॉफ्टवेअर एका ब्लू टूथ चीपला चालवते. ही चीप म्हणजे एक रेडिओ ट्रान्समीटर असते. ही चीप वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सींच्या द्वारे माहितीचे रेडिओ लहरींमध्ये रूपांतर करून या लहरी १0 मीटरपर्यंतच्या अंतरावर असलेल्या दुसर्‍या मोबाईल किंवा अन्य यंत्रापर्यंत पोहोचवते. त्या यंत्राने या लहरी समजून त्यातून माहिती काढायची असते. तसे सॉफ्टवेअर म्हणजे ब्लू टूथ त्या यंत्राला असतेच. या लहरींचे त्या यंत्रांकडून माहितीत अथवा चित्रात रूपांतर होते. या प्रकारे गाणी व चित्र एका मोबाईलमधून दुसर्‍या मोबाईलला पाठवू शकतो.
मोबाईलमध्ये कॅमेरा, स्पीकर, नोटपॅड अशा अनेक सुविधा आहेत. ब्लू टूथ त्यांपैकीच एक आहे. यामुळे एका मोबाईलवरून दुसर्‍या मोबाईलवर विविध प्रकारच्या माहितीची देवाणघेवाण करता येते. 3 2 1 ब्लू टूथची तीन वैशिष्ट्ये आहेत.
वायरलेस - ब्लू टूथमुळे कसल्याही तारा, वायर न वापरता लांबपर्यंत माहिती पोहोचविता येते.
वेग - ब्लू टूथ २.४५ गेगाबाईट्सच्या फ्रिक्वेन्सीने माहिती पाठवू शकते.

मुरा मासे (MURA Fish)

मुरा मासे  (MURA Fish)

मुरा मासे  (MURA Fish)
मुरा जातीचे मासे पूर्वी मुळा, मुठा नदीत शहराचा भाग सोडला, तर सर्वत्र मिळत असत. विशेषत: कातकरी जमातीचे स्त्री-पुरुष नदी-ओढय़ामध्ये उभे राहून दोन्ही बाजूने एक पातळ कापड प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने धरून एकदम उचलतात. या कापडामध्ये झिंगे, मुरे, वाम, माशांची छोटी पिले इत्यादी सापडतात. कातकर्‍यांच्या या मासेमारीच्या पद्धतीमुळे बर्‍याचदा हे मासे कापडाच्या झोळीत जिवंत सापडतात आणि हे मासे  अँक्वारियममध्येसुद्धा व्यवस्थित राहतात. मुरा हा मासा सध्या मात्र मुळा, मुठा नदीत सापडत नाही, तो केवळ वाढलेल्या प्रदूषणामुळे.
मुरा माशाचे शरीर लांबट, दोन्ही बाजूला टोकदार, तोंड वतरुळाकाराचे असते. दोन्ही ओठ एकमेकांशी जोडून हा विशिष्ट वतरुळाकार तयार होतो. त्याचा उपयोग पाण्याच्या तळाशी असलेल्या दगड, खडकावरील शेवाळ खरवडून काढण्यासाठी होत असावा. या माशाच्या वरच्या ओठावर छोटे-छोटे फुगवटे दिसतात आणि खालील ओठ मध्यभागी विभागल्यासारखा दिसल्यामुळे खालील ओठाचे दोन जाडसर भाग दिसतात. या माशाला चार छोट्या मिशा असतात. नाकावरील मिशी तुलनेने छोटी असते. या माशाचे पर विशिष्ट पद्धतीचे आहेत. पाठीवरील पर शरीराच्या मध्यभागी असण्याऐवजी ते तुलनेने डोक्याच्या जवळ असते. खांद्यावरील पर, पोटावरील पर आणि शरीराच्या खालील बाजूकडील परांच्या वर काळ्या रंगाचे ठिपके विशिष्ट पद्धतीने असतात. शरीराचा रंग पिवळसर राखाडी असतो. बिबट्याच्या अंगावर जसे काळे ठसे असतात, तसे या माशाच्या अंगावर विशिष्ट पद्धतीचे काळे ठसे असतात.
पूर्ण वाढ झालेला हा मासा ५.५ ते ६.५ सेंमीपर्यंत लांबीला भरला, तरी वजनाला ३.५ ग्रॅमपर्यंत भरतो. हा अत्यंत छोटा मासा असला, तरी कातकर्‍यांकडे या माशांसाठी खूप मागणी असते. या माशाच्या विणीचा हंगाम मुख्यत्वेकरून ऑगस्ट-सप्टेंबर आणि फेब्रुवारी-मार्च असे वर्षातून दोनदा असला, तरी हा मासा वर्षभर अंडी देत असतो, असे अभ्यासातून दिसून आले आहे. हा मासा २५0 ते १२00पर्यंत अंडी देतो. मुरा मासा मुख्यत्वेकरून अळी, कृमी, कीटक, झुप्लॅक्टन आणि फायटोप्लॅक्टनवर आपली उपजीविका करत असतो. शरीराच्या खालील बाजूकडील परांच्या वर काळ्या रंगाचे ठिपके विशिष्ट पद्धतीने असतात. शरीराचा रंग पिवळसर राखाडी असतो. बिबट्याच्या अंगावर जसे काळे ठसे असतात, तसे या माशाच्या अंगावर विशिष्ट पद्धतीने काळे ठसे असतात. पुण्याजवळच्या बहुतेक नदीनाल्यांमध्ये काही वर्षांपूर्वीपर्यंत विविध प्रकारचे मासे सापडत असत. आता मात्र शेतीसाठी रासायनिक खतांचा वापर सुरू झाल्याने या माशांवर संक्रांत आली आहे. 

कृष्णकमळ

कृष्णकमळ

कृष्णकमळ

ख्रिस्ती बांधव याच फुलाला भगवान येशूने क्रूसावर स्वीकारलेले मरण समजतात. वेलाचे ताण म्हणजे येशूवर उगारलेला आसूड, किरीट म्हणजे येशूच्या मस्तकावरचा काटेरी मुकुट.
पाच निदले आणि पाच दले म्हणजे येशूचे दहा शिष्य. पीटर आणि ज्युडास या दोघांनी अखेरीस येशूला नाकारले होते. पाच पुकेसर म्हणजे पाच जखमा आणि तीन कुक्षी म्हणजे मस्तकावर मारलेले तीन खिळे. संस्कृत भाषेच्या प्रभावामुळे अनेक वनस्पती तसेच फुलांना संस्कृतप्रचुर नावे मिळाली आहेत. कृष्णकमळ त्यापैकीच एक आहे. मुळातील ही परदेशी वेल आता पक्की भारतीय झाली आहे. ष्णकमळ! ऊर्फ पॅशन फ्लॉवर. सौंदर्याचा परिपूर्ण आविष्कार. केवळ सौंदर्याचाच नव्हे, तर सुगंधाचा आणि नाजुकपणाचाही! तसं पाहिलं तर कृष्णकमळ हे नामाभिधान जरी अस्सल भारतीय असलं, तरी ही वेल निवासी अ-भारतीय आहे. हिची जन्मभूमी ब्राझील. तिथून भारतात ती कधी पोहोचली? कशी पोहोचली? कुणी आणली? हे सर्व प्रश्न अनुत्तरित असले, तरी भारतभूमीनं तिला नुसतंच स्वीकारलं नाही, तर थेट भगवंताचं प्रतीकच केलं! कृष्णकमळ ही एक बहुवर्षीय वेल; पण ती एकटीच नाही, तर पॅशन फ्लॉवर-वानसशास्त्रीय नाव पॅसीफ्लोरा या प्रजातीच्या कमीत-कमी चार जाती आपल्या आसपास वाढतात.
कृष्णकमळाची वेल बहुवर्षायू! एकदा कुंपणावर चढली, की अनेक वर्षे सुखानं नांदते, पावसाळ्यात भरभरून फुलते आणि परिसरावर सुगंधाचं साम्राज्य पसरतं. डंख नसलेली, मधमाशीची एक जाती या गंधावर आकर्षित होते. खेरीज फुलामध्ये मकरंदाचा ठेवाही असतोच. म्हणजेच आनंदयज्ञाचं जोरदार आमंत्रण! या वेलीची पानं त्रिखंडी, पानाच्या बेचक्यातून फुटणार्‍या ताणांना आधाराचा स्पर्श झाला, की त्यांची गुंडाळी होऊन आधाराला घट्ट पकडण्याचं काम झालंच. पानांच्या लांब देठाच्या टोकाशी असणार्‍या दोन ग्रंथी हे पानाचं आणखी एक वैशिष्ट्य! प्रत्येक कृष्णकमळाच्या लांब देठाच्या अग्राशी तीन छदांचं वलय असतं. प्रत्येक छद ठसठशीत आकारमानाचा. पाच निदलांचा तळाशी एक पेला आणि नंतर तलम फिकट जांभळ्या पाच पाकळ्या या पाकळ्यांपासून निघतात. असंख्य जांभळे धागे, फुलाचा सर्वांत देखणा भाग-किरीट. नंतर एका चिमुकल्या दांड्यावर पाच पिवळे अधोमुख पुकेसर, त्यांच्या अग्रावर बीजांडकोष. त्यापासून निघणारा आखूड कुक्षीवृंत आणि त्याला फुटलेल्या तीन लांबलचक कुक्षी.
आपण या फुलाला कौरव, पांडव आणि कृष्णाचं प्रतीक समजतो. जांभळ्या धाग्यांचा किरीट म्हणजे कौरव, पाच पुकेसर म्हणजे पांडव आणि बीजांडकोष अर्थात्च कृष्ण.
ख्रिस्ती बांधव याच फुलाला भगवान येशूचं क्रूसावर लटकणं समजतात. वेलाचे ताण म्हणजे येशूवर उगारलेला आसूड, किरीट म्हणजे येशूच्या मस्तकावरचा काटेरी मुकुट; पाच निदले आणि पाच दले म्हणजे येशूचे दहा शिष्य पीटर आणि ज्युडास या दोघांनी अखेरीस येशूला नाकारले होते. पाच पुकेसर म्हणजे पाच जखमा आणि तीन कुक्षी म्हणजे मस्तकावर मारलेले तीन खिळे.
आपल्याकडच्या कृष्णकमळाचं आयुष्य एकाच दिवसाचं; पण काही कृष्णकमळं तीन दिवस टिकतात. येशूला क्रूसावर लटकवलं शुक्रवारी, तो दिवस म्हणजे गुड फ्रायडे, त्याचं पुनरुत्थान झालं 'ईस्टर डे'ला म्हणजे रविवारी, तीन दिवस टिकणारं कृष्णकमळ म्हणूनच येशूचही प्रतीक आहे.

IB Board 'आयबी बोर्ड':वैज्ञानिक शिक्षण पद्धतीचे नवे दालन

IB Board 'आयबी बोर्ड':वैज्ञानिक शिक्षण पद्धतीचे नवे दालन


'पहिली ते आठवी परीक्षा बंद' असा नियम निघाला आणि विविध शिक्षणतज्ज्ञांनी यावर आपली मते मांडली.. काहींनी त्यावर प्रखर नाराजी व्यक्त केली, तर काहींनी (बळजबरीने) स्वागत केले. जागतिकीकरणाच्या बदलांमध्ये शिक्षण क्षेत्रातही अनेक बदल होत आहेत. 'शालेय पातळीवर परीक्षा नको' हा त्यापैकीच एक बदल. प्रचलित परीक्षा पद्धत खरंच सर्वोत्कृष्ट आहे की नाही, वा त्याला उपलब्ध असलेले पर्याय यांवर प्रकाश टाकण्याच्या प्रयत्न या लेखाद्वारे केला आहे.

माझ्या मते, 'विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास' हे शिक्षणाचे मूळ उद्दिष्ट परीक्षा पद्धतीतून क्वचितच सफल होते. परीक्षाकेंद्रीत पद्धतीमध्ये विद्यार्थ्याच्या डोक्‍यात बदाबदा माहिती ओतणे म्हणजेच 'शिकवणे' आणि ती माहिती जशीच्या तशी परीक्षेमध्ये उतरवणे म्हणजे 'ज्ञानप्राप्ती'! यामुळे आपल्या शिक्षणपद्धतीत विधाने, व्याख्या, नियम यांची घोकंपट्टी रुजली. विज्ञानात प्रयोगांचे अनन्यसाधारण महत्त्व असूनही प्रयोगांना विज्ञान शिक्षणाचे माध्यम बनविण्याची गरज वाटली नाही.

सर्वसाधारणत:, 60 संख्या असलेल्या आपल्या वर्गांमध्ये एक-दोन विद्यार्थी उत्तम आकडेमोड अथवा स्मरणशक्तीच्या जोरावर परीक्षेत गुण मिळवित असतील, तर त्यांना आपल्याकडे 'हुशार' मानले जाते आणि इतर विद्यार्थी 'सर्वसाधारण' किंवा 'ढ' म्हणून विभागले जातात. स्मरणशक्ती किंवा उत्तम आकडेमोडीच्या आधारावर केलेली विभागणी 'सर्वसाधारण' व 'ढ' समजल्या गेलेल्या मुलांसाठी धोकादायक होऊ शकते. 'तारें जमीन पर'मधली 'एव्हरी चाईल्ड इज स्पेशन' ही आमीर खानने मांडलेली संकल्पना आपल्या प्रचलित परीक्षाकेंद्रीत पद्धतीमध्ये कुठेच समाविष्ट होत नाही.

चाकोरीबद्ध, शिस्तीच्या बडग्याखालची आणि परीक्षाकेंद्रीत पद्धत विद्यार्थ्यांची खरी जिज्ञासा वाढविते का? विद्यार्थी हे खरंच जिज्ञासू असतात. सलग पाच वर्षे परदेशात शालेय शिक्षक म्हणून काम केल्यावर मला आपली विज्ञान शिक्षण पद्धती आणि आधुनिक विज्ञान शिक्षण पद्धतीतील फरक लक्षात आला. आधुनिक विज्ञान शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी फक्त परीक्षा हेच एक माध्यम नाही. परीक्षा पद्धतीला पर्याय काय आणि कसा, याचा उहापोह करण्यासाठीच हा लेख..

दहावी, बारावी बोर्ड, सीबीएसई, आयसीएसई आणि आयजीसीएसई याप्रमाणेच शिक्षणक्षेत्रात 'आयबी' (International Baccalaureate) हे नवीन बोर्ड उदयास आले आहे. त्याची सुरवात स्वित्झर्लंडमध्ये झाला. सध्या भारतामध्येही पुणे, मुंबई, बंगळूर, दिल्लीमध्ये काही प्रमाणात या 'आयबी' शाळा आहेत. या 'आयबी' शाळा आणि त्यांच्या विज्ञान शिक्षण पद्धतीची आपण थोडक्‍यात ओळख करून घेऊ.

'प्रचलित परीक्षा पद्धतीला पर्याय' या विचारातून 'आयबी'ची सुरवात 1982 च्या दरम्यान झाली. गेल्या 30 वर्षांत चीन, मलेशिया, जपान आणि आफ्रिकेतील देशांत 'आयबी' शाळांची संख्या वाढत आहे. 'आयबी'मध्ये विज्ञान शिक्षणाची एक विशिष्ट चाकोरी आढळून येत नाही. शिक्षकांना इतर विषयांतील आंतरसंबंध जाणीवपूर्वक साधावा लागतो. 'इतिहासातील विज्ञानाची परिस्थिती' यावर मुलांना खोलवर संशोधन करण्याची मुक्तता आहे. उदाहरणार्थ, '15 व्या शतकातील महिला मासिक पाळीत आपल्या शरीराची वैज्ञानिक पद्धतीने कशी काळजी घेत होत्या' ही इयत्ता सातवीच्या वर्गासाठी संशोधनांतर्गत परीक्षा होती. वर्गातील विद्यार्थ्यांच्या गटाने इंटरनेटच्या मदतीने विविध स्रोतांद्वारे माहिती संकलित केली आणि त्याचे सविस्तर विश्‍लेषण करून त्याचे दिलेल्या वेळेत उत्कृष्ट सादरीकरण केले. गटातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या वाट्याला काहीतरी काम आले पाहिजे, ही त्या परीक्षेमधील सर्वांत महत्त्वाची अट होती. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना नियोजन, कामाची विभागणी, तर्कशुद्ध विचार करणे, सृजनशीलता ही आणि इतर अनेक मूल्ये अप्रत्यक्षरित्या विज्ञान विषयातून शिकविली जातात. या प्रकारच्या परीक्षेत प्रत्येक गटाच्या कामाचे मूल्यमापन हे विद्यार्थ्यांनी केलेले कामाचे नियोजन, सादरीकरण, तर्कशुद्ध विचार, कामाची विभागणी आणि सृजनशीलता या पातळ्यांवर केले गेले.

विज्ञान शिक्षणात प्रयोगाचे महत्त्व असल्याने 'आयबी' शिक्षणात प्रयोगाला फारच वेगळ्या पद्धतीने हाताळण्यात येते. आमच्या शाळांमध्ये विद्यार्थी व शिक्षक मिळून प्रयोगाची आखणी करतात, निरीक्षणाची खातरजमा करतात व चर्चाही करतात. ज्याप्रमाणे आपल्याकडे प्रयोगवहीत छापलेले प्रयोग करून घेण्याचा अट्टाहास या 'आयबी' शाळांमध्ये मुळीच नसतो. उदाहरणार्थ, इयत्ता सहावीच्या वर्गात सूक्ष्मजीव शिकवताना आम्ही चक्क 'यीस्ट' सूक्ष्मजीव वापरून ब्रेड बनविण्याचाच प्रयोग करण्याचा बेत आखला. प्रत्येक गटाने वेगवेगळी गृहितके मांडली आणि त्याप्रमाणे काम केले. काम संपल्यानंतर, म्हणजेच प्रयोग झाल्यानंतर आपापले निष्कर्ष तपासून पाहिले. या प्रकारच्या परीक्षेत प्रत्येक गटाने मांडलेली गृहितके, कामाची विभागणी, ब्रेडचा दर्जा आणि प्रत्येक गटाला आलेले निष्कर्ष या पातळ्यांवर मूल्यमापन केले गेले. या परीक्षेमध्ये सर्वांत महत्त्वाची गोष्ट झाली, ती विद्यार्थ्यांनी शेवटी आपण स्वत:च तयार केलेले ब्रेड खाल्ले. हे सारे करताना साहजिकच विज्ञान विषय आव्हानात्मक, जिवंत आणि सृजनात्मक आनंद देणारा ठरतो.

'आयबी' शाळांमध्ये विद्यार्थ्यांना एखादे मत स्वीकारण्याची व नाकारण्याची रीत यांच्याशीही ओळख करून दिली जाते. याचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टी तयार होते. यासाठीच 'आयबी' शाळांमध्ये मूल्यशिक्षण आणि त्यासाठी स्वतंत्र तास नसतात. 'आयबी' शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना एका ठरविलेल्या व्यक्तिमत्वामधून वाढविण्याचा प्रयत्न सतत केला जातो. ही ठरविलेली व्यक्तिमत्वे किंवा 'प्रोफाईल्स' पुढीलप्रमाणे :

(Caring) जाणीव, (knowledgeable) ज्ञानात्मक, (Thinker) विचारवंत, (Principled) तत्ववादी,(Responsible) जबाबदार, (Communicator) संवाद साधणारा.

प्रत्येक विषयातील विविध प्रकारच्या परीक्षांमधून (ज्यात आपल्यासारख्या प्रचलित परीक्षा अभावानेच असतात) वर नमूद केलेल्या 'प्रोफाईल्स' साधण्याचे एक रंजक आव्हान शिक्षकासमोर असते. 'आयबी' शिक्षणाची सर्वांत महत्त्वाची आणि जमेची बाब म्हणजे विद्यार्थ्याला 'ग्लोबल नागरिक' बनविण्याचा प्रयत्न. प्रत्येक विषयातील प्रत्येक धडा हा जागतिक पातळीचा विचार करून शिकवावा लागतो. हेदेखील 'आयबी' शिक्षकांसमोर एक मोठे आव्हान असते.

भविष्यकाळ हा नेहमीच आजच्या लहान मुलांचा असतो. कारण, आज शिकणारी मुले दहा-पंधरा वर्षांनी मोठी होणार आहेत. ती स्वबळावर शिकू शकली नाहीत, तर नजरेपलीकडच्या भावी प्रश्‍नांना समर्थपणे कशी भिडू शकतील? त्यांच्याबाबत आपुलकी असेल, तर त्यांना शिकवणाऱ्या आणि त्यांची जिज्ञासा चेतावणाऱ्या वेगळ्या विज्ञान शिक्षणाला पर्याय नाही. अशी जिज्ञासा चेतावणाऱ्या आणि परीक्षा-विरहीत शिक्षणपद्धतीत मला परदेशातील विद्यार्थ्यांनी आजवर विचारलेले प्रश्‍न खरंच मजेशीर होते. उदाहरणार्थ :

आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानात गुरुत्वाकर्षणशक्ती नसताना अन्ननलिकेतून अन्न पोटाकडे कसे जाते? (धडा : पचनसंस्था)

दुसऱ्या गुदगुल्या केल्या, की हसू येते; पण स्वत:च स्वत:ला गुदगुल्या केल्या, तर हसू येत नाही का? (धडा : ज्ञानेंद्रिये)

स्वत:चा रेकॉर्ड केलेला आवाज इतरांना योग्य वाटतो; पण स्वत:ला नाही. असे का? (धडा : ध्वनी)

एखाद्या 'एचआयव्ही'ग्रस्त रुग्णाला डास चावला, तर डासाला 'एचआयव्ही'ची लागण होते का? नसेल, तर का नाही? (धडा : रोग)

अशा पद्धतीने रंजक विज्ञान शिक्षण देण्याचा प्रयत्न 'आयबी' करत आहे. वर नमूद केलेले प्रयोग व मूल्यमापनाच्या पद्धती प्रत्येक विद्यार्थ्याला निश्‍चितच आत्मविश्‍वासू बनवितात. परीक्षा पद्धत नसल्याने सर्वसामान्य विद्यार्थी परीक्षेत कमी गुण मिळाल्याने नाराज होत नाही आणि शिक्षणाचा खऱ्या अर्थाने आनंद घेतो. त्यामुळे मला माझ्या 'आयबी' शाळांमध्ये आजवर आलेल्या अनुभवांमुळे विज्ञान शिक्षणात बदल घडवून आणण्याच्या प्रक्रियेचा भाग बनल्याचा थोडा अभिमान वाटत आहे. 

लवकरच फेसबूकचे नवे मेसेंजर ऍप

लवकरच फेसबूकचे नवे मेसेंजर ऍप

मोबाईल ऍप्स वापरणाऱ्या सर्वांसाठी चॅटिंग करण्यासाठी फेसबूक एक वेगळे नवे मेसेंजर ऍप सादर करणार आहे. हे ऍप सर्व ग्राहकांना आवडेल अशी ग्वाही फेसबूकच्या वतीने देण्यात आली आहे.

जगातील सर्वांत मोठे सोशल नेटवर्किंग संकेतस्थळ असलेले फेसबूक पुढील दोन आठवड्यांमध्ये आपली चॅटिंगची सुविधा स्मार्टफोन ऍप्समधून काढून टाकणार आहे. तसेच, ज्यांना फेसबूकवरून अशाच पद्धतीने संदेश पाठवायचे किंवा स्वीकारायचे असतील त्यांना फेसबूकचे नवे मेसेंजर ऍप डाउनलोड करावे लागणार आहे.

हा बदल प्रथमतः ब्रिटन, फ्रान्स आणि स्कँडिनिव्हियन देशांमध्ये करण्यात येणार आहे. मात्र, अमेरिकेसह उर्वरित जगभरात त्यानंतर ही सुविधा देण्यात येणार आहे. ऍपल आणि अँड्रॉइड वापरणारे लोक ही सुविधा वापरू शकतील. 

जादू मंतर



जवानांची युद्धसखी

जवानांची युद्धसखी


लघुशस्त्राचा सर्वांत जास्त उपयोगात असणारा प्रकार म्हणजे रायफल. सर्वसाधारणपणे ४00 मीटर पल्ला असणारे हे शस्त्र म्हणजे जवानांची युद्धस्थळावरची सोबतीणच आहे. कारण, जवळपास प्रत्येक जवानाजवळ रायफल असतेच. यफलमधून झाडलेली गोळी ४00 मीटरवरील माणसाचा अचूक वेध घेते. लांबचा पल्ला व अचूकता मिळवण्यासाठी रायफलचे बॅरल म्हणजेच नळी लांब असते. रायफलच्या कॅलिबरच्या १00 ते १२५ पट लांबीचे बॅरल हे सामान्यत: वापरतात. बॅरल हे विशिष्ट पोलादाच्या मिश्र धातूपासून बनवतात. त्याला बॅरल स्टील म्हणतात. हा धातू अर्थातच पोलादामध्ये वेगवेगळे घटक धातू मिसळून तयार केला जातो. गंजविरोधी बनविण्यासाठी क्रोमियम व निकेल, चिवट बनविण्यासाठी कार्बन, अशा काही धातूंचा त्यात समावेश आहे. अशा गुणांनी युक्त असणार्‍या पोलादापासून बॅरल बनविणे एक कठीण काम आहे. त्यासाठी तसे तंत्रज्ञान व त्यासाठी आवश्यक असणारी यंत्रसामग्री आवश्यक असते.
फायरिंगनंतर बॅरलमध्ये अतिशय उच्च दाबाचे प्रोपेलंट गॅस तयार होतात. त्याचे तापमानही जास्त असते. प्रोपलंटमध्ये साठविलेली रासायनिक ऊर्जा गोळीस वेगाने प्रक्षेपित करण्यासाठी उपयोगात आणतात. हवेतून प्रवास करताना स्थिर ं१्रं'>(र३ुं'ी)/ं१्रं'> राहण्यासाठी ही गोळी स्वत:च्या अक्षाभोवती फिरत जाते. त्यासाठी बॅरलला रायफलिंग म्हणजेच आतून हेलिकल ग्रुव्हज केलेले असते. गोळीची गतिज ऊर्जा वाढवण्यासाठी वस्तुमान, अर्थात पदार्थाची घनता जास्त हवी म्हणून शिसे ं१्रं'>(छीं)ि/ं१्रं'> वापरले जाते. मात्र, शिसे विषारी असल्याने त्याच्या नुसत्या उपयोगावर बंदी आहे. म्हणून तांब्याचे कवच करून शिशाची गोळी करतात.
रायफलपासून शत्रूपर्यंत गोळीचा प्रवास हवेतून होतो. गोळीला हवेचा रोध होऊन गती कमी होते. त्यामुळे हवेचा रोध कमी करून शत्रूवर मारा करणारी गती ं१्रं'>(र३१्र'्रल्लॅ श्ी'्रू३८)/ं१्रं'> जास्तीत जास्त ठेवण्यासाठी गोळीला विशिष्ट आकार देतात. अशा आकाराला एरोडायनामिक शेप म्हणतात.
रायफलच्या गोळीपासून बचाव व्हावा म्हणून शत्रूही चिलखत किंवा बॉडी आर्मर ं१्रं'>(इ८ि अ१ें४१)/ं१्रं'> वापरतो. त्यामुळे रायफलच्या गोळीमध्ये चिलखत भेदण्याची क्षमता हवी. अर्थातच, जास्त गतिज ऊर्जा हवी; म्हणून प्रक्षेपण वेग जास्ती असायला हवा. गोळीची भेदकता वाढविण्यासाठी गोळीच्या पुढील टोकाला पोलादी शंकुकृती तुकडा बसवितात. तो चिलखत भेदायला सुरुवात करून देतो. त्यामुळे गोळीने चिलखत पूर्णपणे भेदले जाते व आतील जवानास इजा पोहोचते. गोळीचा मारा शत्रूच्या नाजूक व महत्त्वाच्या अवयवांवर झाला, तर शत्रूचा मृत्यू निश्‍चित होतो.
७.६२ मिलिमीटर कॅलिबरची रायफल किंवा 0.३0३ कॅलिबरची रायफल अनेक वर्षे वापरात आहे. मात्र, त्यामुळे शत्रूच्या जवानाचा मृत्यू होतो. सध्याच्या युद्धनीतीनुसार, शत्रूला जिवे मारण्यापेक्षा त्याला जखमी करून, अर्धमेले करण्याने युद्धाचे परिणाम जास्त चांगले मिळतात. म्हणून हल्ली ५.५६ मिलिमीटर रायफलच जगभर प्रचलित आहे.

बबल तेजोमेघ bubble nebula

 बबल तेजोमेघ bubble nebula

bubble nebula बबल तेजोमेघ

र्मिष्ठा तारकासमूहातील या बबल नेब्युलाला बुडबुडा किंवा फुगा तेजोमेघ म्हणण्यापेक्षा बबल तेजोमेघ म्हणणं योग्य वाटतं. मागील वेळेस चर्चा केली त्या सोप बबल तेजोमेघासारखाच हा तेजोमेघ आहे. फक्त याच्या आणि सोप बबल तेजोमेघाच्या निर्मितीत मात्र फार मोठा फरक आहे. सोप बबल तेजोमेघ हा ग्रहसदृश तेजोमेघांपैकी आहे. अशा तेजोमेघांची निर्मिती तारा आधी फुगीर होऊन नंतर त्याच्या आकुंचन होण्यामुळे होते. बबल तेजोमेघाची निर्मिती एका अतितप्त तार्‍याने फेकलेल्या द्रव्याने जवळच्या आण्विक मेघाला पसरवल्यामुळे झाली आहे. छायाचित्र पाहून हे लक्षात येते.
फक्त वरवर बघून या दोघांतील फरक जाणवणार नाही. पण हे तेजोमेघ एक प्रकारे स्वयंप्रकाशित असतात.
दुसरी बाब म्हणजे ग्रहसदृश तेजोमेघांच्या केंद्रस्थानी त्यांचा तारा असतो. पण इथे तसं असेलच असं नाही. या तेजोमेघाचा शोध विल्यम हश्रेल यांनी १७८७ मध्ये लावला. हा तेजोमेघ आपल्यापासून सुमारे ७८00 प्रकाशवर्ष दूर आहे. आणि याचा व्यास ६ प्रकाशवर्ष आहे. ज्या तार्‍यातून हे द्रव्यमान बाहेर पडले आहे, त्या तार्‍याचे वस्तुमान सूर्याच्या १0 ते ४0 पट, तर त्याची प्रखरता सूर्याच्या काही हजारपट निश्‍चित करण्यात आली आहे. अशा तार्‍यांचा अंत एका महास्फोटातून होतो

रायगडबांधणीची प्रेरणा Raigarh

 रायगडबांधणीची प्रेरणा Raigarh 


 रायगडबांधणीची प्रेरणा Raigarh


शिवकालीन दुर्गांपैकी राजगड-रायगड हे छत्रपतींचे बिनीचे दुर्ग. रायगड शिवछत्रपतींनी राजधानी म्हणून बांधवून घेतला. कौटिल्याची नगररचना व त्यातील दिशादर्शन यांचे तंतोतत दर्शन रायगडाच्या बांधणीतून दिसते. र्थशास्त्रामध्ये कौटिल्याने नगररचनेच्या संदर्भात विस्तृत व नेमके विवेचन केलेले आढळते. कोणत्या जागी काय हवे, जे हवे ते कोणत्या दिशेस हवे, आजूबाजूस काय हवे व ते का हवे, यासंबंधीची सारी मतमतांतरे त्याने अतिशय नेटकेपणाने उलगडून दाखवली आहेत.
सातवाहन सम्राटांनी निर्मिलेले काही प्राचीन दुर्ग, चालुक्य व राष्ट्रकूटांनी निर्मिलेले काही मध्ययुगीन दुर्ग व अगदी अलीकडील म्हणावे असे शिवकालीन दुर्ग वानगीदाखल जरी निवडले, तरी यातून हा विषय स्पष्ट होतो. या संदर्भात अनेक दुर्गांची उदाहरणे देता येतात. सातवाहनकालीन दुर्गांमध्ये जीवधन, शिवनेरी, हडसर या जुन्नर परिसरातील दुर्गांची उदाहरणे देता येतात. अजिंठा-सातमाळ रांगेतील मार्कंड्या, रवळ्याजवळ्या, राजदेहेर, इंद्राई हे चालुक्य, राष्ट्रकूटकालीन दुर्गही याकडे निर्देश करतात. येथे एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते, की वर सांगितलेल्या सार्‍याच दुर्गांवर नंतरच्या राजवटींनी अनेकानेक संस्कार केले. त्यामुळे मूळ अवशेष लोपलेले जरी दिसले, तरी काही मूळ वास्तू त्यातूनही ओळखता येतात. मात्र, त्यासाठी पारखी नजरेची आवश्यकता असते.
या विषयात नेमके निर्देश हवे असतील, तर अगदी अलीकडे रचलेल्या दुर्गांचा अभ्यास करावा लागतो. मध्ययुगीन शेवटची दुर्गनिर्मिती शिवकालात झाली. या शिवकालीन दुर्गांपैकी राजगड-रायगड हे छत्रपतींचे बिनीचे दुर्ग. रायगड शिवछत्रपतींनी राजधानी म्हणून बांधवून घेतला. कौटिल्याची नगररचना व त्यातील दिशादर्शन यांचे तंतोतंत दर्शन रायगडाच्या बांधणीतून अनुभवास येते.
कौटिल्य म्हणतो, नगरातील वस्तीच्या मध्यभागी, पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुख असा राजवाडा बांधावा. या राजवाड्याच्या पूर्वेस उत्तरेच्या बाजूस आचार्य व पुरोहित यांची निवासस्थाने, यज्ञशाला व जलागार असावेत. दक्षिणेस पूर्वेकडील भागात भांडार, सेवकांच्या राहण्याच्या जागा असाव्यात. दक्षिणेस कारखान्यांवरील अधिकारी, सेनाधिकारी, वैश्य व व्यापारी यांची वस्ती असावी.
राजवाड्याच्या उत्तरेस बाजारपेठ व औषधालय असावे. उत्तरेच्या पूर्वेकडील भागात नगरदेवता, राजाची कुलदेवता यांची मंदिरे, धातू, रत्ने यांच्यापासून वस्तू बनविणारे कारागीर, तसेच ब्राह्मण यांची वस्ती असावी.
राजाच्या निवासस्थानाच्या पाठीमागे स्वतंत्र महालांमध्ये स्त्रियांचे निवासस्थान, प्रसूतिगृह या वास्तू असाव्यात. त्यांच्या पलीकडे राजपुत्र, राजकन्या यांची निवासस्थाने असावीत. त्यांच्या निवासस्थानाच्या पुढल्या बाजूस वस्त्रालंकार धारण करण्याची खोली, सल्लामसलतीची खोली असावी. राजमहालाच्या चहूबाजूंस पहारेकर्‍यांच्या चौक्या असाव्यात.
कौटिल्य जे-जे म्हणतो, ते सारेच रायगडावरील राजवाड्याचा परिसर पाहताना अनुभवता येते. येथील शिवछत्रपतींचा वाडा पूर्वाभिमुख आहे. राजवाड्याच्या पाठीमागील बाजूस राणीवसा आहे. समोरच्या बाजूस सभागृह आहे. दक्षिणेस अष्टप्रधानांचे वाडे आहेत. उत्तरेस वण्यावियीका वा बाजारपेठ आहे. उत्तरेच्या पूर्वेकडील भागात नगरदेवता-जगदीश्‍वर आहे. पूर्वेस उत्तरेच्या बाजूस ब्राह्मणवाडा आहे. पूर्वेस सैन्य व सर्वसामान्यांच्या वस्तीच्या जागा आहेत. मला वाटते, ही सारी रचना हेतुगर्भ आहे. आपल्या हिंदुस्थानातील दुर्गशास्त्राचा एक प्राचीन वसा शिवकालापर्यंत कसा आला, या प्रवासाची ही एक अनोखी कहाणी आहे!

उग्र गंधाचा सैनिक - Camel Soldier

उग्र गंधाचा सैनिक Camel Smiling Soldier

उग्र गंधाचा सैनिक Camel Smiling Soldier


ज्युलियस सिझरला युद्ध जिंकल्यामुळे पराभूत न्युमिडियाचा राजा जुबा याच्याकडून उंटाच्या रूपाने मोठी खंडणी वसूल करता आली. त्यावेळचा न्युमेडिया म्हणजे आजचा अल्जेरिया. त्याचप्रमाणे जनरल रोमॅनस याने इ.स. ६६३मध्ये लेपीस मॅग्ना, म्हणजे आजच्या लिबियाकडून ४000 उंटांची खंडणी वसूल केली. सैन्याच्या वाहतुकीसाठी त्याला त्यांचा उपयोग झाला.
कालांतराने काही धर्मीयांकडून असा दावा केला, की पृथ्वीवरच्या डोंगरदर्‍या, समुद्र, नद्या आणि इतर प्राणिजीवनाच्या उत्पत्तीच्याही आधी उंटांची निर्मिती झाली. यामुळेही उंटाला पुढे महत्त्व येत गेले. त्यांची श्रद्धा आहे, की उंटाचा पुढचा उजवा पाय म्हणजे सैतान होय. गातील अनेक युद्धांत उंटांची कामगिरी निर्णायक ठरली आहे. ५५९ ते ५३0 या इ.स. पूर्व काळातला पर्शियाचा राजा 'सायरस द ग्रेट' याने सशस्र उंटदळ उभं केलं. ५४७मध्ये त्या वेळच्या लिडिया (आताचा तुर्कस्थान) या देशाच्या क्रोएशिया राजाचा पराभव केला. इतिहासातली उंटदळाची ही पहिली नोंद. त्याच्या उंटदळाने मागच्या पायदळाला संरक्षण देत समोरच्या शत्रूच्या घोडदळावर हल्ला केला. घोडे उंटांना समोर पाहून घाबरून सैरावैरा पळत सुटले. घोड्यांना उंटांचं दर्शनच काय; पण त्यांच्या शरीराचा तीव्र गंधही घाबरवतो, हे लिडियाच्या राजाचं निरीक्षण युद्ध जिंकायला उपयोगी पडलं. नंतरच्या पर्शियाच्या कॅबिसस राजाने इ.स.पू. ५३२-३0 या काळात आणि कसेरकससने इ.स.पू. ४८५ ते ४८२मध्ये उंटदळाचा वापर केला. प्रत्यक्ष युद्धदळाशिवाय सैन्याला रसद पुरविण्यासाठी, त्यांची मांसाची आणि दुधाची गरज भागविण्यासाठी, सामान, तंबू यांच्या वाहतुकीसाठीही उंटांचा मोठा उपयोग त्या काळापासून सुरू झाला.
उत्तर आफ्रिकेतल्या देशांवर कब्जा मिळविण्यासाठी तत्कालीन सैन्यदलांनी वाळवंटातून अरबी उंटांवरूनच प्रवास केला. उंटांनी अवजड सामानाची वाहतूक केली, यामुळेच सहारा वाळवंटातली उंटावरून रहदारी सुरू झाली, वाढली. उंट हे 'वाळवंटातील जहाज' म्हणून त्यानंतरच पुढे ओळखले जाऊ लागले. वाळवंटातील त्यांचा वापरही वाढला. अरबांनी युरोपातील स्पेन (इ.स. १0२0), सिसीली (इ.स. १0५९) आणि र्‍हाईन (इ.स. १९३६) मध्ये उंटासह प्रवेश केला. उंट तिथे स्थिरावले. नंतर मात्र ते नष्ट झाले; परंतु यापूर्वी दोन दशलक्ष वर्षांपूर्वीचे उंटाचे 'कॅमेलस आल्युटेन्सिस' जातीचे जीवाश्म युरोपातच सापडल्याची पुरातत्त्वीय नोंद आहे. चीन आणि मध्यपूर्वेकडील जोडणार्‍या व्यापारी 'रेशीम मार्गावर' उंटांच्या काफिल्याद्वारा व्यापारी मालाची वाहतूक नंतर रूढ झाली. अनेक समाजांमध्ये वधूसाठी वराकडून उंटरूपाने हुंडा वसूल केला जातो. मानवी जीवनात उंटाचा अशा रीतीने हळूहळू प्रवेश होत गेला. उत्क्रांत होत गेलेल्या या ऐतिहासिक महत्त्वाच्या प्राण्याच्या सवयी आणि जीवनक्रमही खूप अद्भुत आहे, त्यामुळेच तो अन्य कोणत्याही प्राण्यांपेक्षा वेगळा दिसतो व असतोही. 


गुगळी - बटरफिश butterfish

गुगळी - बटरफिश (butterfish)


शेतात वापरल्या जात असलेल्या रासायनिक खतांचा माशांच्या जीवनचक्रावर फार अनिष्ट परिणाम होत असून, काही नाजूक जाती तर आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. गळी माशाला 'बटरफिश' असेही म्हणतात. भारत, पाकिस्तान, श्रीलंका या देशांमध्ये मुबलक प्रमाणात सापडणार्‍या या माशाची संख्या मागील दहा वर्षांत कमालीची कमी झाली आहे. त्यामागे अति मासेमारी तसेच या माशांच्या अधिवासाचा विनाश हेही प्रमुख कारण आहे.
धरणे, बंधारे, त्याचबरोबर नदी-ओढय़ांचे प्रवाह आहेत तेथे प्रदूषणाचे प्रमाण खूप आहे. शेतीसाठी वापरलेली रासायनिक खते, कीटकनाशके पाण्यामध्ये मिसळून त्याचा परिणाम या माशांवर होताना दिसतो आहे. कमी कालावधीत जास्त मासे मिळावेत म्हणून काही मासेमार पाण्यामध्ये छोटे हातबॉम्ब टाकून स्फोट घडवतात. त्यामुळे पाण्यातील माशांची छोटी छोटी पिले आणिअन्नसाखळीतील घटक मरण पावल्यामुळे खूपशा माशांचे जीवनचक्र संपून जाते.
हा मासा दुसर्‍या माशांवर उपजीविका करतो, त्यामुळे बाकी कुळाचे मासे याला घाबरून असतात. तामिळनाडूमध्ये या माशाचे बीज उत्पादन करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. या माशातील नर आणि मादी प्रयोगशाळेमध्ये काही दिवस ठेवून तिथे नैसर्गिक अधिवासासारखी निर्मिती केली. या कृत्रिम अधिवासामध्ये काही दिवस सोडल्यानंतर 'ओहाप्रीन' नावाचे इंजेक्शन नर आणि मादी यांना देऊन प्रजननासाठी त्यांना उद्दीपित केले. त्याचा चांगला परिणाम दिसून आला. मादीने ३८00 ते ४000 पर्यंत अंडी दिली. नर माशाने शुक्राणू सोडून ती अंडी फलित होऊन यशस्वीरीत्या त्यातून पिले बाहेर पडली. काही दिवसांनी ही पिले नैसर्गिक अधिवासात सोडल्यानंतर त्यांची अत्यंत चांगल्या पद्धतीने वाढ होत असल्याचे सिद्ध झाले आहे.
पावसाळ्यामध्ये जेव्हा पूर येत असतो, तेव्हा हा मासा पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वरपर्यंत जात असतो. याच कालावधीमध्ये त्याचे पुनरुत्पादन होत असते. पूर्ण वाढ झालेला हा मासा ४५ सें.मी.पर्यंत लांब असतो. वजनाला २५0 ते ३00 ग्रॅमपर्यंत भरतो. नर आणि मादीमध्ये फरक जाणवतो तो प्रामुख्याने त्याच्या खांद्याकडील परामध्ये. नर माशाच्या खांद्यावर पराच्या आतील बाजूस छोट्या दातर्‍यांची ओळ असते.
शरीर लांब, चपटे, तोंड मोठे आणि तिरकस, वरच्या बाजूला उघडणारे असते. तोंडामध्ये टोकदार दातांची ओळ असते, मिशा तिरकस लांब असतात. पाठीवरील एक पर छोटा असतो. शेपटीचा पर विभागलेला असतो. शरीराच्या खालील पर अत्यंत मोठा असून पोटाच्या परापासून चालू होऊन शेपटीपर्यंत जातो. या माशाचा रंग वरच्या बाजूने चंदेरी, जांभळा तर हिरवट सोनेरी छटा खालील बाजूने असते. शेपटीच्या तळाशी एक काळा टिक्का असतो. या माशाची पिल्ले काचेसारखी पारदर्शक असतात.